एक्स्प्लोर

Pune News: 20 दिवसांपूर्वी साखरपुडा, 30 व्या वर्षी गळ्याला दोरी, तुकाराम महाराजांच्या वंशजाने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?

Pune Dehu News: तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरेंचं टोकाचं पाऊल, हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून देहूतील घरात आयुष्य संपवलं. देहूनगरीत एकच खळबळ उडाली आहे.

पुणे: संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिरीष महाराज मोरे (Shirish More) यांनी देहू येथील निवासस्थानी आत्महत्या केली. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिरीष महाराजांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. याबाबत अद्याप अधिकची माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, शिरीष महाराज मोरे मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. मात्र, आज सकाळी बराचवेळ होऊनही त्यांनी दार उघडले नव्हते. दार वाजवूनही आतून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी शिरीष महाराज मोरे यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. त्यांनी आपल्या उपरण्याने खोलीत गळफास लावून घेतला. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे देहूगावावर शोककळा पसरली आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

शिरीष महाराज मोरे यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्याला कंटाळूनच त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. शिरीष महाराज यांनी खोलीत एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. 20 दिवसांपूर्वीच शिरीष महाराज मोरे यांचा साखरपुडा झाला होता.  नुकताच त्यांचा टिळा झाला होता. 20 फेब्रुवारीला रोजी मोरे यांचा विवाह होणार होता. ते उदरनिर्वाहासाठी प्रवचन आणि कीर्तन करायचे. त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते. मात्र, यामधून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. शिरीष महाराज मोरे हे अवघ्या 30 वर्षांचे होते. पुढील काही महिन्यांमध्ये त्यांचे लग्न होणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. तुकाराम महाराजांचे (Sant Tukaram Maharaj) वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येच्या बातमीने देहूनगरीत एकच खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, प्राथमिकदृष्ट्या आर्थिक विवंचेनेतून त्यांनी आत्महत्येचे केल्याचे कळत असल्याचे देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले. या घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत. हभप शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नितेश राणेंची पोस्ट

राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी शिरीष महाराज मोरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. संत तुकाराम महाराजांचे वंशज,राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे स्वयंसेवक ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांचे आज आकस्मित निधन झाले. मोरे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने देवो व आत्म्यास सदगती मिळो हिचं परमेश्वरा चरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली, असे नितेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

आणखी वाचा

मोठी बातमी: तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरेंचं टोकाचं पाऊल, हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून देहूतील घरात आयुष्य संपवलं

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mira Bhayandar : काल मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, आता 'मराठी माणूस' जागा झाला, पोलीस उपायुक्तांना भेटणार
काल मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, आता 'मराठी माणूस' जागा झाला, पोलीस उपायुक्तांना भेटणार
Bachchu Kadu protest in Mumbai: तर उलटं टांगू; 7/12 कोरा करा, जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत वसुली नाही; बच्चू कडूंचं आज मुंबईत आंदोलन
तर उलटं टांगू; 7/12 कोरा करा, जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत वसुली नाही; बच्चू कडूंचं आज मुंबईत आंदोलन
मुंबईतील डॉक्टर महिलेनं इस्लामपुरात कारमध्येच स्वत:वर वार करत आयुष्य संपवलं; प्रकरणाला आता वेगळं वळण, निलम गोऱ्हेंकडून महत्त्वपूर्ण निर्देश
मुंबईतील डॉक्टर महिलेनं इस्लामपुरात कारमध्येच स्वत:वर वार करत आयुष्य संपवलं; प्रकरणाला आता वेगळं वळण, निलम गोऱ्हेंकडून महत्त्वपूर्ण निर्देश
Devendra Fadnavis: कंत्राटं मिळवण्याच्या मागे लागू नका, आपल्या पक्षाचा संस्कार वेगळा; देवेंद्र फडणवीसांचा भाजप आमदारांना  सल्ला
कंत्राटं मिळवण्याच्या मागे लागू नका, आपल्या पक्षाचा संस्कार वेगळा; देवेंद्र फडणवीसांचा भाजप आमदारांना सल्ला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07:00 AM : 04 July 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 100 Headlines : सकाळी 6AM च्या 100 हेडलाईन्स : 6AM 04 July 2025 : Superfast News
Mira Road Marathi Special Report | मराठी भाषेवरून वाद, MNS कार्यकर्त्यांवर गुन्हा, व्यापाऱ्यांचा बंद
Thane Marathi Language Issue | ठाण्यात मराठी-अमराठी वाद पेटला, कानाखाली आवाज, राजकारण पेटलं
Pune Delivery Special Report | उच्चभ्रू सोसायटीत तरुणीवर अत्याचार, महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Bhayandar : काल मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, आता 'मराठी माणूस' जागा झाला, पोलीस उपायुक्तांना भेटणार
काल मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, आता 'मराठी माणूस' जागा झाला, पोलीस उपायुक्तांना भेटणार
Bachchu Kadu protest in Mumbai: तर उलटं टांगू; 7/12 कोरा करा, जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत वसुली नाही; बच्चू कडूंचं आज मुंबईत आंदोलन
तर उलटं टांगू; 7/12 कोरा करा, जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत वसुली नाही; बच्चू कडूंचं आज मुंबईत आंदोलन
मुंबईतील डॉक्टर महिलेनं इस्लामपुरात कारमध्येच स्वत:वर वार करत आयुष्य संपवलं; प्रकरणाला आता वेगळं वळण, निलम गोऱ्हेंकडून महत्त्वपूर्ण निर्देश
मुंबईतील डॉक्टर महिलेनं इस्लामपुरात कारमध्येच स्वत:वर वार करत आयुष्य संपवलं; प्रकरणाला आता वेगळं वळण, निलम गोऱ्हेंकडून महत्त्वपूर्ण निर्देश
Devendra Fadnavis: कंत्राटं मिळवण्याच्या मागे लागू नका, आपल्या पक्षाचा संस्कार वेगळा; देवेंद्र फडणवीसांचा भाजप आमदारांना  सल्ला
कंत्राटं मिळवण्याच्या मागे लागू नका, आपल्या पक्षाचा संस्कार वेगळा; देवेंद्र फडणवीसांचा भाजप आमदारांना सल्ला
MNS Sandeep Deshpande: राज ठाकरेंना ललकारणाऱ्या सुशील केडियाला संदीप देशपांडेंनी सुनावलं, म्हणाले,  'व्यापारी आहात, बाप बनायचा प्रयत्न करु नका'
व्यापारी आहात, बाप बनायचा प्रयत्न करु नका! मेहता-बिहतांनी चड्डीत राहायचं; मीरा-भाईंदरमधील मोर्चावरुन संदीप देशपांडेंचा इशारा
Nashik Politics : मामा राजवाडेंनी ठाकरे गटाला 'मामा' बनवलं; आता उद्धव ठाकरेंनी नाशिकमधील 'या' नेत्याची ताकद वाढवली
मामा राजवाडेंनी ठाकरे गटाला 'मामा' बनवलं; आता उद्धव ठाकरेंनी नाशिकमधील 'या' नेत्याची ताकद वाढवली
Nagpur Crime News : खळबळजनक! नागपुरातील प्रतिष्ठित हॉटेलमध्ये परदेशातील तरुणींकडून नको ते कृत्य; पोलिसांचा छापा, उझबेकिस्तान मधील तरुणीची सुटका
खळबळजनक! नागपुरातील प्रतिष्ठित हॉटेलमध्ये परदेशातील तरुणींकडून नको ते कृत्य; पोलिसांचा छापा, उझबेकिस्तान मधील तरुणीची सुटका
Baba Ramdev Comment On Shefali Jariwala Death: 'हार्डवेयर ठीक होता, पण सॉफ्टवेयर...'; शेफाली जरीवालाबाबत बोलताना रामदेव बाबांची जीभ घसरली, नेटकऱ्यांनी झोडपलं
'हार्डवेयर ठीक होता, पण सॉफ्टवेयर...'; शेफाली जरीवालाबाबत बोलताना रामदेव बाबांची जीभ घसरली
Embed widget
OSZAR »