एक्स्प्लोर

पुण्यात राष्ट्रवादीकडून हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिमांचा आजचा रोजा सोडण्यात येणार

राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात आज (15 एप्रिल) संध्याकाळी सव्वा सहा वाजता रोजाचं आयोजन केलं आहे. हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिमांचा आजचा रोजा सोडण्यात येणार आहे.

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यांच्यावरुन वाद सुरु झाला आहे. परंतु पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिमांचा आजचा रोजा सोडण्यात येणार आहे. पुण्यातील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात आज (15 एप्रिल) संध्याकाळी सव्वा सहा वाजता याचं आयोजन करण्यात आलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र माळवदकर आणि भाई कात्रे यांनी या रोजा इफ्तारचे आयोजन केलं असून ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याशिवाय राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, शिक्षण महर्षी पी ए इनामदार, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस आयुक्त प्रियांका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोयेकर यांची देखील प्रमुख उपस्थिती असेल.

इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला 3 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. या संपूर्ण महिन्यात मुस्लिम लोक सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी अन्न आणि पाणी घेत नाहीत. आज देशभरात रमजानचा तेरावा रोजा आहे. राज्यभरात मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा वादाच्या पार्श्वभूमीवर आजचा रोजा सोडण्यासाठी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने इफ्तारचं आयोजन केलं आहे. साखळीपीर तालीम राष्ट्रीय मंदिरात हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिमांचा रोजा सोडला जाणार आह.

पुण्यातील सोमवार पेठेतील या ठिकाणी मुस्लीम पीराचा दर्गा आणि हनुमान मंदिर एकत्रित आहेत. म्हणून या तालमीला साखळीपीर तालीम म्हटलं जातं तर हनुमान मंदिराला राष्ट्रीय हनुमान मंदिर हे नाव आहे. मागील 34 वर्षांपासून इथे हनुमान जयंती दोन्ही समाजाकडून एकत्रित साजरी होते.

रमजान महिन्याचे महत्त्व
रमजानचा महिना इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. या संपूर्ण महिन्यात मुस्लीम बांधव सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी अन्न आणि पाणी घेत नाहीत. उपवास करण्यासोबतच या संपूर्ण महिन्यात आपले विचारही शुद्धता ठेवावे लागतात. आपल्या शब्दांनी कोणाचेही नुकसान न होणार नाही हेही आवश्यक असते. हा महिनाभर शरीराच्या शुद्धतेसाठी विशेष काळजी घेतली जाते.

रमजान महिन्यात उपवास का केला जातो?
रमजान हा महिन्यामध्ये इस्लाम धर्माचे पवित्र प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांच्या समक्ष पवित्र ग्रंथ कुराणचा पहिला श्लोक अनावरण करण्यात आला होता. तेव्हापासून इस्लाममध्ये हा महिना पवित्र मानून महिनाभर उपवास करण्याची परंपरा सुरु झाली. उपवास हे इस्लाम धर्माच्या पाच मूलभूत तत्त्वांपैकी एक आहे. उपवास, नमाज, दान, श्रद्धा आणि मक्काची हज यात्रा ही इस्लाम धर्मातील पाच तत्त्वे आहेत. मुस्लिम बांधवाच्या जीवनात या पाच तत्त्वांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Breaks Down : अश्रूंचा बांध फुटला! 20 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर विराट कोहलीला आनंदाश्रू अनावर, शेवटीची ओव्हर संपेपर्यंत रडला
अश्रूंचा बांध फुटला! 20 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर विराट कोहलीला आनंदाश्रू अनावर, शेवटीची ओव्हर संपेपर्यंत रडला
Rajat Patidar : विराट कोहलीसाठी जिंकणार, रजत पाटीदारनं शब्द दिला अन् पूर्ण केला, आरसीबीचं IPL विजेतेपदाचं स्वप्न अखेर पूर्ण
विराट कोहलीसाठी जिंकणार, रजत पाटीदारनं शब्द दिला अन् पूर्ण केला, आरसीबीचं IPL विजेतेपदाचं स्वप्न अखेर पूर्ण
RCB Vs PBKS : ई साला कप नामदे ... रश्मिकाचा विश्वास सार्थ अन् 18 वर्षांनी बंगळुरुने IPL ट्रॉफी उंचावली
ई साला कप नामदे ... रश्मिकाचा विश्वास सार्थ अन् 18 वर्षांनी बंगळुरुने IPL ट्रॉफी उंचावली
RCB Win IPL 2025 : विराट कोहलीची स्वप्नपूर्ती! 'बंगळुरू' आयपीएलचा नवा चॅम्पियन, 18 वर्षांनी ट्रॉफीवर नाव कोरले; श्रेयस अय्यरचे स्वप्न पुन्हा भंगले
विराट कोहलीची स्वप्नपूर्ती! 'बंगळुरू' आयपीएलचा नवा चॅम्पियन, 18 वर्षांनी ट्रॉफीवर नाव कोरले; श्रेयस अय्यरचे स्वप्न पुन्हा भंगले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RCB Wins IPL 2025 : 18 वर्षांची प्रतिक्षा संपली! RCBच्या ‘विराट’ विजयाची कहाणी ABP MAJHAVaishanavi Hagawane Special Report : वैष्णवी हगवणे प्रकरणात कोर्टात काय घडलं? जाणून घ्याSudhakar Badgujar Special Report : सुधाकर बडगुजर ठाकरेंची साथ सोडणार? गाडी भाजपकडे वळवणार?Raut vs Mahajan Special Report : ठाकरे-फडणवीसांचे राईट-हँड भिडले, राऊत-महाजन एकमेकांना नडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Breaks Down : अश्रूंचा बांध फुटला! 20 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर विराट कोहलीला आनंदाश्रू अनावर, शेवटीची ओव्हर संपेपर्यंत रडला
अश्रूंचा बांध फुटला! 20 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर विराट कोहलीला आनंदाश्रू अनावर, शेवटीची ओव्हर संपेपर्यंत रडला
Rajat Patidar : विराट कोहलीसाठी जिंकणार, रजत पाटीदारनं शब्द दिला अन् पूर्ण केला, आरसीबीचं IPL विजेतेपदाचं स्वप्न अखेर पूर्ण
विराट कोहलीसाठी जिंकणार, रजत पाटीदारनं शब्द दिला अन् पूर्ण केला, आरसीबीचं IPL विजेतेपदाचं स्वप्न अखेर पूर्ण
RCB Vs PBKS : ई साला कप नामदे ... रश्मिकाचा विश्वास सार्थ अन् 18 वर्षांनी बंगळुरुने IPL ट्रॉफी उंचावली
ई साला कप नामदे ... रश्मिकाचा विश्वास सार्थ अन् 18 वर्षांनी बंगळुरुने IPL ट्रॉफी उंचावली
RCB Win IPL 2025 : विराट कोहलीची स्वप्नपूर्ती! 'बंगळुरू' आयपीएलचा नवा चॅम्पियन, 18 वर्षांनी ट्रॉफीवर नाव कोरले; श्रेयस अय्यरचे स्वप्न पुन्हा भंगले
विराट कोहलीची स्वप्नपूर्ती! 'बंगळुरू' आयपीएलचा नवा चॅम्पियन, 18 वर्षांनी ट्रॉफीवर नाव कोरले; श्रेयस अय्यरचे स्वप्न पुन्हा भंगले
शेतकऱ्यांनो सावधान! 'या' तारखांना पडणार मुसळधार पाऊस, राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना इशारा 
शेतकऱ्यांनो सावधान! 'या' तारखांना पडणार मुसळधार पाऊस, राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना इशारा 
मुंबई विमानतळावरच भिडले वाहनचालक आणि सुरक्षा रक्षक, पार्किंगच्या वादातून तुफान हाणामारी
मुंबई विमानतळावरच भिडले वाहनचालक आणि सुरक्षा रक्षक, पार्किंगच्या वादातून तुफान हाणामारी
RCB vs PBK IPL Final Score : 18 वर्षांची प्रतीक्षा संपली, विराट कोहलीची आरसीबी 'चॅम्पियन'! अंतिम सामन्यात पंजाबचा सहा धावांनी पराभव
18 वर्षांची प्रतीक्षा संपली, विराट कोहलीची आरसीबी 'चॅम्पियन'! अंतिम सामन्यात पंजाबचा सहा धावांनी पराभव
बोरीवलीतील काहीजण तुर्कीला गेले, कट्टर दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय, ATS च्या हाती महत्वाचे धागेधोरे 
बोरीवलीतील काहीजण तुर्कीला गेले, कट्टर दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय, ATS च्या हाती महत्वाचे धागेधोरे 
Embed widget
OSZAR »