Pune Crime: दौंडच्या कचराकुंडीत सापडलेल्या बरण्यामधील अर्भक अन् अवयव कशासाठी वापरली जात होती? महत्त्वाची माहिती समोर

Pune Crime: बरणीत सापडलेले अर्भक हे पुरुष असून, यासंदर्भात पोलिस आणि उपजिल्हा रुग्णालय चौकशी करत आहे. या चौकशीतून वस्तुस्थिती पुढे येईल, असे दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन गुजर म्हणाले.

Continues below advertisement

दौंड: दौंड शहरातील कचराकुंडीमध्ये अर्भक आणि मानवी शरीराचे अवयव आढळल्याने परिसरामध्ये काल (मंगळवारी) मोठी खळबळ उडाली. बोरावके नगरमध्ये प्राइम टाऊन हॉटेलच्या मागे असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये एका बरणीमध्ये एक मृत अर्भक आणि अवयवांच्या बरण्या एका नागरिकाला आढळल्या. त्यांनी तातडीने पोलिसांना संबंधित माहिती दिली आहे. पोलिसांनी पंचनामा करत रुग्णालय प्रशासनाची चौकशी करून अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. 

Continues below advertisement

कचराकुंडीत बॉक्समध्ये एका बाटलीत एक पुरुष जातीचे अर्भक होते, तर अन्य 11 बरण्यांमध्ये मानवी शरीराचे अवशेष होते, अशी माहिती समोर आली आहे. सापडलेल्या बॉक्सवर भंगाळे हॉस्पिटलचा उल्लेख असल्याने पोलिसांनी डॉक्टरांकडे चौकशी केली. अकरा बरण्यांमध्ये ऑपरेशन झाल्यानंतरचे अवयव ठेवल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्या बरण्यांवर रुग्णांची नावेही होती. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संदीप गुजर यांनी संबंधित बरण्या आणि त्यातील अवयवांची तपासणी केली. त्यात पुरुष जातीचे अर्भक असल्याचे पुढे आले. तसेच, रुग्णालयातील डॉक्टरांनी इतर अकरा बरण्यांवर असलेल्या रुग्णांच्या नावांच्या कागदपत्रांची फाइल पोलिसांना सादर केली आहे.

दौंड शहरात कचऱ्याच्या ढिगार्‍यामध्ये एका बरणीत अर्भका सोबतच मानवी शरीराचे अवशेष देखील आढळल्याने एकच खळबळ उडाली. हे अर्भक मेडिकल अभ्यासासाठी बरणीमध्ये प्रिझर्व करून ठेवण्यात आलं असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच कोणताही प्रकारचा गर्भपात नसल्याचा पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. तसेच आता ते कुठून आलं याचा शोध पोलीस घेत आहेत. खरंतर अशा पद्धतीने अर्भक कचऱ्यामध्ये आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मेडिकलच्या अभ्यासासाठी या अर्भकाचा उपयोग केला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. अर्भक परीक्षणासाठी जरी आणलं असलं तरी ते अशा पद्धतीने कचऱ्यामध्ये टाकता येत नाही ज्यांनी कोणी टाकलं त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

बरणीत सापडलेले अर्भक हे पुरुष असून, यासंदर्भात पोलिस आणि उपजिल्हा रुग्णालय चौकशी करत आहे. या चौकशीतून वस्तुस्थिती पुढे येईल, असे दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन गुजर म्हणाले. तर या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तातडीने घटनास्थळी गेलो. घटनेचा पंचनामा केला त्यानुसार योग्य ती चौकशी सुरू केलेली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांनी म्हटलं आहे. मृत अर्भक साडेचार महिन्यांचे असून, नातेवाईकांना ते नेण्यास सांगितले होते. त्यांनी नेले नाही. बाकीच्या बरण्यांमध्ये गर्भाशयाची काढलेली पिशवी, अपेंडिक्स, हर्निया असे अवयव होते. ते 2020 पासून चुकून आमच्याकडे राहून गेले आहेत अशी माहिती भंगाळे हॉस्पिटलचे डॉ. प्रमोद भंगाळे यांनी दिली आहे.  

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »