एक्स्प्लोर

मोहसीनच्या मंडपात नरेंद्रचं लग्न, पुण्यात पावसाने धर्माच्या भिंती वाहून नेल्या, शादी मुबारकसोबत मंगलाष्टकांचेही सूर

Muslim Family help Hindu Family for wedding : मोहसीनच्या मंडपात नरेंद्रचं लग्न, पुण्यात पावसाने धर्माच्या भिंती वाहून नेल्या, शादी मुबारकसोबत मंगलाष्टकांचेही सूर

Muslim Family help Hindu Family for wedding : निसर्गापुढे ना धर्म टिकतो, ना  जात टिकते आणि  मी पणा टिकतो. धर्मापक्षा माणुसकी मोठी असते असं काय म्हटलं जातं.  याचचं मूर्तिमंत उदाहरण पुण्यातील एका विवाह सोहळ्यात पाहायला मिळालं. पुण्यात कवडे आणि गलांडे यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात सुरू होता. मात्र मंगळवारी झालेल्या पावसानं या विवाह सोहळ्यावर पाणी फेरलं. हतबल झालेल्या मुलीच्या वडिलांना मात्र शेजारी एका मुस्लिम कुटुंबियांनी स्वत:च्या लेकाच्या रिसेप्शनचा मंडप उपलब्ध करुन दिला आणि शादी मुबारक म्हणत असलेल्या मंडपात थेट मंगलाष्टकाचे सूर ऐकू आले. याच संध्याकाळी जात धर्म भिंत हरली आणि माणूसकी जिंकलेली पाहायला मिळाली. 

पुण्यातील घोरपडीतील एसआरपीएफच्या अलंकार लॉनमध्ये कवडे आणि गलांडे कुटुंबियांचा विवाहसोहळा मंगळवारी संध्याकाळी रंगात आला होता. संस्कृती कवडे आणि नरेंद्र गलांडे दोघेही लग्नासाठी तयार झाले. आलिशान मंडप सजला होता. लेकीचं लग्न ग्रँड पद्धतीने करण्यासाठी चेतन कवडे सर्वतोपरी प्रयत्न करत होते. मात्र त्याच दिवशी पुण्यात मुसळधार पावसानं ग्रँड लग्नाचा मंडप आणि एकुलत्या एक लेकीच्या ग्रँड लग्नाच्या स्वप्नावर पाणी फेरलं. लग्नाचा मांडव जलमय झाला. पाहुणे, नातेवाईक आणि खुद्द नवरी-नवरदेव चिंब भिजले. लग्न थांबणार की काय, या प्रश्नाने सर्वांनाच हतबल केलं होतं. हतबल असलेल्या बापासाठी अशा कठीण वेळी जात-धर्म न पाहता दुसऱ्या बापाने हात पुढे केला. 

भिजलेला मंडप आणि आक्राळविक्राळ झालेली स्थिती झाली होती. शेजारच्या एका दुसऱ्या मंडपात  मोहसीन आणि माहीन यांचं रिसेप्शन सुरु होतं. हे पाहून वडिलांना थेट या मुस्लिम कुटुंबियांकडे जाऊन लेकीच्या लग्नात झालेली फजिती सांगितली. त्यावेळी मुस्लिम कुटुंबियांनी एका क्षणाचा विचार न करता थेट संस्कृती आणि नरेंद्र यांना घेऊन येण्यासाठी सांगितलं आणि आपल्या मुलाच्या रिसेप्शनचा हॉल लग्नासाठी वापरायला दिला.  पावसामुळे स्वतःच्या समारंभात व्यत्यय येऊनही त्यांनी हिंदू वऱ्हाडासाठी मंच मोकळा केला. आपला कार्यक्रम थांबवला आणि संस्कृती आणि नरेंद्र यांच्या लग्नाची मंगलाष्टक सुरु करायला सांगितलं.  संस्कृती आणि नरेंद्र यांचा विवाह त्या हॉलमध्ये पार पडला. सोहळा पूर्ण होताच काझी कुटुंबियांचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. एकाच मंचावर दोन वेगवेगळ्या धर्मांतील विवाह पार पडणं ही केवळ योगायोगाची नव्हे, तर ऐक्याची जिवंत मिसाल ठरली.

संस्कृती ही चेतन कवडे यांची एकुलची एक लेक. लेकीचं लग्न ठरल्यावर प्रत्येक घरात रेलचेल सुरु होते. तशीच रेलचेल कवडे कुटुंबियांत मागील तीन महिने सुरु होती. त्यात एकुलती एक लेक म्हटल्यावर लेकीच्या लग्नात सगळं ग्रँड करण्याचा मुलीच्या वडिलांचा हट्ट असतो. तोच हट्ट कवडे यांनी धरला आणि लेकीचं लग्न ग्रँड करण्यासाठी लॉन, लेकीला दीड लाखाची पैठणीपासून तर तिला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी केल्या. मात्र पावसाने बापाला हात टेकायला भाग पाडलं पण मुस्लिम कुटुंबियांनी या हतबल झालेल्या बापाला एका क्षणात तारलं. 

हौस-मौज राहिली पण लग्न झालं... मुस्लिम कुटुंबियांचे आभार मानावे तेवढे कमी

माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न असल्याने मला तिच्या लग्नाची फार हौस होती. दागिने, साड्यापासून तर सगळी तयारी आम्ही नीट केली पण पावसाने सगळं हिरावून घेतलं. पावसाच्या पाण्याच लेकीच्या आलिशान लग्नाचं स्वप्न आणि आमचे अश्रू वाहून गेले. पण एक कळलं मी पणा हा निसर्गापुढे कधीच टिकत नाही. आमचाही मी पणा टिकला नाही. निसर्गापुढे कोणी नाही. आम्ही आता थेट मोहसीनचे वडिल फारुक काझी यांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानणार असल्याचं संस्कृतीच्या आईने सांगितलं.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jagtap Family On Vaishnavi Hagawane Death : हगवणेंच्या दुसऱ्या सूनेचीही हादरवणारी कहाणी, वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण, मयूरीच्या भावाने CCTV दाखवला!

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Riyan Parag : रियान परागकडे नेतृत्त्व, परदेश दौऱ्यात 5 वन डे सामने, आसाम बोर्डाचं मोठं प्लॅनिंग!
रियान परागकडे नेतृत्त्व, परदेश दौऱ्यात 5 वन डे सामने, आसाम बोर्डाचं मोठं प्लॅनिंग!
Maharashtra Weather Update: तळकोकण, पुण्यासह राज्यभरात पावसाचे तीव्र अलर्ट, येत्या 4 दिवसांत जोर वाढणार, IMD नं सांगितलं...
तळकोकण, पुण्यासह राज्यभरात पावसाचे तीव्र अलर्ट, येत्या 4 दिवसांत जोर वाढणार, IMD नं सांगितलं...
BMC Election : मनसे-शिवसेना ठाकरेंच्या युतीचा पहिला प्रस्ताव कधी? प्रभाग रचनेचा आदेश दिल्यानंतर आतल्या गोटातील माहिती समोर
मनसे-शिवसेना ठाकरेंच्या युतीचा पहिला प्रस्ताव कधी? प्रभाग रचनेचा आदेश दिल्यानंतर आतल्या गोटातील माहिती समोर
CIDCO Lottery 2025: आनंदाची बातमी: सिडकोकडून 22 हजार घरांसाठी लॉटरी, सर्वसामान्यांचे घराचं स्वप्न पूर्ण होणार
मोठी बातमी: जून महिन्यात सिडकोकडून 22 हजार घरांसाठी लॉटरी, नवी मुंबईच्या कोणत्या परिसरात घरं मिळणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bharat Gogawale On Thackeray Yuti : राजकारण आणि खेळात काहीही होईल, राज-उद्धव युतीवर भाष्यGopichand Padalkar On Jayant Patil :जयंत पाटील संपलेला विषय,जाळ घालून मोठ केला तरी होणार नाहीNarayan Rane On Nitesh Rane : मुख्यमंत्री हा कुणाचा बाप नसतो तेवक्तव्य चुकीचं, मी नितेशला समज दिलीMumbra Railway accident :मुंब्रा स्थानकात GRP कडून ट्रॅकची पाहणी,पुरावे मिळतात का? याचा तपास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Riyan Parag : रियान परागकडे नेतृत्त्व, परदेश दौऱ्यात 5 वन डे सामने, आसाम बोर्डाचं मोठं प्लॅनिंग!
रियान परागकडे नेतृत्त्व, परदेश दौऱ्यात 5 वन डे सामने, आसाम बोर्डाचं मोठं प्लॅनिंग!
Maharashtra Weather Update: तळकोकण, पुण्यासह राज्यभरात पावसाचे तीव्र अलर्ट, येत्या 4 दिवसांत जोर वाढणार, IMD नं सांगितलं...
तळकोकण, पुण्यासह राज्यभरात पावसाचे तीव्र अलर्ट, येत्या 4 दिवसांत जोर वाढणार, IMD नं सांगितलं...
BMC Election : मनसे-शिवसेना ठाकरेंच्या युतीचा पहिला प्रस्ताव कधी? प्रभाग रचनेचा आदेश दिल्यानंतर आतल्या गोटातील माहिती समोर
मनसे-शिवसेना ठाकरेंच्या युतीचा पहिला प्रस्ताव कधी? प्रभाग रचनेचा आदेश दिल्यानंतर आतल्या गोटातील माहिती समोर
CIDCO Lottery 2025: आनंदाची बातमी: सिडकोकडून 22 हजार घरांसाठी लॉटरी, सर्वसामान्यांचे घराचं स्वप्न पूर्ण होणार
मोठी बातमी: जून महिन्यात सिडकोकडून 22 हजार घरांसाठी लॉटरी, नवी मुंबईच्या कोणत्या परिसरात घरं मिळणार?
विधवा महिलांना महिन्याला 6000, शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप, ओबीसींना नोकरीत आरक्षण; बच्चू कडूंच्या आंदोलनातील 17 प्रमुख मागण्या
विधवा महिलांना महिन्याला 6000, शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप, ओबीसींना नोकरीत आरक्षण; बच्चू कडूंच्या आंदोलनातील 17 प्रमुख मागण्या
Uddhav Thackeray & Raj Thackeray: ठाकरे गट- मनसे एकत्र येण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल? डोंबिवलीत ठाकरे गटाच्या शाखेत नेमकं काय घडलं?
ठाकरे गट- मनसे एकत्र येण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल? डोंबिवलीत ठाकरे गटाच्या शाखेत नेमकं काय घडलं?
Narayan Rane on Nitesh Rane statement: मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो, मी नितेशला समज दिलेय; नारायण राणेंनी टोचले मुलाचे कान
मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो, मी नितेशला समज दिलेय; नारायण राणेंनी टोचले मुलाचे कान
Jayant Patil and Gopichand Padalkar: दिवा विझताना मोठा होतो, तसं जयंत पाटलांचं झालंय; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
दिवा विझताना मोठा होतो, तसं जयंत पाटलांचं झालंय; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
Embed widget
OSZAR »