एक्स्प्लोर

Deenanath Mangeshkar Hospital : दीनानाथ रुग्णालयात लोकांचे कपडे बघूनच प्रवेश देतात, रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक आरोप

Deenanath Mangeshkar Hospital : शासनाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालय ताब्यात घेतले पाहिजे आणि त्यावर प्रशासक नेमला पाहिजे, अशी मागणी देखील रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मागील आठवड्यात घडली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर (Deenanath Mangeshkar Hospital) या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप होत आहे. रुग्णालयाने उपचारांसाठी 10 लाख रुपये अनामत रक्कम मागितली, ती न दिल्याने उपचारांना उशीर झाला आणि तनिषा भिसे दगावल्या असा आरोप केला जात आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यात राज्य शासनाच्या समितीचा अहवाल काल (दि. 07) सादर झाला. त्यात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. आता या प्रकरणावर शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी रुग्णालय प्रशासनावर खळबळजनक आरोप केलाय. 

रवींद्र धंगेकर म्हणाले की, मंगेशकर परिवाराचे योगदान या देशासाठी महत्त्वाचे आहे. पण मंगेशकर परिवार आणि हॉस्पिटल हा भाग वेगळा आहे. मंगेशकर कुटुंबियाच्या नावाने सरकारने हॉस्पिटलला करोडो रुपयाची जागा मोफत दिली आहे. महानगरपालिकेचा 27 कोटी रुपयांचा टॅक्स बाकी आहे. त्यांना शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड झालेला आहे, तो देखील त्यांनी भरलेला नाही. हे सगळं कोणाच्या जिवावर चालते? यांच्या पाठीशी कोण आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.   

दीनानाथ रुग्णालयात लोकांचे कपडे बघूनच प्रवेश देतात

रवींद्र धंगेकर पुढे म्हणाले की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात लाखो पेशंट येत असतात. त्या पेशंटला कशा पद्धतीने ट्रीट केले जाते? हे आपण बघितले आहे. संचालक तिथे मालक म्हणून वावरतात. त्यांना राजकीय सपोर्ट असल्याने आपले कोणीही वाकडे करू शकत नाही, या धुंदीत ते वागतात. दीनानाथ रुग्णालयात लोकांचे कपडे बघून आतमध्ये प्रवेश दिला जातो, असा आरोप त्यांनी यावेळी केला.   

हॉस्पिटल सरकारने ताब्यात घेऊन प्रशासक नेमावा

तिथे कुठल्याही नियमाप्रमाणे वागले जात नाही. तिथे कमर्शिअल व्यवसाय होत असल्याने रुग्णाला कुठेही दिलासा मिळत नाही. शासनाने हे रुग्णालय ताब्यात घेतले पाहिजे आणि यावर प्रशासक नेमला पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. तर याआधी देखील रुग्णालयावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांच्यावर दंड आकारला आहे. मात्र रुग्णालयाने दंड भरलेला नाही. ते मनमानी कारभार करतात. जो पर्यंत यांच्यावर कारवाई होणार नाही, तोपर्यंत यावर काही बोलता येणार नाही, असे देखील रवींद्र धंगेकर म्हणाले. राज्य सरकारने या हॉस्पिटलला वेगवेगळे सुविधा दिल्या आहेत. या हॉस्पिटलने आतापर्यंत कोट्यावधी रुपयाचा कर देखील थकवला आहे, असा आरोप देखील रवींद्र धंगेकर यांनी केलाय. 

आणखी वाचा 

Deenanath Mangeshkar Hospital: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबतचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर, कारवाईला वेग येणार?

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST Bus : एसटीला इलेक्ट्रिक बस वेळेवर न पुरविणाऱ्या कंपनीवर कारवाई नाही, व्यवस्थापनावर कुणाचा दबाव? श्रीरंग बरगे यांचा सवाल
एसटीला इलेक्ट्रिक बस वेळेवर न पुरविणाऱ्या कंपनीवर कारवाई नाही, व्यवस्थापनावर कुणाचा दबाव? श्रीरंग बरगे यांचा सवाल
North Maharashtra Rain Update : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा, काय सांगतो हवामान खात्याचा अंदाज?
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा, काय सांगतो हवामान खात्याचा अंदाज?
कोकणात पुन्हा ठाकरेंना धक्का? विनायक राऊतांचे कट्टर समर्थक ठोकणार रामराम, लवकर शिंदे गटात प्रवेश
कोकणात पुन्हा ठाकरेंना धक्का? विनायक राऊतांचे कट्टर समर्थक ठोकणार रामराम, लवकर शिंदे गटात प्रवेश
EPFO :ईपीएफओच्या व्याजदराला केंद्राची मंजुरी, पीएफ खात्यात 1 लाख रुपये जमा असल्यास व्याज किती मिळणार? 
EPFO :ईपीएफओच्या व्याजदराला केंद्राची मंजुरी, पीएफ खात्यात 1 लाख रुपये जमा असल्यास व्याज किती मिळणार? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines 01 PM Top Headlines 25 May 2025 एबीपी माझा दुपारी 01 च्या हेडलाईन्सAsaduddin owaisi : दशतवाद्यांनी कुराणचे चुकीचे वर्णन केले, इस्लाम दहशतवादाविरोधात आहे- असदुद्दीन ओवैसी100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरABP Majha Headlines 12 PM Top Headlines 25 May 2025 एबीपी माझा दुपारी 12 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Bus : एसटीला इलेक्ट्रिक बस वेळेवर न पुरविणाऱ्या कंपनीवर कारवाई नाही, व्यवस्थापनावर कुणाचा दबाव? श्रीरंग बरगे यांचा सवाल
एसटीला इलेक्ट्रिक बस वेळेवर न पुरविणाऱ्या कंपनीवर कारवाई नाही, व्यवस्थापनावर कुणाचा दबाव? श्रीरंग बरगे यांचा सवाल
North Maharashtra Rain Update : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा, काय सांगतो हवामान खात्याचा अंदाज?
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा, काय सांगतो हवामान खात्याचा अंदाज?
कोकणात पुन्हा ठाकरेंना धक्का? विनायक राऊतांचे कट्टर समर्थक ठोकणार रामराम, लवकर शिंदे गटात प्रवेश
कोकणात पुन्हा ठाकरेंना धक्का? विनायक राऊतांचे कट्टर समर्थक ठोकणार रामराम, लवकर शिंदे गटात प्रवेश
EPFO :ईपीएफओच्या व्याजदराला केंद्राची मंजुरी, पीएफ खात्यात 1 लाख रुपये जमा असल्यास व्याज किती मिळणार? 
EPFO :ईपीएफओच्या व्याजदराला केंद्राची मंजुरी, पीएफ खात्यात 1 लाख रुपये जमा असल्यास व्याज किती मिळणार? 
Preity Zinta : पंजाबच्या पराभवानंतर सहमालकीण प्रीती झिंटा का भडकली? पहाटे पावणे तीन वाजता कोणावर राग काढला? म्हणाली, ती अशी चूक नव्हती...
पंजाबच्या पराभवानंतर सहमालकीण प्रीती झिंटा का भडकली? पहाटे पावणे तीन वाजता कोणावर राग काढला? म्हणाली, ती अशी चूक नव्हती...
Share Market : सेन्सेक्सच्या टॉप 10  पैकी 6 कंपन्यांचं नुकसान, 78166 कोटी रुपयांचा तोटा, रिलायन्सला सर्वात मोठा फटका, पाच दिवसात काय घडल?
सेन्सेक्सच्या टॉप 10  पैकी 6 कंपन्यांचं नुकसान, 5 दिवसात 78166 कोटी रुपयांचा तोटा, रिलायन्सला सर्वात मोठा फटका
Delhi Weather Update : मुसळधार पाऊस आणि वादळाने देशाची राजधानी अक्षरश: तुंबली; 100 हून अधिक विमानांना फटका; सब इन्स्पेक्टरचा छत कोसळून मृत्यू
मुसळधार पाऊस आणि वादळाने देशाची राजधानी अक्षरश: तुंबली; 100 हून अधिक विमानांना फटका; सब इन्स्पेक्टरचा छत कोसळून मृत्यू
Sujay Vikhe on Satyajeet Tambe: मामा, भाचे, पुतणे कोणीही आलं तरी...; सत्यजीत तांबेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सुजय विखेंचं मोठं वक्तव्य
मामा, भाचे, पुतणे कोणीही आलं तरी...; सत्यजीत तांबेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सुजय विखेंचं मोठं वक्तव्य
Embed widget
OSZAR »