Vaishnavi Hagawane death: राजेंद्र हगवणेला थार देणाऱ्या चोंधे कुटुंबाची कुंडली बाहेर आली, पोरांना बायकांचा नाद, हुंड्यासाठी सूनेचा छळ

Vaishnavi Hagawane death: दारू, मुलींचा खूप नाद; मुलगी झाली म्हणून अन् हुंड्यासाठीही छळलं; हगवणेनं थार वापरली तो मित्रही तसलाच! पत्नीनं सांगितली आपबिती

Continues below advertisement

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या (Vaishnavi Hagawane death) प्रकरण समोर आल्यानंतर आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार असताना ज्या थारमध्ये बसून फिरत होते. त्या गाडीच्या मालकाबाबतची माहिती समोर आली आहे. त्या गाडीचा मालक संकेत नरेश चोंधे असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान संकेतची थार गाडी आणि त्याचा भाऊ सुयशची क्रेटा गाडी जप्त करण्यात आली आहे. चोंधे घरातील सुनेचा देखील पैशांसाठी आणि हुंड्यासाठी शारिरीक आणि मानसिक छळ केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वीस लाख हुंड्यासाठी सुयशच्या पत्नीचा छळ केला. तिनं त्याच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. त्याचबरोबर या त्रासानंतर तिनं महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली होती. याबाबत सुयशच्या पत्नीने एबीपी माझाशी बोलताना सर्व आपबिती सांगितली आहे. 

Continues below advertisement

चोंधेच्या पत्नीने खडक पोलिस ठाण्यामध्ये पाच महिन्यांपूर्वी दिलेली तक्रार

सुयश चोंधेच्या पत्नीने धनश्री चोंधे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, नवरा सुयश चोंधे याच्यासह घरातील सर्वांनी छळ केला. त्यांनी पैशांसाठी मानसिक, शारिरीक छळ केला आहे. माहेरून पैसे घेऊन ये म्हणून त्रास देत होते. मुलगी झाली म्हणून देखील त्यांनी त्रास दिला होता.  मुलगी झाली तेव्हापासून सासरच्यांनी काहीही तिचं पाहिलं नाही. माझ्या माहेरून तीचं शिक्षण आणि बाकी खर्च केला जातोय. सुयश चोंधेच्या पत्नीने खडक पोलिस ठाण्यामध्ये पाच महिन्यांपूर्वी तक्रार दिली होती. पण त्या तक्रारीनंतर देखील कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. राजेंद्र हगवणे आणि चोंधे कुटुंबाचे मैत्री संबंध आहेत. मी नोव्हेंबरपासून माझ्या माहेरी आहे. त्यामुळे मला तिकडची आत्ताची जास्त माहिती नाही. पण, हगवणे आणि चोंधे कुटुंबाचे मैत्रीसंबंध आहेत, अशी माहिती सुयश चोंधेच्या पत्नीने दिले आहेत.

दारू अन् मुलींचा खूप नाद

सासरचे शारिरीक मानसिक छळ करायचे. घरामध्ये वारंवार वाद व्हायचे. सकाळपासून रात्रीपर्यंत दारू प्यायचे. मुलींना घेऊन फिरायचं, हेच त्यांचं रूटीन होतं. शीतल उभे नावाची एक महिला आहे, ती मुळशीतील पोरांना मुली पुरवते असा धक्कादायक खुलासा देखील सुयश चोंधेच्या पत्नीने केला आहे. शीतल उभे नावाची महिला त्यांना मुलींचे फोटो पाठवायची, मग ते सिलेक्ट करून सांगायचे, त्यांना मुलींचा भरपूर नाद होता. ती उभे नावाची महिला मुली पाठवायची हे मला माहिती होतं. मी मोबाईलमध्ये पाहिलं होतं. ते सगळं पाहिल्यानंतर मी त्याचा स्क्रिनशॉट काढून घेतला होता. सासू, सासरे, दीर आणि नवरा त्रास द्यायचे. मी महिला आयोगाकडे देखील तक्रार केली होती. मात्र तिकडून देखील मला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असंही सुयश चोंधेच्या पत्नीने सांगितले आहे. चोंधेची आई गावची उपसरपंच होती. तिने आधी निवडणुका लढल्या आहेत. चोंधेंची पार्श्वभूमी देखील राजकारणातील आहे. 

सासूकडून काळ्या जादूचा प्रयोग अन् 

वैष्णवी हगवणे प्रकरण समोर आल्यानंतर सुरू झालेल्या तपासामध्ये आत्तापर्यंत हगवणेंना मदत करणाऱ्यांमधील आरोपी हे घरात अशाच पध्दतीने महिलांचा छळ करत असल्याची संतापजन माहिती समोर आली आहे. दरम्यान आपला शारिरीक आणि मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार सुयश चौंधे याच्या पत्नीने केली आहे. नवरा सुयश चौंधे, दीर संकेत चोंधे, सासरा नरेश चौंधे, सासू वैशाली चौंधे यांच्या विरोधात पोलिस आणि महिला आयोगामध्ये तक्रार केली होती. मात्र त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. चौंधे कुटुंबावर आरोप करणाऱ्या त्यांच्या सूनेने त्रासाला कंटाळू आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. चौंधे कुटुंबातील सूनेने त्यांच्यावर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. आपली सासू काळी जादू करते असा आरोप सूनेने केला आहे. लग्नात दोन लाख रुपये हुंडा दिला आणि दोन तोळं सोनंही दिलं होतं. परंतु लग्न झाल्यानंतर वारंवार पैशांची मागणी केली जात होती. त्यातून आपल्याला मारहाण केली जाते, आपला छळ केला जातो असं सूनेने तक्रारीत म्हटलं आहे.

नवऱ्याकडून अश्लील व्हिडीओ दाखवून छळ

तर नवरा सुयश चौंधे हा अश्लील व्हिडीओ दाखवून दाखवून शरीर संबंध ठेवण्यासाठी त्रास द्यायता. तर नवरा आणि दीर सासूसमोरच गांजा प्यायचे असं त्या सूनेने म्हटलंय. आपल्याला आणि आपल्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »