Pooja Khedkar : सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश, पूजा खेडकरला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश

Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकरला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.

Continues below advertisement

नवी दिल्लीराज्यासह देशात चर्चेत आलेल्या माजी आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकरला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहे. येत्या 2 मे रोजी सकाळी 10.30 वाजता पूजा खेडकरला (Pooja Khedkar) दिल्ली क्राइम ब्रांच समोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 21 मे रोजी होणार असल्याची माहितीही पुढे आली आहे.

Continues below advertisement

पूजा खेडकरला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश 

पुजा खेडकर प्रकरणी आज (21 एप्रिल) दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडत आहे. यावेळी दिल्ली पोलिसांच्या वतीने खेडकरच्या कोठडीची मागणी करण्यात आली. तर यावर युक्तिवाद करत असताना कोठडीत चौकशीची आवश्यकता नसल्याचे मत पूजा खेडकरच्या वकिलांनी न्यायालयात मांडत जोरदार युक्तिवाद केलाय. दरम्यान जोपर्यंत चौकशीत सहकार्य करेल तोपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम असेल. मात्र, आतापर्यंत पूजा खेडकरची ठोस चौकशी झालेली नसल्याचे निरीक्षण ही न्यायालयाने यावेळी मांडले आहे. तर पूजा खेडकर चौकशीसाठी हजर राहील आणि चौकशीत सहकार्य करेल, अशी ग्वाही खेडकरांच्या वकिलांनी यावेळी दिले आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देतं, आणि पूजा खेडकर चौकशीला कशा पद्धतीने समोर जातात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

सुनावणी दरम्यान नेमकं काय- काय झालं? 

दरम्यान, यावेळी माहिती देताना दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की,  पूजा खेडकर 12 वेळा परीक्षेला बसल्या. जरी त्या दिव्यांग असल्या तरीही 9 वेळा परीक्षा दिल्या जाऊ शकतात. त्यांनी नावे बदलली, १२ वेळा त्यांनी परीक्षा दिली. तर युपीएससीच्या वकिलांनी  युक्तिवाद करत असताना सांगितले की, पूजा खेडकरच्या पाठीशी एक पॉवरफुल सिस्टम आहे. तर यावर प्रतिवाद करतांना पूजा खेडकरचे वकील म्हणाले की, खेडेकर दिव्यांग आहेत आणि त्यासाठीचे प्रमाणपत्र तपासणी एम्सने केले आहे.

दरम्यान या सऱ्यावर बोलताना न्यायमूर्ती बेला त्रिवेदी म्हणाल्या की पूजा खेडेकर या चौकशीसाठी यायला तयार नाही का? पूजा खेडकरला बोलवा, त्यांना चौकशीसाठी बोलवा. मग बघूया त्या चौकशीतून काय समोर येईल. तुम्ही चौकशीसाठी बोलवा आणि तुम्ही आरोपपत्र दाखल करू शकता,  पूजाने सहकार्य करावे लागेल, असे निर्देश देत पूजा खेडकरला पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश देत जोपर्यंत चौकशीत सहकार्य करेल तोपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम राहील  असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या  
 

 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »