Pankaja Munde On Dhananjay Munde Resign: राजीनामा आधीच घ्यायला हवा होता; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडेंची 5 मोठी वक्तव्य
Pankaja Munde On Dhananjay Munde Resign: मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Pankaja Munde On Dhananjay Munde Resign: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या सहाय्याकांमार्फत आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरुन पायउतार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी पहिलं ट्वीट करुन सदसदविवेकबुद्धीला स्मरुन आणि वैद्यकीय कारणासाठी राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली आहे. (Dhananjay Munde Latest Marathi News)
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राज्यातील विविध नेत्यांची प्रतिक्रिया येत आहे. मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde On Dhananjay Munde Resign) यांनी देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. गेले काही आठवडे झाले, जेव्हापासून मी शपथ घेतली आहे त्यावेळीपासून मी वेळोवेळी या विषयावर व्यक्त झाली आहे. आज मी मुंबईवरून नागपुरात विमानात असेपर्यंत मुंबईत काय सुरू आहे मला माहित नव्हतं. आपण मला जे एकदम माईक लावून प्रश्न विचारला त्याची मला कल्पना नव्हती अजूनही माझं मुंबईत कोणाशी बोलणं झालं नाही. मी इंस्टाग्राम वर एक पोस्ट पाहिली,मी पंकजा गोपीनाथ मुंडे आहे म्हणून या विषयावर व्यक्त होणे अपेक्षित आहे म्हणून मी व्यक्त होत आहे. मी जे बोलणार आहे, त्यानंतर कुठल्याही प्रश्न उत्तरासाठी जागा राहणार नाही, हा माणूस विचार दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही तुम्ही मला प्रश्न विचारला यापूर्वी संतोष देशमुख यांच्या मारण्यासंदर्भातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. इंस्टाग्रामवर मी एक पोस्ट पाहिली, ते व्हिडिओ उघडण्याची किंवा बघायची माझी हिम्मत देखील झाली नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडेंचे 5 मोठे विधान-
1. ज्यावेळी या खुर्चीवर मी बसले तेव्हा मी एक शपथ घेतलेली आहे, आमदारकीची शपथ घेतलेली आहे, कुठलाही ममत्व भाव, कुठलाही कोणाविषयी आकस किंवा द्वेष न बाळगता काम केले पाहिजे यावर मी ठाम आहे.
2. संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येचा निषेध व्यक्त करताना मी मनापासून क्षमा मागते त्याच्या आईची, कारण ज्या मुलांनी ही हत्या केली आहे ते माझ्या पदरात असतील दिले तरीही त्यांना कडक शासन करा असे मी म्हटले असते, यापेक्षा कोणताही राजकीय नेता यापेक्षा वेगळे भाष्य करू शकणार नाही.
3. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला मी त्याचाही स्वागत करते, हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. उशीर झाला. राजीनामा यापेक्षा शपथच नाही द्यायला पाहिजे होती. त्यामुळे कदाचित पुढच्या भागांना सामोरे जावं लागलं नसतं.
4. धनंजय मुंडेंचा राजीनामा फार आधीच झाला असता, तर त्याला या सगळ्या वेदनांपासून गरिमामय मार्ग मिळाला असता.
5. मी त्यांची लहान बहीण आहे, आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम केलं होतं. पण कोणत्याही आईला-बहिणीला आपल्या परिवाराच्या सदस्याला या दुःखातून जावं लागेल. पण आपण खुर्चीवर बसून विचार करतो, तेव्हा आपण राज्याच्या प्रत्येकासारखा विचार केला पाहिजे. त्या परिवाराच्या जीवाच्या वेदनापुढे हे काही मोठे नाही, त्यांनी जो घेतलाय तो योग्य निर्णय आहे, देर आये दुरुस्त आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.