Nashik News: अधिवेशनाच्या सुरुवातीलाच भाजपचा धमाका, उत्तर महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश, कुणाल पाटील, अपूर्व हिरेंच्या हातात कमळ?
Nashik News: भाजपने उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गट खिळखिळा केला, यानंतर आणखी दोन बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Kunal Patil & Apurva Hire may join BJP: गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकमध्ये ठाकरे गट खिळखिळा करण्यासाठी पक्षप्रवेशाचा सपाटा लावलेल्या भाजपला आणखी एक मोठे यश मिळाले आहेत. लवकरच उत्तर महाराष्ट्रातील दोन बडे नेते हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि नाशिकचे माजी आमदार अपूर्व हिरे (Apurva Hire) हे दोघे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 1 जुलै रोजी भाजपचे संभाव्य भावी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पदग्रहण सोहळ्यावेळी हे दोन्ही नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
अपूर्व हिरे हे शिक्षक मतदार संघाचे आमदार होते. 2019 मध्ये अपूर्व हिरे यांनी भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात नाशिक पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेल्या सुधाकर बडगुजर यांना विरोध करणाऱ्या सीमा हिरे यांनी अपूर्व हिरे यांच्या भाजपा प्रवेशाचे स्वागत केले आहे. सुधाकर बडगुजर यांना शह देण्यासाठी अपूर्व हिरे यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
कुणाल पाटील हे धुळ्यातील काँगेसचे माजी आमदार आणि प्रमुख नेते होते. या पट्ट्यात त्यांचा प्रभाव आहे. कुणाला पाटील याच्या प्रवेशामुळे धुळ्यात भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. कुणाल पाटील हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जातात. मात्र, आता त्यांनीही पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून समर्थक आणि कार्यकर्त्यांना भाजप प्रवेश याबाबतचा निरोप पाठवण्यात आल्याची माहिती कुणाल पाटील यांच्या समर्थकांकडून देण्यात आली आहे. उद्या दुपारी दोन वाजता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Nashik News: सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे भाजपमध्ये
काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर नुकता विलास शिंदे यांनीही ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हातात घेतले होते. या दोन धक्क्यांमुळे नाशिकमध्ये ठाकरे गट खिळखिळा झाला आहे. विलास शिंदे आणि सुधाकर बडगुजर यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी गेले आहेत. आगामी नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ही गोष्ट भाजपच्या पथ्यावर पडणारी मानली जात आहे.
NCP Sharad Pawar Camp: शरद पवार गटाचे विजय भांबळे अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाणार
शरद पवारांची साथ सोडून उद्या माजी आमदार विजय भांबळे उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. विजय भांबळे यांनी भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात सेलू जिंतूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. नवाब मलिक यांच्या प्रयत्नातून विजय भांबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे. उद्या मुंबईत महिला विकास महामंडळाच्या कार्यालयात पक्षप्रवेशाचे आयोजन करण्यात आले आहे. विजय भांबळे यांच्या पक्षप्रवेशासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
आणखी वाचा
सुधाकर बडगुजरांचा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; 'ती' महत्त्वाची संघटना भाजपमध्ये विलीन करणार