एक्स्प्लोर

नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड

मुख्यमंत्रीपदाच्या आजच्या शपथविधी सोहळ्यात नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाने स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज शपथ घेतली. मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा आले आणि मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. मात्र, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद गेले, त्यांना उपमुख्यमंत्रीपदी शपथ घ्यावी लागल्याने आधीच शिवसेना नेते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यात, आजच्या शपथविधी सोहळ्यात योग्य मान-सन्मान न झाल्यावरून शिवसेना (Shivsena) शिंदे गट नाराज झाला आहे. शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. मात्र, आज लगेच पहिल्या दिवशी मी तक्रार करणार नाही, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, आजच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीयमंत्री, भाजपचे दिग्गज नेते, वरिष्ठ नेते, सेलिब्रिटी, उद्योगपती यांची मोठी गर्दी होती. याशिवाय आमदार, खासदार आणि महायुतीचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने आझाद मैदानावर उपस्थित होते. 

मुख्यमंत्रीपदाच्या आजच्या शपथविधी सोहळ्यात नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता. सगळे मुख्य नेते मागे बसले होते, तिन्ही पक्षात पासेस येणार होते, ते आले पण थोडाफार ढिसाळपणा जाणवल्याचे पावसकर यांनी म्हटलं. मुख्य स्टेजवर आमचे एक केंद्रीय मंत्री होते . पण, पक्षाची नेतेमंडळी पण असती तर बरं झालं असतं. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होतं की, आपला नेता का नसावा व्यासपीठावर, काही नेते जायला हवे होते स्टेजवर, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, राज शिष्टाचार प्रशासनाकडूनही कळत नकळत चूक झाली आहे. त्यामुळे, दखल तर घ्यावी लागेल, पण आज लगेच पहिल्या दिवशी आपण तक्रार करणार नाही, असेही पावसकर यांनी म्हटले.

दरम्यान, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तर, स्वतः एकनाथ शिंदे यांनीही आपण नाराज नसल्याचं सांगितलं. मात्र, एकनाथ शिंदे यांची आजची देहबोली पुन्हा एकदा नाराज असल्यासारखीच होती. शिंदे यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत, त्यामध्ये शपथविधीवेळी देखील त्यांचा चेहरा गंभीर दिसून येत आहे. त्यामुळे, महायुतीमध्ये तिसरा पक्ष आल्याने शिवसेना शिंदे गट अगोदरपासूनच नाराज असल्याची चर्चा होती. आता, महायुती 2 सरकारमध्ये सुरुवातीपासूनच नाराजी नाट्य उमटल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा

Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Train: रेल्वे स्टेशनवरील स्टॉल्स आठ दिवसांत काढा नाहीतर उखडून टाकू; मनसेच्या अविनाश जाधवांचा मध्य रेल्वेला अल्टिमेटम
रेल्वे स्टेशनवरील स्टॉल्स आठ दिवसांत काढा नाहीतर उखडून टाकू; मनसेच्या अविनाश जाधवांचा मध्य रेल्वेला अल्टिमेटम
Sonam Raghuvanshi Case : स्टेजवरच ढसाढसा रडला होता प्रियकर राज; सोनम म्हणाली, राजाशी लग्न करत असले, तरी....; कुटुंबही चक्रावलं
स्टेजवरच ढसाढसा रडला होता प्रियकर राज; सोनम म्हणाली, राजाशी लग्न करत असले, तरी....; कुटुंबही चक्रावलं
लग्नाचं आमिष दाखवून 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार, पोट दुखू लागल्यानं धक्कादायक प्रकार समोर, बीडचं माजलगाव हादरलं
लग्नाचं आमिष दाखवून 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार, पोट दुखू लागल्यानं धक्कादायक प्रकार समोर, बीडचं माजलगाव हादरलं
Neha Pendse : हिरव्या साडीत नेहा पेंडसे दिसतेय खूपच हॉट; पाहा खास फोटो!
Neha Pendse : हिरव्या साडीत नेहा पेंडसे दिसतेय खूपच हॉट; पाहा खास फोटो!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Prakash Mahajan on Narayan Rane : नारायण राणेंनी धमकी दिल्याचा आरोप, प्रकाश महाजन आक्रमकAmol Kolhe NCP Vardhapan Din : शरद पवारसाहेब सांगतिल ते सांगतील ते धोरण, बांधतील ते तोरणABP Majha Headlines : 10:00AM : 10 June 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVilas Shinde Nashik : सुधाकर बडगुजरांवर हल्लाबोल;नाराज विलास शिंदे राऊतांची भेट घेणार ABP MAJHA

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train: रेल्वे स्टेशनवरील स्टॉल्स आठ दिवसांत काढा नाहीतर उखडून टाकू; मनसेच्या अविनाश जाधवांचा मध्य रेल्वेला अल्टिमेटम
रेल्वे स्टेशनवरील स्टॉल्स आठ दिवसांत काढा नाहीतर उखडून टाकू; मनसेच्या अविनाश जाधवांचा मध्य रेल्वेला अल्टिमेटम
Sonam Raghuvanshi Case : स्टेजवरच ढसाढसा रडला होता प्रियकर राज; सोनम म्हणाली, राजाशी लग्न करत असले, तरी....; कुटुंबही चक्रावलं
स्टेजवरच ढसाढसा रडला होता प्रियकर राज; सोनम म्हणाली, राजाशी लग्न करत असले, तरी....; कुटुंबही चक्रावलं
लग्नाचं आमिष दाखवून 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार, पोट दुखू लागल्यानं धक्कादायक प्रकार समोर, बीडचं माजलगाव हादरलं
लग्नाचं आमिष दाखवून 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार, पोट दुखू लागल्यानं धक्कादायक प्रकार समोर, बीडचं माजलगाव हादरलं
Neha Pendse : हिरव्या साडीत नेहा पेंडसे दिसतेय खूपच हॉट; पाहा खास फोटो!
Neha Pendse : हिरव्या साडीत नेहा पेंडसे दिसतेय खूपच हॉट; पाहा खास फोटो!
Mumbai Local Train Accident: मुंब्रा लोकल ट्रेन अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी डोंबिवली स्थानकात भयावह दृश्य, एसी लोकलच्या दरवाजाला प्रवाशी लटकले
मुंब्रा लोकल ट्रेन अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी डोंबिवली स्थानकात भयावह दृश्य, एसी लोकलच्या दरवाजाला प्रवाशी लटकले
Vilas Shinde : आठवडाभरात एकनाथ शिंदेंची दोनदा भेट, सुधाकर बडगुजरांवर हल्लाबोल करत आता नाराज विलास शिंदे राऊतांच्या भेटीला
आठवडाभरात एकनाथ शिंदेंची दोनदा भेट, सुधाकर बडगुजरांवर हल्लाबोल करत आता नाराज विलास शिंदे राऊतांच्या भेटीला
Gadchiroli tree cutting: गडचिरोलीत लोह खाणींसाठी 1 लाख झाडांची कत्तल होणार, सरकारचा हिरवा कंदील
गडचिरोलीत लोह खाणींसाठी 1 लाख झाडांची कत्तल होणार, सरकारचा हिरवा कंदील
Jayant Patil NCP Adhiveshan:  मोठी बातमी : मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा, वर्धापन दिनी जयंत पाटील यांची मागणी!
मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा, वर्धापन दिनी जयंत पाटील यांची मागणी!
Embed widget
OSZAR »