विधानसभेवर शिवसेनेचा, तर विधान परिषदेवर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता; मविआच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Mumbai: विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात ठाकरे सेना येत्या दोन दिवसात निर्णय घेऊन विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement

Mumbai: विधानसभा विरोधी पक्ष नेते पदासंदर्भात ठाकरे सेना येत्या दोन दिवसात निर्णय घेऊन विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अनुषंगाने आजच्या (3 मार्च) महाविकास आघाडीच्या बैठकीत तिन्ही पक्षांची विस्तृत चर्चा झाली. या चर्चेत विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर ठाकरेंची शिवसेना दावा करत असल्याने आजच्या महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुद्धा तोंडी सहमती  (पाठिंबा ) दर्शवली असल्याची माहिती ही पुढे आली आहे. तर ठाकरेंची शिवसेना विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर दावा करत असेल तर विधान परिषदेवर काँग्रेस पक्ष दावा करेल, अशी भूमिका काँग्रेस पक्षाने मांडल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे.

Continues below advertisement

मविआच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यानंतर विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर दावा केला जावा, असं ठाकरेंच्या शिवसेनेकडून मत मांडण्यात आलंय. यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं सांगण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून सतेज पाटील यांचे नाव चर्चेत आहे. मात्र विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचं नाव ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केल्यानंतर काँग्रेस आपलं विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाचे नाव जाहीर करेल असेही सांगण्यात आलंय. सध्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडे 20 आमदार, काँग्रेस पक्षाकडे 16 आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाकडे 10 आमदार आहेत.

त्यामुळे विधानसभा सभागृहात  ठाकरेंच्या शिवसेनेचे संख्याबळ अधिक आहे. तर विधान परिषदेचा संख्याबळ पाहता ठाकरेंची शिवसेना सात आमदार आणि काँग्रेस पक्षाचे सुद्धा सात आमदार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचा एका आमदाराचा कार्यकाळ ऑगस्टपर्यंत आहे. त्यामुळे संख्याबळाचा विचार करता काँग्रेस विधान परिषद विरोधी पक्ष नेते पदावर दावा करणार असल्याचे बोललं जात आहे. 

या अधिवेशनात तरी विधानसभा विरोधी पक्षनेते पद मिळणार का?

दरम्यान, दुसरीकडे पुरेसं संख्याबळ नसलेल्या महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांपैकी एकाही पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळवण्या एवढ्या जागाही जिंकता आलेल्या नाहीत. जर विधानसभा अध्यक्षांनी ठरवलं तरच विरोधकांना हे पद मिळू शकतं अशा चर्चा सुरू आहेत. या अधिवेशनात तरी विधानसभा विरोधी पक्षनेते पद मिळणार का? असा सवाल उपस्थित होत असताना विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीसाठी कोणतेही खास तरतूद नसल्याचं विधिमंडळ सचिवांनी ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांना उत्तर दिलंय. विरोधी पक्ष नेता निवडीचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याचेही त्यांनी सांगितलंय. 

अशातच या वर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, विरोधीपक्ष नेतेपदी नक्कीच आमचा हक्क आहे. सत्ता कोणाची ही असो, विरोधीपक्षाने आपली कामगिरी चोख बजावली पाहिजे. तुम्ही जरी संशयास्पद निवडून आला असलात तरी भ्रष्टाचारांना वेसन घालण्यासाठी लोकशाहीने तो हक्क दिलाय. विरोधीपक्ष नेत्याचा निर्णय विधीमंडळ पक्ष घेतो. असेही संजय राऊत म्हणाले. 

हे ही वाचा 

 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »