एक्स्प्लोर

10 तास उलटूनही फलटणमधील निंबाळकरांच्या घरावर इन्कम टॅक्सची झाडाझडती; कार्यकर्ते आक्रमक, निषेध मोर्च्याचे आयोजन 

Sanjeevraje Naik Nimbalkar : संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची दहा तास उलटूनही आयकर विभागाकडून चौकशी अद्याप सुरूच असल्याचे पुढे आले आहे.

सातारा: माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar)  यांचे बंधु संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar) आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर(Raghunath Raje Naik Nimbalkar)  यांच्या घरावर आज (5 फेब्रुवारी) सकाळी आयकर विभागानं छापा टाकाला होता. दरम्यान, सकाळी 6 वाजतापासून सुरू असलेल्या या कारवाईला आता दहा तास उलटले असूनही ही चौकशी अद्याप सुरूच असल्याचे पुढे आले आहे. मात्र ही धाड नेमकी कशामुळे आणि धाडीचे कारण काय? हे अद्याप कळू शकलेले नाही. दुसरीकडे या कारवाई विरोधात निंबाळकरांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून आज सकाळपासून निंबाळकर यांच्या घरावराबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.

दरम्यान, या कारवाईच्या विरोधात फलटणमधील राजे गटाचे कार्यकर्ते आता अधिक आक्रमक झाले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकल्याच्या निषेधार्थ उद्या(6 फेब्रुवारी) फलटणमध्ये निषेध मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या कारवाईच्या विरोधात सकाळपासून संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar), रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते गेटवर ठाण मांडून बसले आहे. यात माजी आमदार दीपक चव्हाण हे देखील सकाळपासून गेटवर ठाण मांडून बसल्याचे दिसून आले आहे.

अधिकार्‍यांकडून प्रश्नांची सरबत्ती

इनकम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास रघुनाथराजे आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर आणि गोविंद दूध डेअरीवर धाडी टाकल्या आहेत. एकाचवेळी पुणे, मुंबई आणि फलटण येथील निवासस्थानी धाडी टाकण्यात आल्या आहेत. रघुनाथराजे यांचे स्वीय सहायक महेश ढवळे यांच्या घरी देखील धाडी टाकण्यात आल्या आहेत. घरातील सोन्याच्या आणि चांदीच्या वस्तू कुठून आल्या, घरात असलेली रक्कम तसेच विविध ठिकाणचे आर्थिक व्यवहार याबाबत चौकशी अधिकारी यांच्याकडून प्रश्न विचारण्यात आले. आज सकाळपासून संजीवराजे आणि रघुनाथराजे यांना प्रश्न विचारल्यानंतर घरातील कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्य यांना देखील प्रश्न विचारणं सुरू आहे. तर निंबाळकर कुटुंबियांकडून आपण व्यवस्थित असून कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. 

रामराजे निंबाळकरांकडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन 

आयकर विभागाच्या छाप्यानंतर संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी घराबाहेर सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे. आक्रमक कार्यकर्त्यांच्या अनुषंगाने पोलिसांनी ही तबडा बंदोबस्त घराबाहेर तैनात केला आहे. अशातच 'कृपया घरा बाहेर गर्दी करू नका, खात्याला आपले काम करू द्या, काळजी नसावी'  अशी पोस्ट करत रामराजे निंबाळकरांनी  कार्यकर्त्यांना शांत राहून सहकार्य करण्याचे आवाहन केलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 


 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आदित्य ठाकरेंनी आडनाव बदलून खान किंवा शेख करावे; 'बकरी ईद'वरुन मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
आदित्य ठाकरेंनी आडनाव बदलून खान किंवा शेख करावे; 'बकरी ईद'वरुन मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
सिंधुताईंच्या आश्रमातील मुली लग्नासाठी देतो म्हणत पैशांची मागणी; फसवणूक करणाऱ्या भामट्यांविरुद्ध गुन्हा
सिंधुताईंच्या आश्रमातील मुली लग्नासाठी देतो म्हणत पैशांची मागणी; फसवणूक करणाऱ्या भामट्यांविरुद्ध गुन्हा
... तर राजकारण सोडून देईन; सुधाकर बडगुजरांचे शिवसेना नेतृत्वालाच चॅलेज, सगळंच सांगितलं
... तर राजकारण सोडून देईन; सुधाकर बडगुजरांचे शिवसेना नेतृत्वालाच चॅलेज, सगळंच सांगितलं
बुलढाण्यात ट्रक-दुचाकी अन् कारचा भीषण अपघात; हायवेवरील तिहेरी दुर्घटनेत तिघांचा मृत्यू
बुलढाण्यात ट्रक-दुचाकी अन् कारचा भीषण अपघात; हायवेवरील तिहेरी दुर्घटनेत तिघांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RCB Victory Parade Stampede : क्रिकेटला गालबोट,सेलिब्रेशनला डाग; बंगळुरुतील चेंगराचेंगरीचं कारण काय?D K Shivakumar on RCB Stampede : बंगळुरुत चेंगराचेंगरीवर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रियाRCB Victory Parade Stampede : चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; 7 जणांचा मृत्यूSudhakar Badgujar: सुधाकर बडगुजरांची पक्षातून हकालपट्टी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आदित्य ठाकरेंनी आडनाव बदलून खान किंवा शेख करावे; 'बकरी ईद'वरुन मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
आदित्य ठाकरेंनी आडनाव बदलून खान किंवा शेख करावे; 'बकरी ईद'वरुन मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
सिंधुताईंच्या आश्रमातील मुली लग्नासाठी देतो म्हणत पैशांची मागणी; फसवणूक करणाऱ्या भामट्यांविरुद्ध गुन्हा
सिंधुताईंच्या आश्रमातील मुली लग्नासाठी देतो म्हणत पैशांची मागणी; फसवणूक करणाऱ्या भामट्यांविरुद्ध गुन्हा
... तर राजकारण सोडून देईन; सुधाकर बडगुजरांचे शिवसेना नेतृत्वालाच चॅलेज, सगळंच सांगितलं
... तर राजकारण सोडून देईन; सुधाकर बडगुजरांचे शिवसेना नेतृत्वालाच चॅलेज, सगळंच सांगितलं
बुलढाण्यात ट्रक-दुचाकी अन् कारचा भीषण अपघात; हायवेवरील तिहेरी दुर्घटनेत तिघांचा मृत्यू
बुलढाण्यात ट्रक-दुचाकी अन् कारचा भीषण अपघात; हायवेवरील तिहेरी दुर्घटनेत तिघांचा मृत्यू
Elon Musk : मी आता ते सहन करू शकत नाही, ज्यांनी यांना मतदान केलं त्यांना लाज वाटली पाहिजे! ट्रम्प यांच्या 'त्या' विधेयकावर मस्क भलतेच भडकले
मी आता ते सहन करू शकत नाही, ज्यांनी यांना मतदान केलं त्यांना लाज वाटली पाहिजे! ट्रम्प यांच्या 'त्या' विधेयकावर मस्क भलतेच भडकले
RCB Victory Parade Stampede : मोफत आणि मर्यादित पासेस, आरसीबीच्या विजयी जल्लोषापूर्वी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर अचानक गर्दी वाढली अन्  10  जणांचा मृत्यू
मोफत आणि मर्यादित पासेस, आरसीबीच्या विजयी जल्लोषापूर्वी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर अचानक गर्दी वाढली अन्  10  जणांचा मृत्यू
RCB Victory Celebrations Stampede : आरसीबीच्या विजयी जल्लोषाला गालबोट, चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृ्त्यू
आरसीबीच्या विजयी जल्लोषाला गालबोट, चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृ्त्यू
Repo Rate : गृहकर्जदारांसाठी गुड न्यूज, आरबीआय 0.50 टक्क्यांनी रेपो रेट घटवणार? देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकेचा अंदाज
गृहकर्जदारांसाठी गुड न्यूज, आरबीआय 0.50 टक्क्यांनी रेपो रेट घटवणार? देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकेचा अंदाज
Embed widget
OSZAR »