एक्स्प्लोर

Dhananjay Munde: धनंजय मुंडे लोकांमधून निवडून आलेत, तुमची ग्रामपंचायतीला निवडून येण्याची तरी... गुणरत्न सदावर्तेंचा अंजली दमानियांवर हल्लाबोल

Dhananjay Munde & Anjali Damania: धनंजय मुंडे यांच्यावर कृषी खात्याच्या खरेदीत घोटाळ केल्याचा गंभीर आरोप आहे. संतोष देशमुख प्रकरणामुळे धनंजय मुंडे अगोदरच वादाच्या भोवऱ्यात.

मुंबई: राज्याचं मंत्रिमंडळ कोणाच्या बापाच्या घरचं नसतं. हे मंत्रिमंडळ भारताच्या संविधानामुळे अस्तित्त्वात आले आहे. लोकांमधून लोक निवडले जातात. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे लोकांमधून निवडून आले आहेत. त्यांचा राजीनामा मागणाऱ्या अंजली दमानिया कोण?, असा सवाल गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी उपस्थित केला. अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी धनंजय मुंडे यांच्या कृषीमंत्रिपदाच्या कार्यकाळात झालेल्या कथित घोटाळ्यांची जंत्री मांडत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याविरोधात गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी दंड थोपटले आहेत. 

गुणरत्न सदावर्ते यांनी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना म्हटले की, आम्ही भगवान बाबांना मानणारे लोक आहोत. अंजली दमानिया किंवा अन्य कोणी म्हटल्यामुळे धनंजय मुंडे यांची खुर्ची कोणीही घेऊ शकत नाही. धनंजय मुंडे यांच्यावर लाखो-करोडो लोकांचे प्रेम आहे. धनंजय मुंडे यांना जनतेने लाखांच्या मताधिक्याने निवडून दिले आहे. अंजली दमानिया आधी तुम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिंकून दाखवा. स्वत:ची उंची तयार करा. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणाऱ्या तुम्ही कोण?, असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता यावर अंजली दमानिया काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अंजली दमानियांकडून धनुभाऊंवर कृषी खात्यात घोटाळ्याचे आरोप

अंजली दमानिया आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या कृषीमंत्रिपदाच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. मंत्रिमंडळात जो निर्णय झालाच नाही त्याचा आदेश काढून धनंजय मुंडे यांनी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. 23 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबरच्या कॅबिनेटचे काही निर्णय झाले. पण यात कृषी विभागाशी संबंधित न झालेल्या निर्णयांबाबत धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) आदेश काढला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत 200 कोटींच्या निधीचा कुठेही उल्लेख नसताना ती रक्कम आजच अदा करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी पत्रातून केले, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. मात्र, धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून पत्रक काढून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले होते.

आणखी वाचा

मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला नाही तरी धनंजय मुंडेंनी टेंडर काढले अन्...; एबीपी माझाच्या हाती लागली महत्त्वपूर्ण कागदपत्र, नेमके काय आहे प्रकरण?

अंजलीताईंच राहू द्या, माझ्यावर खटला दाखल करा, मी पुराव्यासह बोलतो; सुरेश धसांचे धनंजय मुंडेंना चॅलेंज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amol Mitkari on Ajit Pawar : पुढच्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री अजित पवार पांडुरंगाची शासकीय पूजा करतील; अमोल मिटकरींचं स्फोटक वक्तव्य
पुढच्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री अजित पवार पांडुरंगाची शासकीय पूजा करतील; अमोल मिटकरींचं स्फोटक वक्तव्य
Sangli Rain Update: सांगलीतील चांदोली परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी; 24 तासात 99 मिलिमीटर पावसाची नोंद
सांगली : चांदोली परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी; 24 तासात 99 मिलिमीटर पावसाची नोंद
Nashik Rain Update : फक्त तासाभराच्या जोरदार पावसाने नाशिक तुंबलं, गुडघाभर पाण्यातून वाहने चालवण्याची वेळ, गोदावरीच्या पाणीपातळीतही वाढ
फक्त तासाभराच्या जोरदार पावसाने नाशिक तुंबलं, गुडघाभर पाण्यातून वाहने चालवण्याची वेळ, गोदावरीच्या पाणीपातळीतही वाढ
Satara Rain Update: महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळली; काही महिन्यांपूर्वी केलेला रस्ता तब्बल 10 फूट खचला
महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळली; काही महिन्यांपूर्वी केलेला रस्ता तब्बल 10 फूट खचला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kolhapur Crime : मदरशात हत्याकांड, वीजेचा शॉक देऊन संपवलं! Special ReportABP Majha Headlines : 01:00PM : 19 June 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Rain : पुण्यात हिंगणे साईनगरमध्ये रस्त्याला धबधब्याचं रूप, घरांमध्ये शिरलं पाणीSambhajinaar Robbery : चोरीचा छडा! जादूटोण्याचा उलगडा! लड्डा चोरी प्रकरणात मोठा ट्वीस्ट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amol Mitkari on Ajit Pawar : पुढच्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री अजित पवार पांडुरंगाची शासकीय पूजा करतील; अमोल मिटकरींचं स्फोटक वक्तव्य
पुढच्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री अजित पवार पांडुरंगाची शासकीय पूजा करतील; अमोल मिटकरींचं स्फोटक वक्तव्य
Sangli Rain Update: सांगलीतील चांदोली परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी; 24 तासात 99 मिलिमीटर पावसाची नोंद
सांगली : चांदोली परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी; 24 तासात 99 मिलिमीटर पावसाची नोंद
Nashik Rain Update : फक्त तासाभराच्या जोरदार पावसाने नाशिक तुंबलं, गुडघाभर पाण्यातून वाहने चालवण्याची वेळ, गोदावरीच्या पाणीपातळीतही वाढ
फक्त तासाभराच्या जोरदार पावसाने नाशिक तुंबलं, गुडघाभर पाण्यातून वाहने चालवण्याची वेळ, गोदावरीच्या पाणीपातळीतही वाढ
Satara Rain Update: महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळली; काही महिन्यांपूर्वी केलेला रस्ता तब्बल 10 फूट खचला
महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळली; काही महिन्यांपूर्वी केलेला रस्ता तब्बल 10 फूट खचला
Mumbai Crime Sathaye college: मोठी बातमी: साठ्ये कॉलेजच्या इमारतीवरुन विद्यार्थिनीची उडी, 21 वर्षाच्या संध्याचं टोकाचं पाऊल!
साठ्ये कॉलेजच्या इमारतीवरुन विद्यार्थिनीची उडी, 21 वर्षाच्या संध्याचं टोकाचं पाऊल!
विद्यमान पाकिस्तानी लष्करप्रमुखांना इतिहासात प्रथमच थेट व्हाईट हाऊसमध्ये पायघड्या; असीम मुनीर आणि ट्रम्प यांची लंच पे चर्चा! मुनीरांची सुद्धा मोठी मागणी
विद्यमान पाकिस्तानी लष्करप्रमुखांना इतिहासात प्रथमच थेट व्हाईट हाऊसमध्ये पायघड्या; असीम मुनीर आणि ट्रम्प यांची लंच पे चर्चा! मुनीरांची सुद्धा मोठी मागणी
Plane Emergency Landings: देशातील विमानसेवेतील रडगाणी संपता संपेनात; आज पुन्हा दोन विमानांचे आपत्कालिन लँडिंग
देशातील विमानसेवेतील रडगाणी संपता संपेनात; आज पुन्हा दोन विमानांचे आपत्कालिन लँडिंग
Raigad Heavy Rain: जगबुडीने इशारा पातळी ओलांडली, नदीचं पाणी शहरात घुसलं, रायगड जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस
जगबुडीने इशारा पातळी ओलांडली, नदीचं पाणी शहरात घुसलं, रायगड जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस
Embed widget
OSZAR »