Ambadas Danve : अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
Ambadas Danve : मुंबई पोलिसांतील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत केलाय.

Ambadas Danve : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी विधान परिषदेत (Vidhan Parishad) पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकलाय. मुंबई पोलिसांतील (Mumbai Police) मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा आरोप त्यांनी विधान परिषदेत केलाय. अंबादास दानवे यांनी सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांना पेन ड्राईव्ह दिलाय. त्यात पाकिस्तानी लोकांसोबतचे संभाषण असून मुंबई पोलीस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांची त्यांना मदत होते, याबाबतची माहिती दिली आहे. अंबादास दानवे यांच्या गंभीर आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतमुंबई पोलिसांतील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा आरोप केलाय. बेटिंग करणाऱ्यांमध्ये मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन या व्यक्तींचा समावेश असून त्यांच्याकडून पाकिस्तानी खेळाडूंचा यासाठी वापर केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लोटस 24 नावाच्या ऍपच्या माध्यमातून बेटिंग केल्यानंतर आता या सर्व व्यक्ती मुंबईत आयपीएलसाठी आल्याची माहिती अंबादास दानवे यांनी सभागृहाला दिली आहे.
नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे?
अंबादास दानवे म्हणाले की, माझ्याकडे एक पेन ड्राईव्ह आहे. तो मी सभापती महोदय आपल्याला देत आहे. एक क्रिकेट बॅटिंग लोटस 24 नावाचे ॲप आहे. यात मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन हे सातत्याने बेटिंग करतात. पाकिस्तानमधील खेळाडूंशी या लोकांचे संपर्क आहेत. मुंबई पोलिसांसोबत यांच्या खुलेआम बैठक होतात. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लोटस 24 नावाच्या ऍपच्या माध्यमातून बेटिंग केल्यानंतर आता या सर्व व्यक्ती मुंबईत आयपीएलसाठी आल्या आहेत. या राज्यात खुलेआम पोलिसांच्या सहकार्याने अशा घटना आहेत, असा गंभीर आरोप करत अंबादास दानवे यांनी सभापती राम शिंदे यांना दिलेल्या पेन ड्राईव्हमध्ये पाकिस्तानी लोकांसोबतचे संभाषण असून यामध्ये कशाप्रकारे मुंबई पोलीस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांची मदत होते? याबाबत माहिती सभागृहात दिली आहे.
टपरीवाल्यांवर काय कारवाई करता? पोलिसांवर करा
दरम्यान, अंबादास दानवे यांनी राज्यात गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर गुटखा येतो, असा आरोप देखील केलाय. त्यांनी म्हटलंय की, आष्टी येथे 18 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. जळगाव जामोद येथे 25 लाखांचा गुटखा जप्त, गडचिरोलीला दहा लाखाचा गुटखा टपरीवाल्यांकडून जप्त केला. गुजरातमधून खुलेआम पोलिसांच्या संरक्षणात राज्यात गुटखा येत आहे. तुम्ही या टपरीवाल्यांवर काय कारवाई करता? पालघरमधून खुलेआम तिथले पोलीस अधिकारी आणि परिवहन विभागाचे अधिकारी मदत करता आणि तुम्ही आष्टीला दोन लाखाची कारवाई करता, गडचिरोलीला आठ लाखाची कारवाई करता. यात जर कारवाई करायची असेल तर पालघरचे पोलीस अधिकारी आणि परिवहन अधिकारी यांच्यावर कारवाई करा, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

