ठाकरे गटाला गळती सुरूच! भाजपने दिला मोठा धक्का, उद्धव ठाकरेंचा नाशिकमधील बडा मोहरा गळाला लावला!
Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहे. आता नाशिकमधील बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

Uddhav Thackeray : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) जोरदार दणका दिला होता. महायुतीमधील (Mahayuti) अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीने जोरदार पुनरागनम केले होते. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. तब्बल 232 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला जेमतेम पन्नासचाच आकडा गाठता आला होता. महाविकास आघाडीच्या पराभवानंतर महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करताना दिसत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) धक्क्यावर धक्के बसत आहेत. आता नाशिकच्या निफाडमधील ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) हे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे निफाडमध्ये (Niphad) ठाकरे गटाला मोठा हादरा बसणार असल्याचे दिसून येत आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत निफाड विधानसभा मतदारसंघात (Niphad Vidhan Sabha Constituency) महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाने विद्यमान आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) अनिल कदम (Anil Kadam) यांना उमेदवारी दिली होती. निफाड विधानसभा मतदारसंघात दिलीप बनकर यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल कदम यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम हे भाजपच्या वाटेवर आहेत. अनिल कदम हे आपल्या कार्यकर्त्यांसह आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे निफाडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्येही ठाकरे गटाला धक्का
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर मतदारसंघांसाठी लढलेल्या दिनेश परदेशींनी पुन्हा भाजपमध्ये जाण्याचं ठरवलं असून मोजून 5 महिन्यांनी ते आज भाजपात प्रवेश करणार आहेत. दिनेश परदेशी यांच्या प्रवेशासाठी कार्यकर्ते भल्या पहाटे वैजापूरहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
