नाशिक शहर बस सेवा पुन्हा वादात, नोकरीच्या आमिषाने कर्मचाऱ्यांची लाखोंची फसवणूक, 46 कर्मचाऱ्यांची एकदाच तक्रार
Nashik City BUs: बस सेवेतील अधिकाऱ्यांडून कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक तर आहेच पण हीन वागणूक दिल्यानेही आता नाशिकची सिटी बस पुन्हा चांगलीच चर्चेत आलीय.

Nashik: नाशिक महानगरपालिकेच्या शहर बस सेवा अर्थात सिटी लिंकमध्ये नोकरीस लावून देण्याच्या आमिषाने सिटी लिंक कर्मचाऱ्यांचीच अधिकाऱ्यांकडून दहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक महानगरपालिकेडून नाशिककरांच्या सेवेसाठी शहर बस सेवा सुरू करण्यात आली. मात्र नाशिकची शहर बस सेवा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी नाशिक शहर बसवेत नोकरीच्या आमिषाने सर बस सेवेतील अधिकाऱ्यांनीच कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. (Nashik City Bus)
सुनील कोल्हे या शहर बसेवेतील कर्मचाऱ्याने बस सेवेत लाईन चेकिंग पदाची नोकरी मिळून देण्याच्या बहाण्याने आणि वेळोवेळी अधिकाऱ्यांनी डिपॉझिटच्या नावाने पैसे घेतल्याची तक्रार मुंबई नाका पोलिसात केली. नोकरी न देता पैसे पुन्हा मागितल्यानंतर वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून जातीवाचक शिवीगाळ आणि अपमानाची वागणूक देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
संगनमताने फसवणूक, गुन्हा दाखल
शहर बस सेवेतील मनोहर भोळे राजेश वाघ व सुरेश भदाणे यांनी संगणमत करून सुनील कोल्हे यांची फसवणूक केल्या प्रकारे मुंबई नाका पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र असे काही घडलेच नाही पोलिसात गुन्हा दाखल झाल्याचे हे आम्हाला माहित नाही असे संबंधित गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी म्हटले. नाशिकच्या शहर बस सेवेतील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर आत्तापर्यंत मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये 46 तक्रारदाराने तक्रार देत वेळोवेळी पैसे घेऊन अधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी दिल्याची माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली.
एकाच वेळी 46 कर्मचाऱ्यांकडून फसवणूकीची तक्रार
नाशिक शहर बस सेवेच्या माध्यमातून शहरात शहरवासीयांना मोठ्या प्रमाणात सुरळीत सेवा पुरवले जाते मात्र कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शहर व सेवा नेहमीच चर्चेत असते. कोटी रुपयांचा तोटा सहन करून नाशिक महानगरपालिकेकडून शहर बस सेवा सुरू आहे मात्र शहर बस सेवीतीलच अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांचे आर्थिक फसवणूक आणि हिन वागणूक दिल्याच्या या घटनेमुळे शहर बस सेवा पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे. एकाच वेळी 46 कर्मचाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारीनंतर आता या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते हे बघणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
