Nashik Accident : वडिलांसोबत किराणा खरेदी करून निघाली, वाटेतच चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक, 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी अंत

Nashik Accident : किराणा खरेदी करून परतणाऱ्या 16 वर्षीय मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

Continues below advertisement

Nashik Accident : किराणा खरेदी करून परतणाऱ्या 16 वर्षीय मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या (Nashik Accident) नांदूर लिंक रोडवरील बेंच मार्क इमारतीजवळ घडली. वडील आणि मुलगी दुचाकीवरून जाताना अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यात अनुष्का शांताराम निमसे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर वडील शांताराम निमसे हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

Continues below advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, शांताराम पुंडलिक निमसे (43, रा. नांदूर, कमळवाडी, संभाजीनगर रोड) हे आपल्या दुचाकी क्रमांक (एमएच 15 बीआर 3545) वरून मुलगी अनुष्कासोबत गुरुवारी सायंकाळी कोणार्कनगर परिसरात किराणा माल खरेदीसाठी गेले होते.  

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक

किरणा खरेदी करून घरी परत येत असताना जत्रा चौक, नांदूर नाका लिंक रोडवरील बेंचमार्के बिल्डिंग समोरून जात असताना मागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. धडक दिल्यानंतर चारचाकी वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या वाहनचालकाचा पोलिसांकडून शोध घेण्याचे काम सुरू आहे. 

16 वर्षीय मुलीचा मृत्यू

या धडकेत शांताराम निमसे व अनुष्का हे दोघे दुचाकीवरून खाली पडले. शांताराम निमसे यांच्या उजव्या खांद्याला, कमरेला व डोक्यास मार लागून दुखापत झाली. मुलगी अनुष्काच्या डोक्यास, हातास आणि दोन्ही पायांना मार लागून गंभीर दुखापत झाली होती. दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना अनुष्काचा मृत्यू झाला आहे. तिच्या पश्चात आई, वडील आणि लहान बहीण असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

Beed Accident: बीडच्या गढी पुलावर भीषण अपघात, अपघातामधून वाचले पण ट्रकने चिरडले, सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

Chhatrapati Sambhaji Nagar crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून गुन्हेगाराचा एन्काऊंटर, वडगाव-कोल्हाटीत मध्यरात्री धडाधड फायरिंग अन्...

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »