ट्रेंडिंग
Mumbai Crime News: लग्नापूर्वीच्या प्रियकराशी प्रेमसंबंध; अडथळा ठरणाऱ्या पतीला संपवण्याचा प्लॅन, प्रियकरानं चाकूनं वार करत केला खून, मुंबईतील घटना
Mumbai Crime News: आरोपींचे लग्नाच्या आधीपासून प्रेमसंबंध होते. मात्र, सुमय्याच्या कुटुंबाने तिचं लग्न इस्माइल अली शेख याच्यासोबत लावून दिलं. लग्नानंतरही त्यांचे प्रेमसंबंध तसेच होते.
मुंबई: प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या (Mumbai Crime News) ॲण्टाॅप हिल परिसरातील बंगाली पुरा, राजीव गांधी झोपडपट्टी येथे ही घटना घडली आहे. या हल्यात इस्माइल अली शेख याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी प्रियकर सकलाईन गोलम किब्रिया शेख याला पोलिसांनी (Mumbai Crime News) अटक केली आहे. तर पत्नी सुमय्या ईस्माइल शेख ही सध्या फरार आहे. प्रियकर सकलाईन आणि सुमय्या या दोघांमध्ये लग्नापूर्वीपासून प्रेमसंबध होते.(Mumbai Crime News)
नेमकं काय प्रकरण?
मात्र, सुमय्याचा विवाह हा इस्माइलसोबत लावून दिला, मात्र दोघांमध्ये तिच्या लग्नानंतरही प्रेमप्रकरण सुरू होते. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या इस्माइलचा काटा काढण्याचा कट दोघांनी रचला. यातून सोमवारी सकलाईन याने चाकूने इस्मालवर वार करून त्याची हत्या केली आहे. या प्रकरणी ॲण्टाॅप हिल पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींचे लग्नाच्या आधीपासून प्रेमसंबंध होते. मात्र, सुमय्याच्या कुटुंबाने तिचं लग्न इस्माइल अली शेख याच्यासोबत लावून दिलं. लग्नानंतरही त्यांचे प्रेमसंबंध तसेच होते. याउलट त्यांच्या नात्यात अडथळा ठरणाऱ्या सुमय्याच्या नवऱ्याला त्यांनी बाजूला करण्यासाठी योजना आखली. काल (सोमवारी) सकलाईन याने चाकूने इस्मालवर वार करून त्याची हत्या केली आहे. या प्रकरणी ॲण्टाॅप हिल पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.
पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला येरवडा पोलिसांनी अटक केली. 16 वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी आरोपी तरुणाच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी मुलीचा आणि आरोपीचा परिचय समाजमाध्यमाद्वारे झाला होता. त्यानंतर ओळख वाढवून आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यातून ती गरोदर राहिली. मुलीने संबंध ठेवण्यास नकार दिला असता देखील त्याने मुलीला मारहाण करून संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.