आरेतील वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरेंचा भाजप आणि प्रशासनाला इशारा

आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरुन युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्तेत आल्यावर आरेला जंगल घोषित करणारच, असे म्हणत आदित्य यांनी भाजपसह प्रशासनाला इशारा दिला आहे.

Continues below advertisement
मुंबई : आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरुन युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्तेत आल्यावर आरेला जंगल घोषित करणारच, असे म्हणत आदित्य यांनी भाजपसह प्रशासनाला इशारा दिला आहे. आरे मेट्रो कारशेडप्रकरणी हायकोर्टाचा आदेश येताच काल (04 ऑक्टोबर) रात्रीपासून आरे कॉलनीमध्ये वृक्षतोडीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र वृक्षतोडीला सुरुवात होताच पर्यावरणप्रेमींकडून तीव्र विरोध सुरु झाला आहे. वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमींची सध्या पोलिसांकडून धरपकड सुरु झाली आहे. त्यानंतर आज युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणप्रेमींसाठी आवाज उठवला आहे. आदित्य यांनी माध्यमांशी बोलताना अनेक सवाल उपस्थित केले. प्रशासन जर चांगलं काम करत होतं तर रात्री चोरी-छुपे कारवाई का केली? झाडं वाचवणाऱ्यांवर गुन्हे दाखल का केले? पोलिसांवर आधीच निवडणुकीचा ताण आहे, अशा परिस्थितीत त्यांच्यावरील ताण का वाढवला जातोय? आंदोलकांनी दगडफेक केली नाही, कोणतीही हिंसा नाही त्यांची धरपकड का सुरु आहे? आदित्या म्हणाले की, आमचं सरकार आल्यावर या घटनेस जबाबदार असणाऱ्या लोकांवर कारवाई करु. आम्ही एवढ्यावरच थांबणार नाही, तर आमचं सरकार आल्यावर आरेला जंगल म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न करु. रात्री केवळ चोर काम करतात, सरकार नाही. Aditya Thackeray on Aarey | आरेतील वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरें म्हणतात... | मुंबई | ABP Majha आरे परिसरातील झाडे इलेक्ट्रिक करवतीने ही तोडली जात आहेत. या कारवाईला सुरुवात होताच मुंबईतील पर्यावरणप्रेमी आरे वाचवण्यासाठी मेट्रो कारशेडजवळ जमा होऊ लागले. यामुळे आरे परिसरात पोलिसांकडून बंदोबस्त वाढण्यात आला आहे. पर्यावरणप्रेमी आरेमधील वृक्षतोडीला मोठा विरोध करत आहेत. मात्र, पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आलं आहे. त्यामुळे आरे परिसरात सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे.  लोकशाहीचा खून कसा असतो हे आज समजलं, आरे वृक्षतोडीवर शुभा राऊळ यांची प्रतिक्रिया | ABP MAJHA सर्वोच्च न्यायालयात हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात अपील करण्याआधीच झाडे तोडल्याने नागरिकांनी राज्य सरकार, मेट्रो प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. तसेच आत्तापर्यंत जवळपास 200 झाडं तोडल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आला आहे. आरे मेट्रो कारशेडसाठी झाडे तोडण्यास सुरुवात | ABP Majha दरम्यान आरे कॉलनीत मेट्रो कारशेडला हायकोर्टाने हिरवा कंदिल दाखवला आहे. कारशेडसाठीच्या वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे 'आरे कॉलनी हे जंगल नाही' यावर हायकोर्टाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं आहे. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने शुक्रवारी (4 ऑक्टोबर) आपला राखून ठेवलेला निकाल जाहीर केला. हायकोर्टाच्या या निकालाने पर्यावरणवाद्यांना मोठा दणका बसला असून याचिकाकर्ते या निकालाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. आरे कारशेडच्या विरोधामागे वेगळे मनसुूबे? : मुख्यमंत्री एमएमआरडीएमार्फत मेट्रो 3 साठी कारशेड बांधण्यात येणार असून त्यासाठी आरेतील 2646 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. प्रचंड प्रमाणात होणाऱ्या या वृक्षतोडीला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. पर्यावरणवादी झोरु भटेना आणि वनशक्ती या सामाजिक संस्थांसह इतरांनी याचिका दाखल केल्या होत्या. वृक्ष प्राधिकरण समितीतील तज्ज्ञांचा विरोध झुगारुन वृक्ष प्राधिकरण समितीने ही झाडं तोडण्याची मंजुरी दिल्याचा आरोप हायकोर्टात करण्यात आला होता.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »