एक्स्प्लोर

Uddhav Thackeray on Raj Thackeray : किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार, पण माझी एकच अट असेल ती म्हणजे; उद्धव ठाकरेंकडून थेट 'मनसे' संकेत!

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात उद्धव आणि राज्य ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्मासाठी एकत्र यावं यासाठी मराठी माणसाकडून स्वप्न पाहिलं जात आहे ते पुन्हा एकदा वास्तवात येणार का? याची उत्सुकता आहे.

Uddhav Thackeray on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा टाळी देण्याचे संकेत दिल्यानंतर आज (19 एप्रिल) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा थेट जाहीरपणे टाळी देत एक प्रकारे मनसे युतीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात उद्धव आणि राज्य ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्मासाठी एकत्र यावं यासाठी मराठी माणसाकडून स्वप्न पाहिलं जात आहे ते पुन्हा एकदा वास्तवात येणार का? याची उत्सुकता आहे. उद्धव ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना माझ्याकडून जी भांडणं असतील (ती नव्हतीच असेही त्यांनी नमूद केले) मिटवली चला असे म्हणत एक प्रकारे राज ठाकरे यांनी दिलेल्या टाळीला प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे या भांडणाचा संदर्भ ते तुम्हाला चर्चा सुरु आहे त्यावरून लक्षात येईल म्हणत राज यांच्या भूमिकेवर जाहीर भाष्य केलं. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

उद्धव ठाकरे म्हणाले की, किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे. मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रसाठी एकत्र येण्याचं आवाहन आहे, पण एक अट आहे, जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो, हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचं सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो. तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही चालणार. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी मी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, त्याचं आगत स्वागत करणार नाही, हे पहिलं ठरवा, मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी भांडणं माझ्याकडून नव्हतीच, ती मी मिटवून टाकली चला, पण पहिलं हे ठरवा.

हिंदी सक्ती कराल तर उखडून फेकू

उद्धव ठाकरे यांनी हिंदीवरूनही महायुती सरकारला जाहीर इशारा दिला. ते म्हणाले की, हिंदी सक्ती कराल तर उखडून फेकू. हिंदीची सक्ती पहिलीपासून याचा काय करायचं? अशी विचारणा त्यांनी केली. त्यांनी सांगितले की, आम्ही प्रेमाने सर्व ऐकू, पण सक्ती कराल तर तुमच्या सकट उखडून फेकून देऊ. अनेक ठिकाणी मराठी शिकण्यासाठी उत्साह वाढत आहे. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रामध्ये मराठी सक्ती करण्याचा निर्णय हा माझ्या मंत्रिमंडळाने घेतला. जो महाराष्ट्रात राहणार त्याला मराठी ही आलीच पाहिजे. इथं राहता, आमचं मीठ खाता आणि मराठी भाषेला तुम्ही विरोध करता अशी टीका त्यांनी केली. 

सुपारी घेऊन हे सत्ताधारी बसले आहेत का?

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे मारेकऱ्यांची सुपारी घेऊन हे सत्ताधारी बसले आहेत का?जर महाराष्ट्रात राहायचं असेल तर जय महाराष्ट्र बोलावत लागेल यांना हिंदीची सक्ती करायची असेलच तर फडणवीस यांना सांगतो. तुमचे जे जोशी आले होते ना माशी जिंकली तसे बोलून गेले, त्याच घाटकोपरमध्ये आधी मराठी सक्ती करून दाखवा. घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करून दाखवा. प्रत्येकाला मराठी बोलता येत का ते दाखवा, असे आव्हान दिले. 

आता जाहीरनाम्यावर काहीच कोणीच बोलत नाही

उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईत सुद्धा काही गोष्टी अदानीच्या घशात घातल्या. आणि तुम्ही त्यावर बोलू नये म्हणून तुम्हाला भांडणात व्यस्त ठेवायचं असा प्रकार आहे. आता काय दुर्दैवाने सरकार आलं आहे ते जाहीरनाम्यावर काहीच कोणीच बोलत नाही. तुम्ही मारलेल्या थापा ऐकून मतदान केलं असं आपण एक वेळ म्हणू, पण त्यावर आता कोणीच बोलत नाही. अजित पवार म्हणतात की माझ्या भाषणात कर्जमाफी कधी बोललो ते तुम्ही मला दाखवा? हे कोणतं राजकारण आहे, अशी विचारणा त्यांनी केली. 

मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना 

उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. प्रत्येक कामगाराचा शाखेसोबत समन्वय झालाच पाहिजे. खूप जणांना काही देता नाही आला तरीसुद्धा ते हिंदुत्वासाठी आणि पक्षासाठी माझ्यासोबत राहिले. कामगार कायद्यांना आपण विरोध केला पाहिजे, पण निवडणुकीवेळी आपण विस्कळीत असतो. कारण आपल्या डोक्यावर काहीतरी टाकलेलं असते. आता वक्फ बोर्ड आणला गेला, त्यामध्ये सुद्धा आपण जो प्रश्न विचारला तोच सुप्रीम कोर्टाने त्यांना विचारला. वक्फ बोर्डावर जर तुम्ही कायद्यानं गैर मुस्लिम माणूस ठेवताय तर आमच्या हिंदूमध्ये सुद्धा तुम्ही उद्या काही करू शकता, असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही महाराष्ट्राचे मराठी कडवट आहोत.  शेतकऱ्यांचे काळे कायदे आले तेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरला तसा कामगार रस्त्यावर उतरला नाही  त्यांचा मिशन हेच आहे की कोणी एकत्र आलं नाही पाहिजे. आपल्याला भांडणात गुंतवून ठेवून यांचे काय चाळे चालले आहेत ते पहा. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MI vs PBKS :   मुंबई इंडियन्सला पंजाब विरुद्ध पराभवाचा धक्का, फायनलचा मार्ग कसा असणार? एलिमिनेटरमध्ये कुणाविरुद्ध लढणार?
मुंबई इंडियन्सला पंजाब विरुद्ध पराभवाचा धक्का, फायनलचा मार्ग कसा असणार? एलिमिनेटरमध्ये कुणाविरुद्ध लढणार?
Bhiwandi : चार किलो गांजासह मनसेचा शहर उपाध्यक्ष अटकेत, गुन्हे शाखेच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ
चार किलो गांजासह मनसेचा शहर उपाध्यक्ष अटकेत, गुन्हे शाखेच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ
असा घडला अपघात, रस्त्यावरील पाणी उडून काचेवर साचले, भीषण घडले; अपघाताचे फोटो
असा घडला अपघात, रस्त्यावरील पाणी उडून काचेवर साचले, भीषण घडले; अपघाताचे फोटो
मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबले, 8 शेतमजुरांवर कोसळली वीज; दोघांचा मृत्यू
मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबले, 8 शेतमजुरांवर कोसळली वीज; दोघांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines 08 PM TOP Headlines 26 May 2025 संध्याकाळी 8 च्या हेडलाईन्सMaharashtra Rain :  महाराष्ट्रात धोधो पाऊस, धबधबे प्रवाहित, काही ठिकाणी मोठं नुकसानSatara Rain Bike Video : साताऱ्यात रस्त्याची दैना,पठ्ठ्याने बाईक खांद्यावर घेत केला रस्ता पारMumbai Rain : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई; Metro स्टेशन जलमय, नागरिकांचे हाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MI vs PBKS :   मुंबई इंडियन्सला पंजाब विरुद्ध पराभवाचा धक्का, फायनलचा मार्ग कसा असणार? एलिमिनेटरमध्ये कुणाविरुद्ध लढणार?
मुंबई इंडियन्सला पंजाब विरुद्ध पराभवाचा धक्का, फायनलचा मार्ग कसा असणार? एलिमिनेटरमध्ये कुणाविरुद्ध लढणार?
Bhiwandi : चार किलो गांजासह मनसेचा शहर उपाध्यक्ष अटकेत, गुन्हे शाखेच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ
चार किलो गांजासह मनसेचा शहर उपाध्यक्ष अटकेत, गुन्हे शाखेच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ
असा घडला अपघात, रस्त्यावरील पाणी उडून काचेवर साचले, भीषण घडले; अपघाताचे फोटो
असा घडला अपघात, रस्त्यावरील पाणी उडून काचेवर साचले, भीषण घडले; अपघाताचे फोटो
मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबले, 8 शेतमजुरांवर कोसळली वीज; दोघांचा मृत्यू
मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबले, 8 शेतमजुरांवर कोसळली वीज; दोघांचा मृत्यू
International Yoga Day: संपूर्ण जग योगासोबत जोडलं जातंय, पतंजलीच्या पुढाकारानं बनली जागतिक चळवळ   
संपूर्ण जग योगासोबत जोडलं जातंय, पतंजलीच्या पुढाकारानं बनली जागतिक चळवळ   
नॅशनल हायवेवर ट्रक बिघडला, तब्बल 12 तास रस्ता बंद; गरोदर महिलेला 5 तास पाहावी लागली वाट
नॅशनल हायवेवर ट्रक बिघडला, तब्बल 12 तास रस्ता बंद; गरोदर महिलेला 5 तास पाहावी लागली वाट
मोठी बातमी! हगवणे पिता-पुत्रांना आसरा दिल्याने माजी मंत्र्यांच्या मुलासह 5 जणांना अटक
मोठी बातमी! हगवणे पिता-पुत्रांना आसरा दिल्याने माजी मंत्र्यांच्या मुलासह 5 जणांना अटक
Cricket News : सगळा संघ 2 धावांवर बाद, त्यात एक रन वाईडची, घातक गोलंदाजीपुढं फलंदाजांनी गुडघे टेकले, तब्बल 424 धावांनी पराभव
सगळा संघ 2 धावांवर बाद, त्यात एक रन वाईडची, घातक गोलंदाजीपुढं फलंदाजांनी गुडघे टेकले
Embed widget
OSZAR »