एक्स्प्लोर

गोरेंचे काळे कारनामे, त्यांच्या विरोधात कडक कारवाई करा, साडी चोळीचा आहेर देत सोलापुरात महिला काँग्रेस आक्रमक

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Guardian Minister Jayakumar Gore) यांच्या विरोधात महिला काँग्रेस (Mahila Congress) आक्रमक झाली आहे. त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले.

सोलापूर :सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Guardian Minister Jayakumar Gore) यांच्या विरोधात महिला काँग्रेस (Mahila Congress) आक्रमक झाली आहे. सोलापूरमध्ये (Solapur) काँग्रेस भवनच्या बाहेर पालकमंत्री गोरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. त्याचबरोबर साडी चोळीचा आहेर देखील देण्यात आला. गोरे हे काळे कारनामे करत असून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी सोलापूर काँग्रेस महिला आघाडीनं केली आहे. 

नेमकं प्रकरण काय?

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Guardian Minister Jayakumar Gore)  यांच्यावर एका महिलेसंदर्भात आरोप झाले आहेत. एका महिलेला गोरे यांनी विविस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र कोर्टाचा दाखला देत जयकुमार गोरेंनी सर्व आरोप फेटाळून लावले असून बदनामी करणाऱ्या विरोधकांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे. या सर्व घडामोडी घडत असताना पीडित महिला समोर आली असून तिने राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे गोरेंची तक्रार करणार असल्याचे म्हटलं आहे. तसेच गोरेंच्या विरोधात येत्या 17 तारखेला उपोषणाला बसणार असल्याचे पीडित महिलेने सांगितले आहे. 2015-16 चं हे प्रकरण असून जयकुमार गोरे यांनी मला प्रचंड मानसिक त्रास दिला होता. वेगवेगळ्या नंबरवरून वेगवेगळे फोटो पाठवले होते. फक्त फोटोच नाही तर अश्लील शिव्या देखील त्यांनी माझ्यासह माझ्या आईला दिल्या होत्या, असं वक्तव्य पीडित महिलेने केले आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक

दरम्यान, दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. जोशी यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून आज सोलापुरात आंदोलन करण्यात आलं. भैय्याजी जोशी यांच्या विरोधात सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. शहरातील चार पुतळा चौकात ठाकरे गटानं भैय्याजी जोशी यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. भैय्याजी जोशी हे मुंबईतून मराठी भाषा हद्दपार करण्यासाठी कुटील डाव आखत असल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप आहे. हाताला काळ्या फिती बांधत यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान, याच वेळी प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. 

महत्वाच्या बातम्या:

Jaykumar Gore Photos: जयकुमार गोरे 'त्या' केसमधून निर्दोष सुटणं अवघड होतं, मी उपकार केले म्हणून सुटला; पीडित महिलेचा खळबळजनक दावा

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune : पुण्यात पॅलेस्टिनी पोस्टरवरुन गदारोळ, पॅलेस्टाईनचा प्रचार करणाऱ्यांना मारहाण
Pune : पुण्यात पॅलेस्टिनी पोस्टरवरुन गदारोळ, पॅलेस्टाईनचा प्रचार करणाऱ्यांना मारहाण
Gold : जागतिक तणावाच्या वातावरणात सोने खरेदी करावं की विक्री करावी? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
जागतिक तणावाच्या वातावरणात सोने खरेदी करावं की विक्री करावी? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
सीमेवर जवान लढत असताना फिरायला जाणं योग्य नाही; जोडप्याने फॉरेन ट्रीप रद्द करत शहीद कुटुंबीयांस दिली रक्कम
सीमेवर जवान लढत असताना फिरायला जाणं योग्य नाही; जोडप्याने फॉरेन ट्रीप रद्द करत शहीद कुटुंबीयांस दिली रक्कम
पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीर मुद्द्यात कुणाची मध्यस्थी चालणार नाही; भारताने पुन्हा ठणकावलं
पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीर मुद्द्यात कुणाची मध्यस्थी चालणार नाही; भारताने पुन्हा ठणकावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shirdi Special Report : सोनं-चांदी ठेवायला जागा नाहाी, साईंच्या शिर्डीत सोनं किती?Special Report On Tejaswini Ghosalkar : जय महाराष्ट्र! तेजस्वी घोसाळकरांची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठीSpecial Report On Tejaswini Ghosalkar : तेजस्वी घोसाळकरांची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठीZero Hour : सीमेवर तणाव, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेत नरेंद्र मोदींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : पुण्यात पॅलेस्टिनी पोस्टरवरुन गदारोळ, पॅलेस्टाईनचा प्रचार करणाऱ्यांना मारहाण
Pune : पुण्यात पॅलेस्टिनी पोस्टरवरुन गदारोळ, पॅलेस्टाईनचा प्रचार करणाऱ्यांना मारहाण
Gold : जागतिक तणावाच्या वातावरणात सोने खरेदी करावं की विक्री करावी? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
जागतिक तणावाच्या वातावरणात सोने खरेदी करावं की विक्री करावी? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
सीमेवर जवान लढत असताना फिरायला जाणं योग्य नाही; जोडप्याने फॉरेन ट्रीप रद्द करत शहीद कुटुंबीयांस दिली रक्कम
सीमेवर जवान लढत असताना फिरायला जाणं योग्य नाही; जोडप्याने फॉरेन ट्रीप रद्द करत शहीद कुटुंबीयांस दिली रक्कम
पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीर मुद्द्यात कुणाची मध्यस्थी चालणार नाही; भारताने पुन्हा ठणकावलं
पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीर मुद्द्यात कुणाची मध्यस्थी चालणार नाही; भारताने पुन्हा ठणकावलं
India vs Pakistan : भारताची दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका, अखेर पाकिस्तानला उपरती, संरक्षणमंत्री म्हणतात...
भारताची दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका, अखेर पाकिस्तानला उपरती, संरक्षणमंत्री म्हणतात...
विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेचा ठेका एवढ्या कोटी रुपयांना; BVG कडे जबाबदारी
विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेचा ठेका एवढ्या कोटी रुपयांना; BVG कडे जबाबदारी
विठुरायाच्या पंढरीतून 35 टक्क्यावाला 'विशाल'; सर्वच विषयात काठावर पास, गावकऱ्यांकडून सत्कार खास
विठुरायाच्या पंढरीतून 35 टक्क्यावाला 'विशाल'; सर्वच विषयात काठावर पास, गावकऱ्यांकडून सत्कार खास
अपघातवार... देवदर्शनाहून गावी परताना अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू; दिवसभरात अपघातात 9 ठार
अपघातवार... देवदर्शनाहून गावी परताना अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू; दिवसभरात अपघातात 9 ठार
Embed widget
OSZAR »