एक्स्प्लोर

Maharashtra Breaking LIVE Updates: सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मान्सून लवकरच केरळात दाखल होणार

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking LIVE Updates chhagan bhujbal oath ceremony for cabinet minister in Mahayuti Government Ind Pak tensions YouTuber jyoti malhotra Corona virus Mumbai Pune Maharashtra Breaking LIVE Updates: सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मान्सून लवकरच केरळात दाखल होणार
Maharashtra Breaking LIVE Updates
Source : ABPLIVE AI

Background

Maharashtra Breaking LIVE Updates: राज्याच्या राजकारणासाठी एक मोठी बातमी समोर आलंय. राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ आज सकाळी 10 वाजता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.मुंबईच्या राजभवनात मंगळवारी सकाळी शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान, धनंजय मुंडेंच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी आता भुजबळांवर देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. आता तेच खातं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळाना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 

राज्यात पुन्हा कोरोनाची एन्ट्री

2020 साली चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूनं जगभरात धुमाकूळ घातला. लाखो लोकांनी जीव गमावला. मात्र त्यानंतर अख्खं जग यातून हळूहळू सावरलं. पण आता हाच कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय. भारतासह जगभरात कोरोना विषाणूबाधित नवे रुग्ण आढळतायत. मुंबईत 53 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाहीये. 

15:08 PM (IST)  •  20 May 2025

किरण रिजीजू यांनी केला उद्धव ठाकरे यांना फोन, सर्वपक्षीय शिष्टमंडळात संदर्भात दिली माहिती

किरण रिजीजू यांनी केला उद्धव ठाकरे यांना फोन, सर्वपक्षीय शिष्टमंडळात संदर्भात दिली माहिती

विविध देशांना भेट देणारे भारतीय शिष्टमंडळ आणि शिवसेना युबीटी सहभाग-

केंद्रीय मंत्री श्री. किरेन रिजिजू जी यांनी काल पक्षाध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे जी यांच्याशी या शिष्टमंडळासंदर्भात दूरध्वनीवरून संवाद साधला.

हे शिष्टमंडळ दहशतवादाविरुद्ध आहे आणि याची खात्री मिळाल्यावर, आम्ही सरकारला आश्वासन दिले आहे की आम्ही या शिष्टमंडळाद्वारे आपल्या देशासाठी जे योग्य आणि आवश्यक आहे ते करू.

खासदार श्रीमती प्रियंका चतुर्वेदी जी देशभरातील इतर खासदारांसह शिष्टमंडळाचा भाग असतील.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, सर्व राजकीय पक्षांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत, विशेषतः पाक-आधारित दहशतवादाविरुद्ध आणि त्यांचे तळ नष्ट करण्यासाठी पंतप्रधानांना पाठिंबा दर्शविला आहे.

दहशतवादाविरुद्ध कारवाई करणाऱ्या सशस्त्र दलांमध्ये आपण सर्वजण एक आहोत, याबद्दल कोणतेही दुटप्पी मत असू नये.

पहलगामवरील राजनैतिक परिस्थिती आणि अयशस्वी गुप्तचर/सुरक्षा यंत्रणेबद्दल आपले मत आहे आणि आम्ही आपल्या देशाच्या, आपल्या देशाच्या हितासाठी प्रश्न विचारत राहू.

तथापि, पाकिस्तान आधारित दहशतवादाला एकाकी पाडण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी आपण जागतिक स्तरावर एकत्र आले पाहिजे.

आम्ही केंद्र सरकारला असेही कळवले आहे की या कारणासाठी आम्ही एकत्र असलो तरी, गैरव्यवस्थापन टाळण्यासाठी या प्रतिनिधीमंडळांबद्दल पक्षांना चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा एक नियम पाळला जाऊ शकतो.

कालच कॉलद्वारे आम्ही राष्ट्रीय हिताच्या अशा कोणत्याही कृतीला आमचा पाठिंबा पुन्हा जाहीर केला आहे.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पहलगाम ते ऑपरेशन सिंदूर या विषयावर लवकरात लवकर चर्चा करण्यासाठी आणि यावर आवाज उठवण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. 

दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही एकजूट आहोत. 

15:03 PM (IST)  •  20 May 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मे रोजी राजस्थानला भेट देणार; बिकानेर - मुंबई एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मे रोजी राजस्थानला भेट देणार

पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यात राजस्थानला करण्यात आले होते लक्ष्य

नरेंद्र मोदी २२ मे रोजी राजस्थान दौऱ्यावर

बिकानेर - मुंबई एक्सप्रेस रेल्वेगाडीला हिरवा कंदील दाखवणार

सकाळी  11:30 वाजण्याच्या सुमाराला पंतप्रधानाच्या हस्ते अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत पुनर्विकसित केलेल्या देशनोक रेल्वे स्थानकाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पंतप्रधान  बिकानेर - मुंबई एक्सप्रेस रेल्वेगाडीला हिरवा झेंडाही दाखवतील. त्यानंतर, ते 26,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करणार आहेत . यानिमित्ताने पंतप्रधान देशनोक इथे एका जाहीर  कार्यक्रमाला संबोधितही करतील.

14:58 PM (IST)  •  20 May 2025

रायगड जिल्ह्यात पुन्हा मुसळधार; जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाची तुफान बॅटिंग

रायगड जिल्ह्यात पुन्हा मुसळधार 

जिल्ह्यात माणगाव, तळा,रोहा,महाड तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसाची दमदार हजेरी 

जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाची तुफान बॅटिंग 

रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून यलो अलर्ट

14:48 PM (IST)  •  20 May 2025

मोठी बातमी! 36 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या पाच नक्षलवाद्यांना अटक; गडचिरोली पोलीसांच्या कारवाईला यश

गडचिरोलीत बिनागुंडा परिसरात पाच नक्षलवाद्यांना अटक... पोलिसांवर हल्ला करण्याच्या उद्दिष्टाने छत्तीसगड मधून गडचिरोलीत शिरले होते नक्षलवादी...

36 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या पाच जहाल नक्षलवाद्यांना गडचिरोलीत अटक करण्यात आली आहे.. गडचिरोली पोलीसांच्या सी 60 पथक आणि सीआरपीएफ संयुक्त कारवाईत लाहेरी पोलीस स्टेशन अंतर्गत बिनागुंडा परिसरात केलेल्या कारवाईत हे 5 जहाल नक्षलवादी यांना अटक करण्याचे यश आले आहे.. 

अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर हत्यार व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे...

विशेष म्हणजे जानेवारी 2022 पासून आतापर्यंत 103 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून गेल्या साडेतीन वर्षात अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची संख्या शंभर पार गेली आहे.

12:31 PM (IST)  •  20 May 2025

सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून लवकरच केरळात दाखल होणार


सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

मान्सून लवकरच केरळात दाखल होणार

पुढील ४-५ दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण

लक्षद्वीप क्षेत्राचा काही भाग, केरळ, तामिळनाडूचा काही भाग; दक्षिण आणि मध्य बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालचा उपसागर आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल 

भारतीय हवामान विभागाची माहिती 

२७ मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता अंदाज

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola : दारुच्या नशेत वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ, अकोल्यातील PSI निलंबित
दारुच्या नशेत वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ, अकोल्यातील PSI निलंबित
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सनं चारवेळा एलिमिनेटरचे सामने खेळले, MI चं जुनं रेकॉर्ड पाहून चाहत्यांची धाकधूक वाढली
मुंबई इंडियन्सनं चारवेळा एलिमिनेटरचे सामने खेळले, MI चं जुनं रेकॉर्ड पाहून चाहत्यांची धाकधूक वाढली
नांदेडमध्ये मायलेकीसह पुतणीचा मृत्यू; शेतात काम केलं, घरी परतताना ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्या
नांदेडमध्ये मायलेकीसह पुतणीचा मृत्यू; शेतात काम केलं, घरी परतताना ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्या
लक्ष्मण हाकेंना महागडी फॉर्च्यूनर लेजेंडर गिफ्ट; भंडारा उधळत मनोज जरांगेंना दिला इशारा
लक्ष्मण हाकेंना महागडी फॉर्च्यूनर लेजेंडर गिफ्ट; भंडारा उधळत मनोज जरांगेंना दिला इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM Top Headlines 27 May 2025 ABP MajhaLatur RT Deshmukh Accident : ब्रेक लावताच कार का उलटली? आर.टी. देशमुखांचा अपघात कसा झाला?Vaishnavi Hagawane : 10 लाखांचं रिसॉर्ट, 22 लाखांचा स्टेज! वैष्णवीच्या लग्नाचा खर्च दीड कोटी...Pune Maratha Wedding: पुण्यात मराठा समाजातील लग्नासाठीची आचारसंहिता? ना राजकारणी ना बडेजावपणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola : दारुच्या नशेत वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ, अकोल्यातील PSI निलंबित
दारुच्या नशेत वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ, अकोल्यातील PSI निलंबित
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सनं चारवेळा एलिमिनेटरचे सामने खेळले, MI चं जुनं रेकॉर्ड पाहून चाहत्यांची धाकधूक वाढली
मुंबई इंडियन्सनं चारवेळा एलिमिनेटरचे सामने खेळले, MI चं जुनं रेकॉर्ड पाहून चाहत्यांची धाकधूक वाढली
नांदेडमध्ये मायलेकीसह पुतणीचा मृत्यू; शेतात काम केलं, घरी परतताना ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्या
नांदेडमध्ये मायलेकीसह पुतणीचा मृत्यू; शेतात काम केलं, घरी परतताना ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्या
लक्ष्मण हाकेंना महागडी फॉर्च्यूनर लेजेंडर गिफ्ट; भंडारा उधळत मनोज जरांगेंना दिला इशारा
लक्ष्मण हाकेंना महागडी फॉर्च्यूनर लेजेंडर गिफ्ट; भंडारा उधळत मनोज जरांगेंना दिला इशारा
Jawaharlal Nehru : बिकट स्थितीत सूत्रे हाती अन् दूरदृष्टीने भारताची पुनर्निर्मिती केली; नेहरूंच्या  'या' पाच निर्णयांमुळे देशाची दिशा ठरली
बिकट स्थितीत सूत्रे हाती अन् दूरदृष्टीने भारताची पुनर्निर्मिती केली; नेहरूंच्या 'या' पाच निर्णयांमुळे देशाची दिशा ठरली
पुण्यात भिंत ढासळून तब्बल 18,000 कोंबडयांचा मृत्यू, पावसाने शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये लाखोंचं नुकसान
पुण्यात भिंत ढासळून तब्बल 18,000 कोंबडयांचा मृत्यू, पावसाने शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये लाखोंचं नुकसान
अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणे महागणार? ट्रम्प यांच्या 3.5 टक्के कर योजनेने वाढवली भारतीयांची चिंता 
अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणे महागणार? ट्रम्प यांच्या 3.5 टक्के कर योजनेने वाढवली भारतीयांची चिंता 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27  मे  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मे 2025 | मंगळवार
Embed widget
OSZAR »