Koregaon Bhima Live Updates : कोरेगाव भीमामधील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
Koregaon Bhima Latest updates : कोरेगाव भीमा इथे आज 204 वा शौर्य दिन साजरा होत आहे. कोरेगाव भीमामधील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
Background
Koregaon Bhima Latest updates : कोरेगाव भीमा इथे आज 204 वा शौर्य दिन साजरा होत आहे. या निमित्ताने कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला फुलांची सजावट करण्यात आलीय. आज या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होणार आहे. आज दिवसभरात उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे, नितीन राऊत, संजय बनसोडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मंत्री विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पोहोचणार आहेत. 1818 साली कोरेगाव भीमा इथे पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध झालेल्या लढाईत गाजवलेल्या शौर्याबद्दल हा स्तंभ उभारण्यात आलाय.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरेगाव भीमा इथला इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीने निधी मंजुर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील समिती त्यासाठी काम करेल. त्याचबरोबर तुळापूर आणि वढू इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला भव्य बनवले जाईल, असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, कोरोनाचा धोका वेगाने वाढतोय . चार दिवसांच्या अधिवेशनात दहा मंत्री आणि वीसहून अधिक आमदार कोरोना बाधित झालेत, असंही त्यांनी सांगितलं.
बैलगाडा शर्यत काल रात्री रद्द करण्याचा निर्णय काल मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आलाय. त्यामुळे सर्वांनी त्याचे पालन करावे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही याची माहिती घ्यावी, असंही ते म्हणाले. राज्य कोरोना मुक्त करणे हा नवीन वर्षाचा संकल्प असेल. कोरेगाव- भीमा आणि वढू- तुळापूर इथले स्मारक या वर्षात उभारण्याचा संकल्प आहे, असंही ते म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Bhima Koregaon: कोरेगाव भीमा शौर्यदिन, आंबेडकरी अनुयायांची प्रतिक्रिया ABP Majha
विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले पोहोचले
विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले पोहोचले, महाविकास आघाडी घालवणं, रिपब्लिकन पक्ष मजबूत करणे, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेणे हा नवीन वर्षाचा संकल्प- रामदास आठवले
विजयस्तंभ परिसराचा ‘प्रेरणास्थळ’ म्हणून विकास होणार- सुप्रिया सुळे
कोरेगाव भीमा इथला इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरेगाव भीमा इथला इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीने निधी मंजुर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील समिती त्यासाठी काम करेल. त्याचबरोबर तुळापूर आणि वढू इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला भव्य बनवले जाईल, असं ते म्हणाले.
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला फुलांची सजावट
: कोरेगाव भीमा इथे आज 204 वा शौर्य दिन साजरा होत आहे. या निमित्ताने कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला फुलांची सजावट करण्यात आलीय. आज या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होणार आहे. आज दिवसभरात उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे, नितीन राऊत, संजय बनसोडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मंत्री विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पोहोचणार आहेत. 1818 साली कोरेगाव भीमा इथे पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध झालेल्या लढाईत गाजवलेल्या शौर्याबद्दल हा स्तंभ उभारण्यात आलाय.
उपमुख्यमंत्री अजित पवार विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पोहचले
उपमुख्यमंत्री अजित पवार विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पोहचले. सोबत धनंजय मुंडे देखील आहेत