एक्स्प्लोर

शेतमालाचे दर वाढले की सरकारच्या पोटात गोळा येतो, कांद्याच्या आयातीवरुन जयंत पाटलांचा हल्लाबोल

शेतकऱ्याचे (Farmers) कुठेही उत्पन्न वाढू नये अशी सरकारची नीती असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केले.

Jayant Patil on Onion : भारतातील कांद्याचे वाढते (Onion Price) दर  नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं अफगाणिस्तानातून (Afghanistan) कांद्याची आयात केली आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्याचे (Farmers) कुठेही उत्पन्न वाढू नये अशी सरकारची नीती असल्याचे पाटील म्हणाले. तेलबियांच्या आयातीबद्दल, तेल आयात करण्याच्या बाबतीत हेच धोरण आहे. शेतीमालाचा दर वाढायला लागला की यांच्या पोटात गोळा येतो आणि महागाई वाढली असे समजतात असं पाटील म्हणाले. शेतीमालाचा कसा दर पडेल यासाठी जगातून कांदा, सोयाबीनचे तेल हुडकून काढतात आणि शेतकऱ्याचं कंबरडं मोडतात अशी टीका जयंत पाटील यांनी केली. 

अफगाणिस्तानचा लाल कांदा भारतात दाखल

सध्या कांद्याचे दर वाढत आहेत. यामुळं शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे येत आहेत. अशा स्थितीतच सरकारने अफगाणिस्तानचा लाल कांदा आयात केला आहे. भारतात कांद्याचे वाढत असलेले दर अन् अफगानिस्तानमध्ये घसरलेले दर याचा फायदा घेत खासगी व्यापारी कांदा भारतात आणून मालामाल बनू पाहत आहेत.

लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील सरकारला कांदा रडवणार

दरम्यान, लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील सरकारला कांदा रडवणार का? असा सवाल जयंत पाटील यांना प्रसारमाध्यमांनी केला. यावेळी पाटील म्हणाले की, कांदा रडवणार, सोयाबीन रडवणार, कपाशी रडवणार, तसेच सर्व पिक विमांचे प्रश्न सरकारला रडवणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. सरकारने कितीही घोषणा केल्या तरी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फिरलं की तुमच्या लक्षात येईल या सरकारला लोक मत देणार नसल्याचे जयंत पाटील म्हणाले.

आम्ही विरोधी पक्षात, मराठा आरक्षणासंदर्भात सत्तारुढ पक्षाने निर्णय घ्यावा

आम्ही सध्या विरोधी पक्षात आहोत. जे सत्तेत आहेत त्यांच्याकडूनच मराठा आरक्षणासंदर्भात मोठ्या अपेक्षा असल्याचे जयंत पाटील म्हणाले. सत्तारुढ पक्षाने निर्णय घ्यावा आम्ही त्याला पाठिंबा द्यायला तयार असल्याचे पाटील म्हणाले. 

महाविकास आघाडीत येवल्याची जागा आम्हाला मिळणार

येवल्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. त्यामुळे ही जागा बहुतेक आम्हाला मिळणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचा अंतिम निर्णय होईल त्यावेळी तसे घोषीत केले जाईल असंही पाटील म्हणाले. त्यामुळं याठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढ अशीच लढत होईल असं जयंत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

मोदी सरकारने कांद्यावरचे निर्यात मूल्य घटवले, पण सिस्टीमच अपडेट केली नाही, ते जहाज निघून गेल्यास 300 कंटेनर्समधील कांदा सडणार

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election: ही तर मतदान बंदी! निवडणुकीच्या तोंडावर मतदारयादीत मोठ्या प्रमाणात फेरफार; इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या दारात
ही तर मतदान बंदी! निवडणुकीच्या तोंडावर मतदारयादीत मोठ्या प्रमाणात फेरफार; इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या दारात
विठुरायाची भेट अपूर्णच राहिली!  पंढरपुरच्या वारीत ट्रकनं चिरडलं, धाराशिवच्या महिला वारकऱ्याचा अपघाती मृत्यू
विठुरायाची भेट अपूर्णच राहिली! पंढरपुरच्या वारीत ट्रकनं चिरडलं, धाराशिवच्या महिला वारकऱ्याचा अपघाती मृत्यू
Disha Salian Death Case: दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा, मुंबई पोलिसांची कोर्टात महत्त्वाची माहिती
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा, मुंबई पोलिसांची कोर्टात महत्त्वाची माहिती
नाशिक शिवसेना पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल, अटकेच्या भीतीने सगळे फरार अन् तेच भाजप गुन्हेगार आता भाजपत करत आहेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
नाशिक शिवसेना पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल, अटकेच्या भीतीने सगळे फरार अन् तेच भाजप गुन्हेगार आता भाजपत करत आहेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full : आदित्, अमित ठाकरेंचं शिक्षण इंग्रजीत, हिंदीत मुद्द्यावरुन भाजपचा हल्लाबोल
Special Report Thackeray Reunion: Hindi मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र, 5 तारखेला विजयी मेळावा
Special Report Maharashtra Language Policy Row: त्रिभाषा सूत्र, GR रद्द, नेत्यांच्या मुलांच्या English शाळेवरून राजकारण तापले
Zero Hour Marathi Language : हिंदीला टाळा, इंग्रजीचा मात्र लळा? Deepak Pawar यांचं स्पष्ट मत
Kolhapur Gadhinglaj : रस्ता नसल्याने आजारी आजीला बैलगाडीतून रुग्णालयात नेलं, गडहिंग्लजमधील प्रकार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election: ही तर मतदान बंदी! निवडणुकीच्या तोंडावर मतदारयादीत मोठ्या प्रमाणात फेरफार; इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या दारात
ही तर मतदान बंदी! निवडणुकीच्या तोंडावर मतदारयादीत मोठ्या प्रमाणात फेरफार; इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या दारात
विठुरायाची भेट अपूर्णच राहिली!  पंढरपुरच्या वारीत ट्रकनं चिरडलं, धाराशिवच्या महिला वारकऱ्याचा अपघाती मृत्यू
विठुरायाची भेट अपूर्णच राहिली! पंढरपुरच्या वारीत ट्रकनं चिरडलं, धाराशिवच्या महिला वारकऱ्याचा अपघाती मृत्यू
Disha Salian Death Case: दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा, मुंबई पोलिसांची कोर्टात महत्त्वाची माहिती
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा, मुंबई पोलिसांची कोर्टात महत्त्वाची माहिती
नाशिक शिवसेना पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल, अटकेच्या भीतीने सगळे फरार अन् तेच भाजप गुन्हेगार आता भाजपत करत आहेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
नाशिक शिवसेना पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल, अटकेच्या भीतीने सगळे फरार अन् तेच भाजप गुन्हेगार आता भाजपत करत आहेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai crime news:सिरीलयमधील अभिनेत्रीच्या मुलाने 57 व्या मजल्यावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, कांदिवली हादरली
मुंबईत अभिनेत्रीच्या मुलाने 57 व्या मजल्यावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, कांदिवली हादरली
Beed Crime: धक्कादायक! बीडमध्ये गेल्या 5 महिन्यात बाललैंगिक अत्याचाराचे तब्बल 78 गुन्हे, 49% पीडिता अल्पवयीन
धक्कादायक! बीडमध्ये गेल्या 5 महिन्यात बाललैंगिक अत्याचाराचे तब्बल 78 गुन्हे, 49% पीडिता अल्पवयीन
England vs India, 2nd Test: गिलच्या 'कॅप्टन' इनिंगने टीम इंडियाची पहिल्या दिवशी त्रिशतकी मजल; यशस्वी जयस्वालची 87 धावांची खेळी
गिलच्या 'कॅप्टन' इनिंगने टीम इंडियाची पहिल्या दिवशी त्रिशतकी मजल; यशस्वी जयस्वालची 87 धावांची खेळी
Nashik Mama Rajwade joins BJP: चार दिवसांपूर्वी पद दिलेला ठाकरेंचा नेता भाजपने फोडला, गुन्ह्यात फरार असलेले मामा राजवाडेंचं 'मनपरिवर्तन', कमळ हातात घेणार
चार दिवसांपूर्वी पद दिलेला ठाकरेंचा नेता भाजपने फोडला, गुन्ह्यात फरार असलेले मामा राजवाडेंचं 'मनपरिवर्तन', कमळ हातात घेणार
Embed widget
OSZAR »