Satej Patil: मराठी भाषेसाठी, मराठी स्वाभिमानासाठी, मराठी माणूस एकत्र येत असेल तर आनंदच; सतेज पाटलांकडून ठाकरे बंधूंच्या संयुक्त मोर्चाचे स्वागत
Satej Patil: शिवसेना आणि मनसेमध्ये फोन झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितलं आहे. मात्र, यासंदर्भात काँग्रेस पक्षाला फोन झाला आहे का? याबद्दल आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

Satej Patil: महाराष्ट्र सक्तीची हिंदी लागली जात असतानाच प्रचंड आक्रोश व्यक्त केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर आता महाराष्ट्रामध्ये दोन बंधू एकत्र आल्याने स्वागत केले जात आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत केलं आहे. सतेज पाटील यांनी मराठी भाषेसाठी, मराठी स्वाभिमानासाठी मराठी माणूस एकत्र येत असेल तर त्याचा आनंदच असल्याचे म्हटला आहे. सतेज पाटील यांनी मोर्चावर बोलताना सांगितले की हा शिवसेना तरी मनसेचा एकत्रित मोर्चा निघणार आहे. शिवसेना आणि मनसेमध्ये फोन झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितलं आहे. मात्र, यासंदर्भात काँग्रेस पक्षाला फोन झाला आहे का? याबद्दल आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की दोन्ही बंधू एकत्र येऊन मोर्चा काढत असतील तर चांगलीच बाब आहे.
दरम्यान शरद पवार यांनी आज दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याविषयी भाष्य केलं आहे, मतभेद विसरून एकत्र येत असेल तर चांगलंच असल्याचं शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर पाटील म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर त्यांचा प्रश्न आहे मी त्यावर बोलणे योग्य नाही. शिवसेना आणि मनसे बद्दल बोलता येईल. मात्र राष्ट्रवादीबद्दल कोणीच जाहीर भूमिका घेतली नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
शरद पवारांना भूमिका समजावून सांगू
दरम्यान, शक्तिपीठवरून बोलताना सतेज पाटील म्हणाले की, एक जुलै रोजी 12 जिल्ह्यातील शेतकरी चक्काजाम करतील. त्यामुळे किमान आता तरी शक्तीपीठ महामार्गाबद्दल शेतकऱ्यांची भूमिका सरकार समजून घेतील असं वाटतं. ते पुढे म्हणाले की, आम्ही सर्वजण दोन दिवसात शरद पवार साहेबांची भेट घेणार आहे आणि हा महामार्ग गरजेचा कसा नाही हे पटवून देऊ. शक्तिपीठ महामार्ग हा राज्याचा महामार्ग आहे त्याला संकेश्वरमधून घेऊन जायचं हे चुकीच आहे. कर्नाटकमध्ये जायचं असेल तर कर्नाटक सरकारची परवानगी घ्यावी लागेला. हा प्रकल्प केंद्राचा नाही तर राज्याचा असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, शासन आता सगळ्यांची कुचेष्टा करत आहे. लाडक्या बहिणी बाबत कशा पद्धतीने बोललं जात होतं हे आपण ऐकलं आहे. आता लोणीकर यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. भाजपला जर शेतकऱ्या बद्दल थोडं जरी काही वाटत असेल तर त्यांनी बबन लोणीकरांचा राजीनामा घ्यावा.
इतर महत्वाच्या बातम्या