डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण! चौकशीसाठी मनीषा मानेला पोलिसांनी आणलं हॉस्पीटलमध्ये, कर्मचाऱ्यांचा संताप
डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी मनीषा मानेला पोलिसांनी डॉ. वळसंगकर हॉस्पिटलमध्ये आणले होते. यावेळी आरोपी मनीषा माने विरोधात हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा मोठा रोष पाहायला मिळाला.

Shirish Valsangkar : सोलापुरातील प्रसिद्ध डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी (Dr Shirish Valsangkar suicide case) अटकेत असलेल्या मनीषा माने-मुसळे हिला सोलापूर जिल्हा न्यायालयाने (Solapur Court) दोन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता आणि तपासासाठी आवश्यक माहिती मिळवण्यासाठी ही कोठडी वाढवण्यात आल्याचं कोर्टानं सांगितलं आहे. दरम्यान. आज मनीषा मानेला चौकशीसाठी पोलिसांनी डॉ. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये आणले होते. यावेळी आरोपी मनीषा माने विरोधात हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा मोठा रोष पाहायला मिळाला.
मनीषा माने विरोधात हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांचा रोष
रोपी मनीषा माने हिने डॉ. वळसंगकर यांना जो धमकीचा मेल पाठवला होता, त्याची प्रिंटेड कॉपी कोणत्या ठिकाणी फाडून टाकली याची माहिती पोलिस घेण्याची शक्यता आहे. डॉ. वळसंगकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये मनीषा माने हिच्या घाणेरड्या आणि खोटारड्या आरोपामुळे मी जीवन संपवत आहे असा उल्लेख केल्याची माहिती आहे. या घटनेमुळे आरोपी मनीषा माने विरोधात हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांचा रोष पाहायला मिळत आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तमध्ये आरोपी मनीषा माने हिला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांनी मनीषा माने विरोधात दाखल केल्या तक्रारी
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी नवनवीन माहिती समोर येत असून, हॉस्पिटलमधील अनेक कर्मचाऱ्यांनी आरोपी मनीषा माने-मुसळे यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने सोलापूर शहर पोलिस तपास सुरू आहेत. याशिवाय फिर्यादी डॉ. अश्विन वळसंगकर, शोनाली वळसंगकर आणि इतर संबंधित व्यक्तींचेही जबाब पोलिसांकडून नोंदवले जात आहेत. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरु असून, लवकरच डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या खऱ्या कारणांचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कोण होते डॉ. शिरीष वळसंगकर?
डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापूरमधील सुप्रसिद्ध न्युरोफिजिशियन होते. त्यांचे वय 69 वर्षे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘एस. पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस’ हे अत्याधुनिक सुविधांनी सज्ज रुग्णालय उभारण्यात आले. 1999 साली हे हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी कार्यरत झाले. डॉ. वळसंगकर यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथे पूर्ण केले. त्यानंतर डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेज, सोलापूर येथून त्यांनी एम.बी.बी.एस. व एम.डी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून एम.आर.सी.पी. (यूके) ही पदवी मिळवली. देशातील अग्रगण्य मेंदूविकार तज्ञांपैकी एक म्हणून त्यांची ख्याती होती. कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागांतील रुग्णांसाठी एसपीएम न्यूरो हॉस्पिटल हे आशेचे केंद्र ठरले आहे. या रुग्णालयात न्यूरोलॉजीशी संबंधित निदान, उपचार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि संशोधन यासाठी आधुनिक उपकरणे व दर्जेदार सुविधा उपलब्ध आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Shirish Valsangkar : डॉ. शिरीष वळसंगकरांच्या आत्महत्या प्रकरणातील महिलेची पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं, चौकशीवेळी नेमकं काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
