एक्स्प्लोर

भाजपमध्ये येणारे साधू-संत नाहीत, एकनाथ खडसेंचा टोला

ष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांसाठी आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे. आम्ही त्यांना स्वच्छ करुन घेतो, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं.

जळगाव : भाजपमध्ये प्रवेश करणारे नेते कुणी साधुसंत नाहीत. सत्तेची ऊब हवीय म्हणूनच हे सर्व नेते भाजपात येत असल्याचा टोला भाजप नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे, ते अशा नेत्यांना धुवून घेतात, असा टोला खडसेंनी लगावला.

शिवसेनेचा दबाव घेऊ नये

नारायण राणेंच्या पक्षप्रवेशाबाबतही त्यांनी वक्तव्य केलं. नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार, असं अनेक वर्षांपासून ऐकतोय. प्रत्येक पक्षाने कोणाला पक्षात घ्यावं, हा अधिकार त्या पक्षाला आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या पक्षप्रवेशावरून शिवसेनाचा दबाव घेऊ नये, असा सल्ला एकनाथ खडसेंनी दिला. युतीबाबत बोलताना, आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युतीचा फायदा होईल. युती होईल अशी आशा आहे. मात्र 50-50 चा फॉर्मुला ठरलेला नाही, ते वरिष्ठ सांगतील, असं खडसे यांनी म्हटलं.

मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांसाठी आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे. आम्ही त्यांना स्वच्छ करुन घेतो. पक्षात आलेल्यांना क्लीन चिट दिली जाते, त्यानंतर ते आपल्या कामाला लागतात. मात्र भाजपमध्ये येणारे साधुसंत नाहीत. सत्तेची ऊब मिळावी यासाठी हे सगळे येत आहेत. भाजपची नीती मूल्य मान्य म्हणून सर्व येत आहेत असं नाही. पक्ष वाढवण्यासाठी चांगल्या लोकांना पक्षात घ्यावं लागतं. मात्र चांगल्या लोकांची व्याख्या ठरवत असताना, दुमत होऊ शकतं असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं.

जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपींनी जन्मठेव व्हावी

जळगाव घरकुल घोटाळ्याच्या निकालाचं एकनाथ खडसे यांनी स्वागत केलं. सुरेश जैन यांना शिक्षेसाठी उशीर झाला. नेहमीच त्यांनी सत्ताधारी पक्षात जाऊन संरक्षण घेतले, नाहीतर 2 वर्षात या प्रकरणाचा निकाल लागला असता. याप्रकरणी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली पाहिजे होती. आरोपींना जन्मठेप मिळावी यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असं खडसे म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tejasvee Ghosalkar: ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांनी भाजपची सत्ता असलेल्या मुंबै बँकेत संचालक होताच थेट पक्षालाच दाखवला आरसा! म्हणाल्या, 'पक्षीय जोडे बाजूला ठेवून..'
ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांनी भाजपची सत्ता असलेल्या मुंबै बँकेत संचालक होताच थेट पक्षालाच दाखवला आरसा! म्हणाल्या, 'पक्षीय जोडे बाजूला ठेवून..'
Navi Mumbai Crime: नवी मुंबईत धनदांडग्याच्या मुलीने मर्सिडीजने स्कुटी उडवली, रेखा यादव हवेत फेकल्या गेल्या अन् जागेवरच प्राण सोडला
पनवेलमध्ये धनदांडग्याच्या मुलीने मर्सिडीजने स्कुटी उडवली, रेखा यादव हवेत फेकल्या गेल्या अन् जागेवरच प्राण सोडला
Beed News : बीड जिल्ह्यात शिक्षण व्यवस्थेचे तीनतेरा, तब्बल 592 धोकादायक वर्गखोल्या, विद्यार्थ्यांना झाडाखाली शिकवण्याची वेळ
बीड जिल्ह्यात शिक्षण व्यवस्थेचे तीनतेरा, तब्बल 592 धोकादायक वर्गखोल्या, विद्यार्थ्यांना झाडाखाली शिकवण्याची वेळ
Nobel Peace Prize: ट्रम्प प्रेमाचे पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय गोडवे सुरुच! युद्धबंदीचे श्रेय देत थेट नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस
ट्रम्प प्रेमाचे पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय गोडवे सुरुच! युद्धबंदीचे श्रेय देत थेट नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Yoga 2025 : देवेंद्र फडणवीसांचा पुण्यात विद्यार्थी, पुणेकरांसोबत योगाभ्यास
Supriya Sule Sunetra Pawar : चर्चा अजितदादांच्या दांडीची, नणंद - भावजयीच्या गोडीची Special Report
Mumbai Local Train Fight महिला स्पेशल लोकलमध्ये का झाली हाणामारी? जागेचा वाद हाणामारीच्या 'ट्रॅक'वर
Jaykumar Gore Special Report : गोरेंकडून खंडणीप्रकरणी दिल्लीचा मांत्रिक अटकेत, राजकीय चर्चांना उधाण
Dhananjay Munde Court Case : मुंडेंना हायकोर्टाचा दणका, पोटगीची 50 % रक्कम कोर्टात जमा करण्याचे आदेश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar: ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांनी भाजपची सत्ता असलेल्या मुंबै बँकेत संचालक होताच थेट पक्षालाच दाखवला आरसा! म्हणाल्या, 'पक्षीय जोडे बाजूला ठेवून..'
ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांनी भाजपची सत्ता असलेल्या मुंबै बँकेत संचालक होताच थेट पक्षालाच दाखवला आरसा! म्हणाल्या, 'पक्षीय जोडे बाजूला ठेवून..'
Navi Mumbai Crime: नवी मुंबईत धनदांडग्याच्या मुलीने मर्सिडीजने स्कुटी उडवली, रेखा यादव हवेत फेकल्या गेल्या अन् जागेवरच प्राण सोडला
पनवेलमध्ये धनदांडग्याच्या मुलीने मर्सिडीजने स्कुटी उडवली, रेखा यादव हवेत फेकल्या गेल्या अन् जागेवरच प्राण सोडला
Beed News : बीड जिल्ह्यात शिक्षण व्यवस्थेचे तीनतेरा, तब्बल 592 धोकादायक वर्गखोल्या, विद्यार्थ्यांना झाडाखाली शिकवण्याची वेळ
बीड जिल्ह्यात शिक्षण व्यवस्थेचे तीनतेरा, तब्बल 592 धोकादायक वर्गखोल्या, विद्यार्थ्यांना झाडाखाली शिकवण्याची वेळ
Nobel Peace Prize: ट्रम्प प्रेमाचे पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय गोडवे सुरुच! युद्धबंदीचे श्रेय देत थेट नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस
ट्रम्प प्रेमाचे पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय गोडवे सुरुच! युद्धबंदीचे श्रेय देत थेट नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस
Iran-Israel Conflict: इस्त्रायलच्या मिसाईल वर्षावात इराणकडून भारतासाठी काय पण! भारतासाठी हवाई हद्द उघडली; एक हजाराहून अधिक अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणणार
इस्त्रायलच्या मिसाईल वर्षावात इराणकडून भारतासाठी काय पण! भारतासाठी हवाई हद्द उघडली; एक हजाराहून अधिक अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणणार
Eng vs Ind Test Day 1: अरे भय्या यारssss! यशस्वी जैस्वाल भर मैदानात कर्णधार शुभमन गिलवर वैतागला, म्हणाला....
अरे भय्या यारssss! यशस्वी जैस्वाल भर मैदानात कर्णधार शुभमन गिलवर वैतागला, म्हणाला....
Sindhudurg Accident News: देवगडमध्ये रिक्षा आणि एसटीचा भीषण अपघात, धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
देवगडमध्ये रिक्षा आणि एसटीचा भीषण अपघात, धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
Shubman Gill Century : कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो', कसोटी कॅप्टनसी डेब्यू अन् थेट ठोकले शतक, इंग्लंडसह जगही अवाक्
कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो', कसोटी कॅप्टनसी डेब्यू अन् थेट ठोकले शतक, इंग्लंडसह जगही अवाक्
Embed widget
OSZAR »