ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2025 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2025 | मंगळवार
1. नाशिकच्या सुधाकर बडगुजरांचा भाजपमध्ये प्रवेश, सकाळी बडगुजरांच्या पक्षप्रवेशाची माहिती नसणाऱ्या चंद्ररशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत प्रवेश, https://tinyurl.com/mwuuv9wv मी निष्पाप, निष्ठेने काम करेन, तुमचा आदेश तंतोतंत पाळेन, भाजपमध्ये प्रवेश करताच सुधाकर बडगुजरांचा बावनकुळेंना शब्द https://tinyurl.com/26jjcffh सुधाकर बडगुजरांच्या एन्ट्रीने भाजपमधील संघर्ष उफाळला, नाशिकच्या राजकारणातही उलथापालथ https://tinyurl.com/2r3m6y72
2. भाजपसोबत जाणाऱ्या संधीसाधूंना सोबत घेणार नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच शरद पवारांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/4xejd3r9 प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार, शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया https://tinyurl.com/57j3xmyu
3. तेजस्वी घोसाळकरांच्या राजीनाम्यानंतर विनोद घोसाळकर उद्धव ठाकरेंच्या भेटीला, सून आणि आपण नेहमीच ठाकरेंसोबत राहणार असल्याचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/4jddzw7y नवऱ्याची हत्या झाल्यानंतरही तेजस्वी घोसाळकरांवर भाजप-शिंदेंकडून पक्षप्रवेशासाठी दबाव, संजय राऊतांचा आरोप, शेजारी उभ्या विनोद घोसाळकरांचे डोळे पाणावले https://tinyurl.com/5n7vrfwj
4. राज्यात शेतीसाठी एआय धोरण मंजूर, आणीबाणीत कारावास भोगलेल्यांचं मानधन दुप्पट, मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय https://tinyurl.com/ycxykz23
5. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला 20 गावांचा विरोध, हद्दवाढ झाल्यास झेडपी, मनपा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा, मुंबईत होणाऱ्या बैठकीकडे गावकऱ्यांचं लक्ष https://tinyurl.com/4fc7vhde
6. राज्यात पुढील 24 तास महत्त्वाचे, रत्नागिरीसह पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथ्यावर वादळी पावसाची शक्यता, राज्य आपत्कालीन केंद्राचा अलर्ट https://tinyurl.com/5bjh53hp
7. जळगावमध्ये 13 वर्षीय मुलाला गळा चिरून संपवलं, मृतदेह शेतात फेकून दिला, नरबळीच्या संशयानं गावकऱ्यांमध्ये दहशत https://tinyurl.com/bds8jduc AIद्वारे तयार केलेल्या अश्लील छायाचित्रांच्या आधारे शेकडो मुलींचा लैंगिक छळ; दहिसर पोलिसांनी आरोपीला कर्नाटकात ठोकल्या बेड्या, मोबाईलमध्ये तब्बल 13 हजार छायाचित्रे https://tinyurl.com/ywvyu2rf
8. पुणे जिल्ह्यातील गावे आणि वाड्यातील सर्व धोकादायक लहान पूल पाडण्यात येणार, कुंडमळा पूल अपघातानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय https://tinyurl.com/4b5znrzy हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले, कुंडमळा दुर्घटनेवेळी उपस्थित प्रत्यक्षदर्शीचा जबाब समोर https://tinyurl.com/mv7ckmyy
9. इस्रायल-इराणमधला संघर्ष शिगेला, इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या मुख्यालयावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला, राजधानी तेल अवीववर देखील क्षेपणास्त्रांनी वार https://tinyurl.com/5bvc3r3u
10. ICCचा नवा फॉर्म्युला, टेस्ट क्रिकेटमध्ये बदल होण्याची शक्यता, पाच नाही तर चार दिवसांचा असणार कसोटी सामना, पण टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसाठी मात्र पाच दिवसांचीच कसोटी https://tinyurl.com/2thzh2ay
एबीपी माझा स्पेशल
छत्रपती संभाजीनगरच्या आजी-आजोबाच्या व्हायरल व्हिडीओची इनसाईड स्टोरी, मोठ्या मनाचा सुवर्णकार https://www.youtube.com/watch?v=q54MJz-ptkU&ab_channel=ABPMAJHA
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w