ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जून 2025 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जून 2025 | रविवार
1. पुण्यातील कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, आतापर्यंत तिघांचा मृत्यू तर 38 जणांना वाचवण्यात यश, अद्यापही अनेकजण वाहून गेल्याची भीती, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू https://tinyurl.com/52ybkyf4 सुमारे 30 वर्षांपूर्वीचा पूल जीर्ण झाला होता, वापरासाठीही धोकादायक, कुंडमाळ्यातील घटना नेमकी कशी घडली? https://tinyurl.com/wv6fdbx3
2. कोकणात मुसळधार पावसाचं थैमान, रत्नागिरीतील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं https://tinyurl.com/2hr4bv6f पुढील 48 तासात राज्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज, कोकणातील रत्नागिरी आणि रायगडमध्ये रेड अलर्ट जारी https://tinyurl.com/3jvscwry
3. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची जमीन खचली, प्रशासनाची धावपळ सुरू, शिवाजी महाराजांचा पुतळा मात्र सुरक्षित https://tinyurl.com/57jem8sj
4. केदारनाथ धामजवळ हेलिकॉप्टर कोसळले, 7 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील दोघांचा समावेश https://tinyurl.com/9fynb4z3 दोन वर्षांच्या लेकीसह देवभूमीला गेले, केदारनाथ हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये यवतमाळच्या जयस्वाल पती पत्नीचा मृत्यू, मुलगा बचावला https://tinyurl.com/587hymnh
5. अहमदाबाद विमान अपघातात 270 जणांचा मृत्यू, डीएनएद्वारे आतापर्यंत 31 मृतदेहांची ओळख पटली https://tinyurl.com/4c32jka5 गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे डीएनए अखेर जुळले; राजकोटमध्ये होणार अंत्यसंस्कार https://tinyurl.com/52n4sv9h
6. फडणवीस-राज भेटीतल्या चर्चेची माझ्याकडं इत्थंभूत माहिती, 'सामना'तील रोखठोकमधून संजय राऊतांचा दावा, फडणवीस एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहतायत, प्रत्येकजण आपल्या तालावर नाचतो असं फडणवीसांना वाटतं, राऊतांचा निशाणा https://tinyurl.com/msptupck 105 हुताम्यांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई व्यापाऱ्यांच्या हाती जाऊ देऊ नका, उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन, महापालिका निवडणुकीसाठी शाखा प्रमुखांना तयारीला लागण्याचे आदेश https://tinyurl.com/4fdw4c2u
7. रश्मी ठाकरेंच्या हट्टामुळे आदित्य ठाकरेंना मंत्रिपद, भरत गोगावलेंचा दावा, स्वत: मुख्यमंत्री असताना मुलाला मंत्रिपद देणं चुकीचं असल्याचंही वक्तव्य https://tinyurl.com/2jyuvsuc महायुतीतील शिवसेना-राष्ट्रवादीत धुसफूस वाढली, भरत गोगावलेंचा घोटाळा बाहेर काढणार, आनंद परांजपेंचा इशारा, तर एक जरी घोटाळा बाहेर काढून दाखवला तर आमदारकीसह मंत्रिपदाचा राजीमाना देणार, गोगावलेंचा पलटवार https://tinyurl.com/5fhrr6zd
8. नाशिकच्या सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त लागणार, वरिष्ठांच्या सूचनेनंतर स्थानिक भाजपचा विरोध मावळला, पक्षाचा निर्णय मान्य असल्याचं पदाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/ykmpvpkd
9. आधी पतीला कुऱ्हाडीने वार करून संपवलं, नंतर पत्नीने मृतदेहाचे तुकडे करून शोषखड्ड्यात टाकले, तब्बल दोन महिन्यांनी नाशिकमधील भयंकर कृत्याचा उलगडा https://tinyurl.com/55ptx9k2 शिक्षकच झाला भक्षक, अश्लील व्हिडीओ दाखवत चौथीतल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, संभाजीनगरातील घटनेनं थरकाप https://tinyurl.com/4brkcy5r
10. पंचतारांकीत हॉटेलमध्ये मिटींग अन् विद्यार्थ्यांमागे 90 लाखांची मागणी, नीट परीक्षेत चांगले गुण मिळवून देण्याचं आमिष देऊन पालकांना घातला लाखोंचा गंडा https://tinyurl.com/5n7s3f8p
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w