Persona Non Grata : पर्सोना नॉन ग्रॅटा म्हणजे काय? दिल्लीतील पाकिस्तानी अधिकाऱ्यांवर भारत काय कारवाई करू शकतो? त्याचे परिणाम काय?
What Is Persona Non Grata : या आधी भारताने 2016 साली एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला पर्सोना नॉन ग्रॅटा घोषित केलं होतं. रशियानेही 2018 साली ब्रिटनच्या अधिकाऱ्यावर तशी कारवाई केली होती.

मुंबई : भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर आता राजनयिक स्तरावरही कारवायाही सुरू केल्या आहेत. नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याला भारताने पर्सोना नॉन ग्रॅटा (Persona Non Grata) म्हणून घोषित केलं आणि 24 तासांच्या आत देश सोडण्याचा आदेश दिला. दोन देशांमधील राजनयिक संबंधाशी संबंधित 1961 सालच्या व्हिएन्ना कराराच्या आधारे (Vienna Convention on Diplomatic Relations 1961) भारताने ही कारवाई केली आहे. आता त्या अधिकाऱ्याला भारत सोडण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा त्याच्यावर कारवाई होऊन तो भारतात फसू शकतो.
भारताच्या या कारवाईनंतर पर्सोना नॉन ग्रॅटा म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या कारवाईला आधार काय आणि त्याचे परिणाम काय असाही प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात
What Is Persona Non Grata : पर्सोना नॉन ग्रॅटा म्हणजे नेमकं काय?
पर्सोना नॉन ग्राटा (Persona non grata) हा लॅटिन शब्दप्रयोग आहे. एखाद्या परदेशी राजनयिक प्रतिनिधीला किंवा अधिकाऱ्याला त्या देशात न स्वीकारण्याजोगी व्यक्ती म्हणून घोषित करणे ही त्यामागची संकल्पना आहे. म्हणजे दुसऱ्या देशाचा राजनयिक अधिकारी त्याच्या कामाव्यतिरिक्त इतर अवैध किंवा त्या देशाच्या विरोधातील कारवायांमध्ये गुंतला असेल तर अशी कारवाई करण्याचा अधिकार त्या देशाला असतो.
Persona Non Grata : कायदेशीर आधार काय?
1961 च्या व्हिएन्ना कराराच्या (Vienna Convention on Diplomatic Relations) अनुच्छेद 9 नुसार, कोणत्याही देशाला त्याच्या भूमीवर कोणत्याही परदेशी राजनैतिक प्रतिनिधीला टपर्सोना नॉन ग्राटाट घोषित करण्याचा अधिकार आहे. यासाठी त्या देशाला कोणतीही कारणे देण्याची आवश्यकता नाही. जर संबंधित व्यक्तीला परत बोलावले गेले नाही, तर त्या व्यक्तीला राजनैतिक सन्मान (diplomatic immunity) मिळणार नाही आणि त्याला त्या देशातून हाकलले जाऊ शकते. पर्सोना नॉन ग्राटा घोषित करणे हे एक गंभीर राजनैतिक पाऊल आहे, जे दोन देशांदरम्यानच्या संबंधांवर मोठा परिणाम करू शकते.
Impacts Of Persona Non Grata : कायदेशीर परिणाम काय होऊ शकतात?
राजनैतिक विशेषाधिकारांचे निलंबन
पर्सोना नॉन ग्राटा घोषित केल्यावर, संबंधित व्यक्तीला राजनैतिक सन्मान किंवा विशेष अधिकार मिळणार नाहीत.
देशातून हाकलणे
जर संबंधित व्यक्तीने त्याच्या देशात परत जाण्याचे आदेश नाकारले, तर त्या व्यक्तीला देशातून हाकलले जाऊ शकते.
दंडात्मक कारवाई
जर संबंधित व्यक्तीने गंभीर गुन्हे केले, तर त्या व्यक्तीविरोधात दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.
Reasons Of Persona Non Grata : पर्सोना नॉन ग्राटा घोषित करण्याचे मुख्य कारणे
गुप्तचर कृत्यांमध्ये सहभाग
संबंधित अधिकारी जर गुप्तचर कारवायांमध्ये सहभागी असेल किंवा देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणारे कृत्य.
राजकीय हस्तक्षेप
देशाच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करणे.
नैतिक उल्लंघन
नैतिक किंवा कायदेशीर उल्लंघन करणारे कृत्य
History Of Persona Non Grata : या आधी अशा कोणत्या घटना घडल्या होत्या?
भारत-पाकिस्तान: 2016 मध्ये, भारताने पाकिस्तानच्या एका राजनैतिक प्रतिनिधीला पर्सोना नॉन ग्राटा घोषित (India Expels Pakistani Diplomat) केले होते. कारण तो गुप्तचर कारवायांमध्ये सहभागी होता.
रशिया-ब्रिटन: 2018 मध्ये, रशियाने ब्रिटनच्या एका राजनैतिक प्रतिनिधीला पर्सोना नॉन ग्राटा घोषित केले होते, कारण त्याने रशियाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केला होता.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
