Manohar Lal Dhakad : भाजप नेत्याने गर्लफ्रेन्डसोबत हायवेवर सेX केलं, कंपनीने नाईट शिफ्टच्या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं
Manohar Lal Dhakad Viral Video: ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी कंपनीचे तीन कर्मचारी हे नाईट शिफ्टमध्ये कार्यरत होते. त्यांना दोषी ठरवण्यात आलं आणि निलंबन करण्यात आलं.

भोपाळ : मध्य प्रदेशमधील भाजप नेता मनोहर धाकडने एका मुलीसोबत दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सेक्स केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आता सरकारने कारवाई केली आहे. धाकडचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर (Manohar Lal Dhakad Video) सरकारने तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. निलंबित करण्यात आलेले कर्मचारी हे खासगी कंपनीचे असून या हायवेचे मेंटेनन्स आणि मॉनिटरिंग करण्याची जबाबदारी त्या कंपनीकडे आहे.
मध्य प्रदेशमधील मंदसोरचा नेता मनोहर धाकडने हायवेवरच त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत सेक्स केल्याची घटना घडली होती. 13 मे रोजी घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कंपनीला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या प्रकरणात कंपनीने तीन कर्मचाऱ्यांना दोषी धरले आणि त्यांना कामावरून काढून टाकले. हे सर्व कर्मचारी 13 मे च्या रात्री रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत होते.
सध्या या कर्मचाऱ्यांना फक्त निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणात जर गरज पडली तर या तिघांनाही चौकसीसाठी बोलवण्यात येईल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.
कर्मचाऱ्यांनीच व्हिडीओ व्हायरल केला
या प्रकरणात हायवे कर्मचाऱ्यांनीच हा व्हिडीओ व्हायरल केल्याची माहिती समोर येत आहे. या कर्मचाऱ्यांनी मनोहरलाल धाकडला त्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती आणि त्याच्याकडून एक लाखांची मागणी केली होती. त्यामध्ये 20 हजार रुपये देण्यात आले होते. यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी हा व्हिडीओ व्हायरल केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस या प्रकरणी अधिकचा तपास करत आहेत.
मनोहरलाल धाडकला अटक आणि जामीन अटकेत
हायवेवरच हे अश्लील कृत्य करणाऱ्या मनोहर लाल धाकडला पोलिसांनी अटक केली होती. पण सोमवारी त्याला जामीन मिळाला. या प्रकरणातील त्याच्यासोबत असलेल्या मुलीचा तपास करण्यात येत आहे.
Who Is Manohar Lal Dhakad : कोण आहे मनोहरलाल धाकड?
मनोहरलाल धाकड हा मध्य प्रदेशातील मंदसोर जिल्ह्यातील बनी गावचा रहिवासी आहे. त्याची पत्नी ही जिल्हा पंचायत सदस्या आहे. मंदसोर जिल्हा पंचायतीच्या वार्ड क्रमांक 8 मधून ती भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आली आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
