Video : आई वाचवं मला! चार वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, दहा लाख देतोस की नाही? बायकोनं नवऱ्याला खोली बंद करून चोपलं; हतबल नवऱ्याची आईकडे मदतीसाठी याचना
Wife Locked Her Husband in The Room And Beat Him : व्हिडिओत तो तरुण आपल्या पत्नीला 'मला तुझी खूप भीती वाटते' असे सांगताना दिसत आहे. त्यानंतर पत्नी खोलीला कडी लावून व्हिडिओ बंद करण्याचा प्रयत्न करते.
Wife Locked Her Husband in The Room And Beat Him : चार वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या पत्नीकडून पतीला खोलीची कडी घालून बेदम मारहाण केल्याची घटना सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. मध्य प्रदेशातील सतनामधील सिंधी कॅम्पमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला त्याच्या पत्नीने खोलीत कोंडून मारहाण केली. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. पत्नीने पतीला जमिनीवर फेकून मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तो तरुण आईला वाचवण्याची विनंती करत होता. आपल्या मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून आईने तिला खोलीबाहेर फेकले आणि सुनेला फटकारले. यानंतर पत्नी तिच्या खोलीत गेली आणि दरवाजा आतून बंद केला.
म्हणूनच मी व्हिडिओ बनवत आहे
तरुण पत्नीसोबतच्या संभाषणाचा व्हिडिओ बनवत होता, पत्नीने नकार दिल्यावर तरुण म्हणाला, 'नाही, तू मला मारायला सुरुवात करतेस, म्हणूनच मी व्हिडिओ बनवत आहे'. पत्नी म्हणाली, मी तुला मारहाण करणार नाही, व्हिडिओ थांबवा आणि फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला, यावर तरुण व्हिडिओमध्ये 'हे बघा, ती मला मारहाण करत आहे' असे म्हणताना दिसत आहे. यादरम्यान पत्नी सतत फोन हिसकावण्याचा प्रयत्न करते आणि 'मी तुम्हाला इथं बोलण्यासाठी बोलावले आहे', असे म्हणते. व्हिडिओमध्ये तो तरुण आपल्या पत्नीला 'मला तुझी खूप भीती वाटते' असे सांगताना दिसत आहे. त्यानंतर पत्नी खोलीला कडी लावून व्हिडिओ बंद करण्याचा प्रयत्न करते. तरुणाचे पटत नाही तेव्हा पत्नीने तरुणाला धक्काबुक्की केली, त्याचा गळा दाबला आणि कानशिलात मारण्यास सुरुवात केली.
4 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता
मिळालेल्या माहितीनुसार, तरुण आणि तरुणीचा 4 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीचे काही महिने चांगले गेले, पण नंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्याच्या पत्नीने त्याच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी सुरू केली. पैसे दिले नाहीत तर खोट्या प्रकरणात अडकवतो, असे पत्नीने सांगितले. पतीने नकार दिल्याने ती त्याला रोज मारहाण करू लागली. तरूणाने सांगितले की, 25 ऑक्टोबरला त्याला बेदम मारहाण करण्यात आली. ज्याचा व्हिडिओ मी आज इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या