एक्स्प्लोर

दोन वर्षांच्या लेकीसह देवभूमीला गेले, केदारनाथ हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये यवतमाळच्या जयस्वाल पती पत्नीचा मृत्यू, मुलगा बचावला

राजकुमार जयस्वाल यांचा मुलगा विवान हा त्या दिवशी आपल्या आजोबांसोबत पांढरकवडा येथे थांबलेला असल्यामुळे बचावला.

Kedarnath Helicopter Crash: उत्तराखंडमधील केदारनाथ धामकडे जात असलेल्या हेलिकॉप्टरचा रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील जयस्वाल कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची अवघ्या दोन वर्षांची चिमुरडी काशी राजकुमार जयस्वाल यांचा समावेश आहे.

वणीतील जयस्वाल कुटुंबियांचा मृत्यू

ही दुर्दैवी घटना गुप्तकाशीहून केदारनाथकडे जाताना गौरीकुंड आणि त्रिजुगी नारायण दरम्यानच्या जंगलात घडली. सकाळी साडेपाच वाजता हेलिकॉप्टर कोसळले, त्यावेळी त्यामध्ये सात जण प्रवासी होते. सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जयस्वाल कुटुंब धार्मिक यात्रेसाठी उत्तराखंडला गेले होते. या दुर्घटनेत त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीचा देखील मृत्यू झाल्याची माहिती वणी शहरात समजताच हळहळ व्यक्त केली जात आहे.  राजकुमार जयस्वाल यांचा मुलगा विवान हा त्या दिवशी आपल्या आजोबांसोबत पांढरकवडा येथे थांबलेला असल्यामुळे बचावला. एक वर्षांपूर्वीच त्यांच्या मुलीचं नामकरण ‘काशी’ असं करण्यात आलं होतं. तिच्या नावाने वणी शहरात मोठ्या भक्तिभावाने काशी शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली होती. प्रदीप मिश्रा यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून ही कथा शहरवासीयांनी अनुभवली होती.

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा भीषण अपघात

रविवारी सकाळी केदारनाथ मार्गावर एक हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये एकूण सात जण होते. या दुर्दैवी अपघातात सर्व जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर रविवारी सकाळी कोसळले. गौरीकुंड परिसरात हा अपघात झाला. ही घटना पहाटे 5.30 वाजता घडल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन जण असल्याची माहिती आहे. 

या महिन्यातील चौथी घटना

 

8 मे – उत्तरकाशी अपघात:
गंगणी (उत्तरकाशी) येथे भागीरथी नदीजवळ हेलिकॉप्टर कोसळले. पायलटसह 6 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये बरेलीच्या आई-मुलीचा समावेश. हेलिकॉप्टर गंगोत्री धामकडे जात होते.

17 मे – केदारनाथ एअर अ‍ॅम्ब्युलन्स अपघात:
रुग्ण घेण्यासाठी येत असलेले हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान कोसळले. पायलट, डॉक्टर आणि नर्स सुरक्षित. टेल बूम तुटल्यामुळे अपघात.

7 जून – आपत्कालीन लँडिंग:
रुद्रप्रयागमध्ये तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरची रस्त्यावर इमरजन्सी लँडिंग. मागचा भाग कारवर पडला. पायलटला किरकोळ इजा, प्रवासी सुरक्षित.

15 जून – केदारनाथ अपघात:
गुप्तकाशीहून केदारनाथकडे जात असलेले हेलिकॉप्टर कोसळले. 7 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये यवतमाळच्या वणी येथील जयस्वाल कुटुंबीयांचा समावेश.

हेही वाचा

Kedarnath Helicopter Crash: केदारनाथ धामजवळ हेलिकॉप्टर कोसळले, 7 जणांचा मृत्यू, जंगलामध्ये झालं क्रॅश, बचाव पथक रवाना, महाराष्ट्रातील दोघांचा समावेश

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University : मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार? विद्यार्थ्यांचे पेपर चेक न करताच नापास केलं, युवा सेनेचा आरोप
मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार? विद्यार्थ्यांचे पेपर चेक न करताच नापास केलं, युवा सेनेचा आरोप
त्रिभाषा सूत्रासंदर्भात संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय, बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
त्रिभाषा सूत्रासंदर्भात संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय, बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढली! आठवा वेतन आयोग नेमका कुठे अडकला? सरकारच्या मौनामुळं भीती
सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढली! आठवा वेतन आयोग नेमका कुठे अडकला? सरकारच्या मौनामुळं भीती
कधी होणार महापालिकेच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या महत्वाचे टप्पे  
कधी होणार महापालिकेच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या महत्वाचे टप्पे  
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel War : इराण-इस्त्रायल वाद, अमेरिकेची उडी, भारतावर परिणाम काय? A टू Z विश्लेषण
Satara ZP School Poor Condition साताऱ्यात नगरपालिका, जि. परिषद शाळांची दुरावस्था; प्रशासनाचं दुर्लक्ष
Hasan Mushrif On  Abu azmi यांना मी भेटून वारकरी संप्रदाय समजावून सांगेन, मुश्रीफ यांचं वक्तव्य
Sandeep Deshpande : ..जर मला जेलमध्ये जावं लागलं तरीही मी तयार,संदीप देशपांडे आक्रमक
Gulabrao Patil Vs Sanjay Raut : संजय राऊत आणि मंत्री गुलाबराव पाटलांमध्ये पुन्हा जुंपली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai University : मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार? विद्यार्थ्यांचे पेपर चेक न करताच नापास केलं, युवा सेनेचा आरोप
मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार? विद्यार्थ्यांचे पेपर चेक न करताच नापास केलं, युवा सेनेचा आरोप
त्रिभाषा सूत्रासंदर्भात संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय, बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
त्रिभाषा सूत्रासंदर्भात संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय, बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढली! आठवा वेतन आयोग नेमका कुठे अडकला? सरकारच्या मौनामुळं भीती
सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढली! आठवा वेतन आयोग नेमका कुठे अडकला? सरकारच्या मौनामुळं भीती
कधी होणार महापालिकेच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या महत्वाचे टप्पे  
कधी होणार महापालिकेच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या महत्वाचे टप्पे  
गंगापूर धरणातून विसर्ग, सोमेश्वर धबधब्याचे रौद्ररूप; पर्यटकांना प्रशासनाकडून सूचना
गंगापूर धरणातून विसर्ग, सोमेश्वर धबधब्याचे रौद्ररूप; पर्यटकांना प्रशासनाकडून सूचना
'वर्षा' बंगल्यावर तातडीची बैठक, दादा भुसे अन् एकनाथ शिंदे हजर; दुसरीकडे पुण्यात मनसेचा इशारा
'वर्षा' बंगल्यावर तातडीची बैठक, दादा भुसे अन् एकनाथ शिंदे हजर; दुसरीकडे पुण्यात मनसेचा इशारा
Pune Station : पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी, मेधा कुलकर्णींच्या प्रस्तावाला विरोध
पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी, मेधा कुलकर्णींच्या प्रस्तावाला विरोध
Trent : टाटा ग्रुपचा 'हा' स्टॉक तेजीत, 5 महिन्यांचा उच्चांक गाठला, तज्ज्ञांकडून खरेदीबाबत महत्त्वाचा सल्ला
टाटा ग्रुपचा 'हा' स्टॉक तेजीत, 5 महिन्यांचा उच्चांक गाठला, तज्ज्ञांकडून खरेदीबाबत महत्त्वाचा सल्ला
Embed widget
OSZAR »