Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: बैठो, हम लोग फौज है, हम इंडियन आर्मी है! दहशतवादी आले वाटल्याने भारतीय महिला प्रचंड घाबरल्या, सैनिकाने काढली समजूत, पाहा व्हिडिओ
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: हल्ला झाला त्यावेळी दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते. त्यामुळे पर्यटकांना त्यांचा संशय आला नाही. मात्र, या हल्ल्यानंतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण पसरलं होतं, एक महिला भारतीय सैन्याला पाहून घाबरली.

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) मध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या वैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी काल (मंगळवारी) पर्यटकांतर केलेल्या बेछूट गोळीबारात पर्यटकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते. त्यामुळे पर्यटकांना त्यांचा संशय आला नाही. मात्र या हल्ल्यानंतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण पसरलं होतं, एक महिला भारतीय सैन्याला पाहून घाबरली. ती महिला भारतीय सैन्यांना पाहताच मोठ-मोठ्याने रडू लागली. यावरती सैनिकांनी तिला विश्वास दिला आणि त्या सर्व पर्यटकांना पाणी देत त्यांच्याकडून माहिती घेतली. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मिडियावरती व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये एक पर्यटक काय घडलं हे सांगताना दिसतो, तर त्यांच्या मागच्या बाजूला एक महिला मोठ-मोठ्याने रडताना दिसते. जेव्हा त्या महिलेची नजर भारतीय सैन्यांवर पडते, तेव्हा ती महिला जोरात ओरडायला लागते आणि रडू लागते. तेव्हा सैनिक त्या घाबरलेल्या पर्यटकांना खाली बसा आम्ही सैनिक आहोत असं सांगतात. मात्र, ती महिला हात जोडून रडत माझ्या मुलांना काही करू नका, असं म्हणते, त्यावेळी सैनिक त्या महिलेला सांगतात, आम्ही भारतीय फौजी आहोत, तुमच्या सुरक्षेसाठी आहोत. तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही येथे आलो आहोत. आम्ही भारतीय सैनिक आहोत. खाली बसा. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही कोणत्या ठिकाणावरून आला आहात असंही सैनिक त्यांना विचारतात, मात्र, त्यावेळी ती महिला माझ्या नवऱ्याला मारलं म्हणत पुन्हा मोठ्याने रडायला लागते. माझ्या नवऱ्याला मारलं, आता मला पण मारून टाका, असंही ती म्हणते.
महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू
जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत.
महाराष्ट्रातील मृतांची नावे
1) अतुल मोने - डोंबिवली
2) संजय लेले - डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4) संतोष जगदाळे- पुणे
5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
6) दिलीप देसले- पनवेल
जखमींची नावे
1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
