ट्रेंडिंग
Rajnath Singh: नाश्त्यासाठी जेवढा वेळ लागतो, तेवढ्या वेळेत तुम्ही दुश्मनांचा सूपडा साफ केलात, भूज एअरबेसवर जाऊन राजनाथ सिंहांकडून सैनिकांचं कौतुक
Rajnath Singh: आपल्याला नाश्त्यासाठी जेवढा वेळ लागतो, तेवढ्या वेळेत तुम्ही दुश्मनांचा सूपडा साफ केलात, असे गौरवोद्गार काढत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी भारतीय हवाई दलाच्या सैनिकांचं कौतुक केलंय.
Rajnath Singh on Operation Sindoor : भारताच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रांपुढे पाकिस्तानने गुडघे टेकले. तसेच आपल्याला नाश्त्यासाठी जेवढा वेळ लागतो, तेवढ्या वेळेत तुम्ही दुश्मनांचा सूपडा साफ केलात, असे गौरवोद्गार काढत देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी भारतीय हवाई दलाच्या सैनिकांचं कौतुक केलंय. संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांनी (Rajnath Singh) आज (16 मे )भुज एअरबेसला भेट देऊन सैनिकांशी चर्चा केली. तसेच भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीबाबत शाबासकीही दिली. राजनाथसिंहांसह या भेटीवेळी एअरचीफ मार्शल अमरप्रीतसिंहही उपस्थित होते.
....ही काही छोटी गोष्ट नाही- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
"आपल्या हवाई दलाला पाकिस्तानच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रवेश कारणं शक्य आहे, हे आता पूर्णपणे सिद्ध झाले आहे. ही काही छोटी गोष्ट नाही. आज परिस्थिती अशी आहे की भारताची लढाऊ विमाने देशाच्या सीमा ओलांडल्याशिवाय ही येथून प्रत्येक कोपऱ्यात मारा करण्यास सक्षम आहेत. 'ऑपरेशन सिंदूर'च्या नंतरच्या कारवाईत तुम्ही पाकिस्तानी भूमीवरील नऊ दहशतवादी अड्डे कसे उद्ध्वस्त केले आणि त्यांचे अनेक हवाई तळ कसे नेस्तनाबूत केले हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. असेही संरक्षणमंत्री म्हणाले.
पाकिस्तानला दिवसा तारे दिसली - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
पुढे बोलताना राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे कौतुक केले. ते म्हणाले, "ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ताकद पाकिस्तानने स्वतः स्वीकारली आहे. आपल्या देशात एक जुनी म्हण आहे आणि ती म्हणजे - दिवसा तारे दिसणे." पण भारतात बनवलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने रात्रीच्या अंधारात पाकिस्तानला दिवसाचा प्रकाश दाखवला आहे. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि डीआरडीओने बनवलेल्या 'आकाश' आणि इतर रडार प्रणालींनी त्यात मोठी भूमिका बजावली असल्याचे ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही, हा फक्त एक ट्रेलर
दरम्यान, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. हे फक्त एक ट्रेलर आहे, वेळ आल्यावर आम्ही संपूर्ण चित्र जगाला दाखवू. असेही राजनाथ सिंह म्हणाले. सध्याच्या युद्धबंदीमध्ये आम्ही पाकिस्तानला त्याच्या वर्तनाच्या आधारावर प्रोबेशनवर ठेवले आहे, जर त्यांच्या वर्तनात काही अडथळा आला तर कठोर कारवाई केली जाईल. असे म्हणत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी थेट पाकिस्तानला निर्वाणीचा ईशारा दिला आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानी लष्करी तळांचे मोठे नुकसान झाले. या काळात भारतीय हवाई दलाने महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानची 5 विमाने पाडली. यामध्ये 2 लढाऊ विमानांचा समावेश होता. अशातच भारतानं 'भोलारी एअरबेसवर 4 ब्राह्मोस क्षेपणास्त्रे डागली, AWACS विमानं नष्ट केलीत असा मोठा दावा पाकिस्तानच्या माजी एअर मार्शल मसूद अख्तर यांनी केला आहे.
हे ही वाचा