Ahmedabad Air India plane Crash : 'ती' बातमी अखेर खरी ठरली, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी त्याच विमानात, बोर्डिंग पास मिळाला!

Ahmedabad Plane Crash Updates : गुजरातच्या अहमदाबाद शहरात गुरुवारी मोठा विमान अपघात घडला. अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI171 या फ्लाइटचा टेकऑफदरम्यान अपघात झाला.

Continues below advertisement

Ahmedabad Air India plane Crash Update : गुजरातच्या अहमदाबाद शहरात गुरुवारी मोठा विमान अपघात घडला. अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI171 या फ्लाइटचा टेकऑफदरम्यान अपघात झाला. या विमानात 242 प्रवासी व क्रू मेंबर्स प्रवास करत होते, अशी माहिती एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने दिली आहे. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी सुद्धा प्रवास करत होते. हे आता त्यांच्या नावाचा बोर्डिंग पास समोर आल्यानंतर स्पष्ट झालं आहे.

Continues below advertisement

'ती' बातमी अखेर खरी ठरली....

विजय रूपाणी यांच्या प्रवासाची माहिती आधी फक्त सूत्रांमधून समोर येत होती, पण आता त्यांच्या नावाचा अधिकृत बोर्डिंग पास सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे बातमीला दुजोरा मिळाला असून, त्यांची प्रकृती सुरक्षित असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे, मात्र याबाबत अजून अधिकृत पुष्टी बाकी आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस व वैद्यकीय पथक दाखल झाले असून, प्रवाशांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळील मेघनानी नगर परिसरात विमान कोसळले. अग्निशमन अधिकारी जयेश खाडिया यांनी सांगितले की, विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. अहमदाबादचे पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी सांगितले की, विमानतळाजवळील मेघनानी नगर येथे विमान कोसळले. 

एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात, नेमकं काय घडलं? A टू Z

  • उड्डाण क्रमांक AI171 ने दुपारी 1.17 वाजता अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केले.
  • दुपारी 1.20 वाजता मेघनानी नगर परिसरातील मेंटल हॉस्पिटल कॅम्पसजवळ विमान कोसळले.
  • अहमदाबादमध्ये टेक ऑफ करताना एअर इंडियाचे विमान कोसळले.
  • विमान अहमदाबादहून लंडनला जात होते.
  • अपघाताच्या वेळी एअर इंडियाच्या विमानात 242 लोक होते, ज्यात क्रू मेंबर्स, पायलट आणि प्रवासी होते.
  • या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी सुद्धा प्रवास करत होते.
  • विमान अपघातात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
  • ट्विटरवर पोस्ट करताना एअर इंडियाने लिहिले की, अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे विमान क्रमांक AI171 आज, 12 जून 2025 रोजी कोसळले.  

हे ही वाचा -

Ahmedabad plane crash : गुजरातमध्ये 242 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं!

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »