एक्स्प्लोर

Crop Insurance : हिंगोलीत 1800 शेतकऱ्यांनी भरला बोगस पीक विमा, शासकीय जमिनीवरही काढला विमा, कृषी विभागाचे चौकशीचे आदेश

Crop Insurance : कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक चौकशीत हिंगोली जिल्ह्यात 1800 शेतकऱ्यांनी बोगस पिक विमा भरल्याची माहिती समोर येत आहे. 

हिंगोली : नाशिक, बीड, परभणीनंतर हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी बोगस पीकविमा (Bogus Crop Insurance) काढल्याचं कृषी विभागाच्या प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.  कृषी विभागाच्या (Agriculture Department) वतीने केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये 1800 शेतकऱ्यांनी (Farmers) 4500 हेक्टरवर बोगस पिक विमा भरल्याची माहिती समोर येत आहे. 

बळीराजाला अनेक नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागतो. नैसर्गिक संकटामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. बळीराजाला पिकांच्या नुकसानीचा मोबदला मिळावा, आर्थिक मदत व्हावी, या हेतुने शासनाने पीक विमा योजना (Crop Insurance Scheme) राबविण्याचा निर्णय घेतला. यानुसार केवळ एक रुपया भरून पीक विमा काढता येत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला तरी बोगस पीकविमा काढला जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. 

शासकीय जमिनीवरच पीक विमा 

राज्यभरामध्ये बोगस पीक विम्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात देखील कृषी विभागाच्या वतीने केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये 1800 शेतकऱ्यांनी 4500 हेक्टरवर बोगस पिक विमा भरल्याचे उघड झाले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी हे बाहेरील जिल्ह्यातील आहेत. तर काही शेतकऱ्यांनी शासकीय जमिनीवरच पीक विमा भरल्याचे उघड  झाले आहे. 

ग्राहक सेवा केंद्रावर काय कारवाई होणार? 

काही शेतकऱ्यांच्या जमिनीची अभिलेखात नोंदच नाही, अशा जमिनीवर देखील पिक विमा भरण्यात आला आहे.कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा पिक विमा कोणत्या ग्राहक सेवा केंद्रावरून भरला आहे? याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. त्यानंतर त्या ग्राहक सेवा केंद्रावर काय कारवाई केली जाते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी काढलाय पीक विमा

हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामात 4 लाख 72 हजार 15 शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला आहे. यात हिंगोली 87 हजार 594, सेनगाव तालुक्यात 1 लाख 10 हजार 768, वसमत 1 लाख 2 हजार 906, औंढा ना. 88 हजार 795, कळमनुरी 82 हजार 152 शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत बोगस 1800 अर्ज भरल्याचे समोर आले आहे. बोगस पीक विम्याचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

सोयाबीन खरेदीची मुदत संपली, राहिलेल्या सोयाबीनचं करायचं काय? शेतकरी चिंतेत, राज्य सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव 

PM Kisan yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! PM किसानचा 19 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा 'हे' काम

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस, तळकोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा हायअलर्ट; हवामान विभागाचा अंदाज काय?
कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस, तळकोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा हायअलर्ट; हवामान विभागाचा अंदाज काय?
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातामुळं विराट कोहलीला धक्का, अनुष्का शर्मा भावूक, दोघांनी काय म्हटलं?
अहमदाबाद विमान अपघातामुळं विराट कोहलीला धक्का, अनुष्का शर्मा भावूक, दोघांनी काय म्हटलं?
विमान दुर्घटनेत कॅप्टन सुमितसह 4 मराठमोळ्या क्रू मेंबर्सचा मृत्यू; अपर्णा महाडिक तटकरेंच्या नातेवाईक
विमान दुर्घटनेत कॅप्टन सुमितसह 4 मराठमोळ्या क्रू मेंबर्सचा मृत्यू; अपर्णा महाडिक तटकरेंच्या नातेवाईक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जून  2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जून  2025 | गुरुवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ahmedabad Plane Crash CCTV : अहमदाबाद विमान अपघाताच्या काही सेकंदाचा पूर्वीचा CCTVAhmedabad plane crash update  : सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू! विमान दुर्घटनेत कुणीच बचावलं नाही..- एपीAir India Plane Crash | इमारतीची भींत फोडून विमान थेट कोसळलं, भयावह दृश्य आली समोर; मोठी जीवितहानीAir India Plane Crash अहमदाबादमध्ये विमान कोसळल्यानं जीवितहानी;रेल्वेची आपत्ती व्यपस्थापन टीम दाखल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस, तळकोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा हायअलर्ट; हवामान विभागाचा अंदाज काय?
कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस, तळकोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा हायअलर्ट; हवामान विभागाचा अंदाज काय?
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातामुळं विराट कोहलीला धक्का, अनुष्का शर्मा भावूक, दोघांनी काय म्हटलं?
अहमदाबाद विमान अपघातामुळं विराट कोहलीला धक्का, अनुष्का शर्मा भावूक, दोघांनी काय म्हटलं?
विमान दुर्घटनेत कॅप्टन सुमितसह 4 मराठमोळ्या क्रू मेंबर्सचा मृत्यू; अपर्णा महाडिक तटकरेंच्या नातेवाईक
विमान दुर्घटनेत कॅप्टन सुमितसह 4 मराठमोळ्या क्रू मेंबर्सचा मृत्यू; अपर्णा महाडिक तटकरेंच्या नातेवाईक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जून  2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जून  2025 | गुरुवार
टाटा ग्रुपकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 1 कोटींची मदत; जखमींचा खर्च उचलणार, वसतिगृह देखील बांधणार
टाटा ग्रुपकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 1 कोटींची मदत; जखमींचा खर्च उचलणार, वसतिगृह देखील बांधणार
अत्यंत वेदनादायी, दुर्दैवी, विमान दुर्घटनेत विजय रुपाणींचाही मृत्यू; एकनाथ शिंदेंनी दिली माहिती
अत्यंत वेदनादायी, दुर्दैवी, विमान दुर्घटनेत विजय रुपाणींचाही मृत्यू; एकनाथ शिंदेंनी दिली माहिती
सर्वात सुरक्षित समजलं जाणारं विमान कोसळलंच कसं, धृव राठीकडून शंका व्यक्त!
सर्वात सुरक्षित समजलं जाणारं विमान कोसळलंच कसं, धृव राठीकडून शंका व्यक्त!
Air India Plane Crash : ज्या होस्टेलवर विमान कोसळलं तिथं मुलगा लंच ब्रेकमध्ये गेला होता, सगळं संपलं असं वाटलं पण मुलगा वाचला, रमीला बेन म्हणतात..
ज्या होस्टेलवर विमान कोसळलं तिथं मुलगा लंच ब्रेकमध्ये गेला होता, सगळं संपलं असं वाटलं पण, रमीला बेन म्हणतात...
Embed widget
OSZAR »