Walmik Karad: वाल्मीक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट? स्पेशल चहा, झोपायला 6 ब्लँकेटची खास सोय, चपात्या अन्... तुरुंगवारी करून परतलेल्या रणजीत कासलेचा आरोप
Ranjeet Kasle: बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याचा सोशल मीडियावर नवा व्हिडिओ समोर आला आहे.
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला बीडच्या कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा दावा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याने केला आहे. त्याच्यासाठी स्पेशल चहा दिला जातो, त्याला चांगल्या चपात्या दिल्या जातात. स्वतः सह इतर कैद्यांच्या नावावर तो 25 हजारांची खरेदी कारागृहातील कँटीनमधून करत असल्याचा आरोप बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याने केला आहे. कासलेनं काल (शनिवारी) याबाबतच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा वाल्मीक कराडला तुरुंगात मिळणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंटची चर्चा सुरू झाली आहे. तप पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
कराडला जेलमध्ये स्पेशल चहा
बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याला आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने आपले आरोप सत्र सुरू ठेवले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला बीडच्या कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे. कराडला जेलमध्ये स्पेशल चहा दिला जात असून जेवणात त्याला चांगल्या चपात्या देखील दिल्या जात आहेत. इतकच नाही तर स्वतःसह इतर कैद्यांच्या नावावर तो 25000 ची खरेदी कारागृहातील कॅन्टीन मधून करत असल्याचा आरोप कासले यांनी केला आहे. इतर कैद्यांना पांघरण्यासाठी कपडे दिले जातात तर कराडला ब्लॅंकेट दिले असून त्याचा वापर तो गादीसारखा करत आहे, अशी माहिती देखील कासलेने आपल्या व्हिडीओमध्ये दिली आहे.
ट्रेंडिंग
25 हजारांची खरेदी
कराडला पांघरण्याचेच 6 ब्लॅकेट मिळाले असून त्याचा वापर तो गादीसारखा करतो. इतर कैद्यांना कारागृहातील कँटीनमधून खरेदीचा नियम लावला जातो. मात्र कराड हा स्वतः 10 हजार तर इतर कैद्यांच्या नावावरही 10 ते 15 हजार अशी सुमारे 25 हजारांची खरेदी करतो, असे कासलेने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. पुढे कासलेनं सांगितलं की, मी कारागृहात राहून कराडला मिळणारी व्हीआयपी वागणूक समोर आणेल या भीतीपोटी मला सुरक्षेचे कारण देत छत्रपती संभाजी नगरला हलवण्यात आले होते, असे कासले यानी सांगितले. तर कराडला इतरत्र हलवण्याची मागणी आपणच कारागृहातून अर्जाद्वारे केली होती असे कासले व्हिडिओत म्हणाला आहे. काल (शनिवारी) कासलेनं सोशल मीडियातून याबाबतचा व्हिडिओ शेअर केला होता.
साबयर पोलिस ठाण्यात कार्यरत असताना गुजरातमध्ये जाऊन आरोपींशी आर्थिक तडजोड केल्याच्या आरोपामुळे कासलेला निलंबित करण्यात आले होते. नंतर त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये त्याने आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून त्याला आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर काल (शनिवारी) त्याने व्हिडिओ शेअर करत आरोपसत्र सुरुच ठेवलं आहे. कासलेच्या म्हणण्यानुसार, त्याला सुरुवातीला बीड कारागृहात ठेवले होते. तिथे वाल्मीक कराडला इतर कैद्यांपेक्षा व्हीआयपी वागणूक मिळत आहे.