हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल करणारे समाजकंटक बीड पोलिसांच्या रडारवर, SP नवनीत काँवत यांचा कडक इशारा

पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे हाणामारीच्या घटना आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला रोख बसणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल..

Continues below advertisement

Beed: बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये अलीकडच्या काळात वाढ होत असल्याचं चित्र आहे. विशेषतः सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर काही भागांमध्ये हाणामारीचे व्हिडिओ शूट करून समाज माध्यमावर व्हायरल करण्याचे प्रकार वाढले आहेत. या व्हिडिओंमधून समाजात दहशतीचं वातावरण तयार होत असल्याने पोलिसांनी आता अशा कृतींविरोधात थेट कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

Continues below advertisement

आता असे व्हिडिओ चित्रित करून व्हायरल करणारे बीड पोलिसांच्या रडारवर असणार आहेत. जो व्यक्ती हाणामारीचे व्हिडिओ चित्रित करून वायरल करेल त्याला देखील आरोपी करणार असल्याचं पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले आहे.. पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे हाणामारीच्या घटना आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला रोख बसणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल..

दहशत पसरवणाऱ्या व्हिडिओवर चाप बसणार?

पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, हाणामारी घडवणं, त्यात सहभागी असणं याबरोबरच आता या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते समाज माध्यमांवर व्हायरल करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. इतकंच नव्हे, तर अशा व्यक्तींना गुन्ह्याच्या मुख्य आरोपींसोबतच आरोपी म्हणून दाखल करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात अलीकडच्या काळात काही समाजमाध्यमांवर अशा प्रकारचे व्हिडिओ वारंवार दिसू लागले होते. काहीजण मुद्दामून अशा हाणामाऱ्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करत आणि ते सोशल मीडियावर टाकून त्यातून प्रसिद्धी किंवा दहशत मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी आता याला पूर्णविराम देण्याची भूमिका घेतली आहे. या निर्णयामुळे अशा घटनांमध्ये घट होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून हिंसाचाराचा प्रचार करणे, अशांतता पसरवणे किंवा समाजात भीती निर्माण करणे, हे गुन्हेगारी कृत्य असल्याचं पोलीस प्रशासन वारंवार सांगत आहे.

शेत जमिनीच्या वादातून महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घातला

बीडच्या शिरूर तालुक्यातील राक्षस भवन थांबा येथे शेतीच्या वादातून दोन गटात मोठा वाद झाला .या वादात महिला शेतकरी सीमा खोले यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला .या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर तीन जणांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सीमा खोले यांच्या पतीचे निधन झाले आहे. पतीच्या नावे असलेली शेतजमीन त्या वैती करतात.. मात्र याच जमिनी वरून भावकीतील दीपक खोले नानासाहेब तांबे आणि रामेश्वर अवसरमल यांच्यात वाद सुरू आहे. हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही गटात हाणामारी झाली. आणि याच घटनेत महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालून बेल्टने मारहाण झाली. या प्रकरणाचा अधिक तपास शिरूर पोलीस करत आहेत.

 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »