Housefull 5 Review : हसून हसून लोटपोट व्हाल, 'हाऊसफुल 5' लय भारी कॉमेडी एंटरटेनर!
Housefull 5 Review: अक्षय कुमारचा 'हाऊसफुल 5' हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. जर तुम्ही हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर प्रथम त्याचा आढावा वाचा.

Tarun Mansukhani
Akshay Kumar, Abhishek Bachchan, Riteish Deshmukh, Jacqueline Fernandez, Sonam Bajwa, Nargis Fakhri, Sanjay Dutt
Theaters
Housefull 5 Review: 'हाऊसफुल' फ्रेंचायझीची फिल्म म्हणजे, लाफ्टर, लाफ्टर अन् लाफ्टर. आपलं डोकं घरी फ्रिजमध्ये ठेवून यायचं आणि लॉजिकला फिरायला पाठवायचं. अडीच तास टेन्शन विसरायचं, ही फिल्म तेच करते. ट्रेलरमध्ये जास्त दम नव्हता, पण फिल्म भारी निघाली, फर्स्ट हाफ तर वा रे वाह... सेकंड हाफही तसा चांगला आहे. एकंदरीतच फिल्म भारीच आहे आणि आपला उद्देश साध्य करणारी आहे.
'हाऊसफुल 5'ची स्क्रिप्ट
एक श्रीमंत आणि प्रसिद्ध बिझनेसमन रंजीत आपली प्रॉपर्टी कोणा जॉलीच्या नावावर करतो. याचीच घोषणा सुमद्रात एका शिपवर त्याच्या 100 व्या वाढदिवशी होणार आहे. पण, शिपवर काहीतरी भलतंच घडतं, शिपवर तीन-तीन जॉली येतात आणि त्यातच एक खून होतो. आता खून कोणाचा झाला आणि कोणी केला? याचा शोध सुरू होतो. ही फिल्म तुम्हाला हसवता हसवता खऱ्या खुन्याचा शोध घेते. फिल्मचे दोन वर्जन आहेत, A आणि B. हा रिव्यू दोन्ही वर्जनचा आहे. पहिल्या वर्जनमध्ये खऱ्या खुन्याचा शोध सुरू होता आणि दुसऱ्यामध्ये खरा खुनी भलताच कोणीतरी असतो. तसं पाहायला गेलं तर, दोन्ही वर्जनमध्ये फारसा फरक नाही.
कशी आहे फिल्म?
'हाऊसफुल 5'चा फर्स्ट हाफ फारच मजेशीर आहे, एकही सीन एक्स्ट्रा नाही, तुम्ही खूप हसता, खूपच मजा येते, तुम्ही खूप एन्टरटेन होता. सिनेमातले कॉमिक पंचही भारी वाटतात. सेकंड हाफ थोडासा ताणल्यासारखा वाटतो. पण, क्लायमॅक्सपर्यंत पोहोचेपर्यंत मजा येते आणि प्रियदर्शन टाईम फिलिंग येते. जर सेकंड हाफ आणखी मजेशीर असता, तर ही फिल्म आणखी शानदार वाटली असती. पण, एकूणच फिल्म आपलं ध्येय साधण्यात यशस्वी ठरते. अशा कमर्शिअल फिल्म्स बनणं गरजेचं असतं आणि त्या चालणंही तितकच गरजेचं असते. अशा फिल्म्स अजिबात डोक्याचा वापर न करता पाहाव्यात आणि हसून हसून लोटपोट व्हावं. नेमकं हेच काम ही फिल्म अत्यंत चोख पार पाडते. पण, या फिल्ममध्ये अडल्ट कॉमेडी आणि डायलॉग्स आहेत, त्यामुळे लहान मुलांना विचार करुनच घेऊन जा. फिल्ममध्ये तुम्हाला फॅन्सी कपडे, भव्य-दिव्य सेट आणि ग्लॅमरचा तडका अनुभवायला मिळेल.
'हाऊसफुल 5' कलाकारांच्या अॅक्टिंगबाबत थोडसं...
या फिल्ममध्ये अॅक्टर्सची पूर्ण फौज आहे, जवळपास 19 अॅक्टर्स आहेत आणि सर्वांनी सर्वोत्तम अभिनय केला आहे. पण, अक्षय कुमारला पाहून मजा येते, अक्षय कुमारनं भारी कॉमेडी केली आहे, अक्षयकडे 'हेरा फेरी 3' लवकर प्रदर्शित करण्याची मागणी करणाऱ्या फॅन्सना थोडासा दिलासा 'हाऊसफुल 5' पाहून नक्कीच मिळेल. रितेश देशमुखनंही चांगला अभिनय केला आहे. याव्यतिरिक्त नाना पाटेकरही कॉमेडी अंदाजात दिसून आले आहेत. सौंदर्या शर्मानंही चांगला अभिनय केला आहे. फिल्ममधले सर्व अभिनेते आणि त्यासोबतच प्रेक्षकांनाही सौंदर्या खिळवून ठेवते. याशिवाय सोनम बाजवाही सुंदर दिसली आहे. अभिषेक बच्चन आता सीरियस रोलमध्ये चांगला वाटतोय. इतर कलाकारांनीही उत्तम काम केलं आहे. सर्वांनी आपापल्या भूमिका उत्तम निभावल्या आहेत.
रायटिंग आणि डिरेक्शन
ही फिल्म साजिद नाडियाडवालानं लिहिली आहे आणि अपेक्षा नव्हती की, साजिद अशी फिल्मही लिहू शकतात. चित्रपटाचं लेखन उत्तम आहे, ट्वि्स्ट अँड टर्न्स चांगले आहेत. कॉमिक पंचही मेजशीर आहेत. तरुण मनसुखानीचं दिग्दर्शनही उत्तम आहे.
म्युझिक : फिल्मचं म्युझिकही ठीक आहे, गाणी दिलासा देतात, लाल परी पाहायला मजा येते.
रेटिंग : 3.5 स्टार्स
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

