एक्स्प्लोर

जस्टिन ट्रूडो यांचा भारतीयांना झटका; आता कॅनडात नोकरी मिळणं कठीण, पण का? जाणून घ्या

Canada PM Justin Trudeau Announcment: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निवडणुका जवळ आल्यानं एकापाठोपाठ एक अशा अनेक मोठ्या निर्णयांचा धडाका सुरू केला आहे.

Jobs In Canada: कॅनडामध्ये लवकरच निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुका जवळ आल्यामुळे आता ट्रूडो सरकार आता एकापेक्षा एक मोठ्या घोषणा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रूडो यांच्या निर्णयाचा परिणाम थेट भारतीयांवर होणार आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी तात्पुरत्या परदेशी कामगारांच्या संख्येला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाला आगामी निवडणुकीशीही जोडलं जात आहे. आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या वर्षात, त्यांनी कमी पगाराच्या, कंत्राटी परदेशी कामगारांची संख्या कमी करण्याची योजना जाहीर केली आहे. 

कॅनडाचे (Canada) पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Canada PM Justin Trudeau) यांनी निवडणुका जवळ आल्यानं एकापाठोपाठ एक अशा अनेक मोठ्या निर्णयांचा धडाका सुरू केला आहे. त्यापैकीच एक निर्णय म्हणजे, कॅनडामध्ये कंत्राटी नोकऱ्या करणाऱ्या परदेशींची संख्या कमी करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे कमी पगारावर काम करणाऱ्या आणि देशात कंत्राटी नोकऱ्या करणाऱ्या लाखो परदेशी लोकांवर परिणाम होईल, ज्यामध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे. कॅनडामध्ये शिकण्यासाठी जाणारे भारतीय विद्यार्थी महागाईमुळे अभ्यासाच्या बाहेर छोट्या नोकऱ्याही करतात. जस्टिन ट्रूडो यांच्या या निर्णयामुळे स्थलांतरित आणि तरुणांमध्ये बेरोजगारी वाढेल, असं निवडणूक तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

ट्विटरवर पोस्ट करत ट्रुडोनं यांनी लिहिलं आहे की, श्रमिक बाजार बदलला आहे. आम्ही कॅनडामधील कमी वेतनावर असलेल्या कंत्राटी परदेशी कामगारांची संख्या कमी करणार आहोत. आता आमच्या व्यवसायांसाठी कॅनेडियन कामगार आणि तरुणांमध्ये गुंतवणूक करण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, ट्रुडो यांच्या या निर्णयाला तज्ज्ञांकडून राजकारणाशी जोडलं जात आहे. या निर्णयामुळे कॅनडाच्या पंतप्रधानांना टीकेला सामोरं जावं लागत आहे. मोठ्या संख्येनं लोक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अनेक कॅनेडियन ट्विटर युजर्सनी त्यांना आतापर्यंतचे सर्वात वाईट पंतप्रधान म्हणून देखील संबोधलं आहे.

कोरोनानंतर करण्यात आलेली कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट 

सीबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, कोरोना महामारीनंतर कामगारांच्या मोठ्या तुटवड्यामुळे ट्रूडो सरकारनं निर्बंधांमध्ये दिलासा दिला होता. यानंतर, कमी पगार असलेल्या अस्थायी कर्मचाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. आता कॅनडा इमिग्रेशन व्यवस्थेतील बदलांची चर्चा करत आहे. कायमस्वरूपी रहिवाशांच्या संख्येत घट झाल्यामुळे या आठवड्यात कॅबिनेट स्ट्रीटमध्ये या विषयावर चर्चा होऊ शकते.

कोणत्या क्षेत्रांतील कंत्राटी कामगारांच्या संख्येत घट होणार? 

सरकारच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी बेरोजगारीचा दर सहा टक्के किंवा त्याहून अधिक आहे, अशा ठिकाणी कमी पगाराच्या परदेशी कामगारांना काम दिलं जाणार नाही. दरम्यान, कृषी, अन्न आणि मत्स्य प्रक्रिया आणि आरोग्य सेवा यांसारख्या अन्न सुरक्षा क्षेत्रांमध्ये परदेशी नागरिकांना अजूनही दिलासा आहे, कारण या क्षेत्रांत कामगारांची कमतरता आहे.

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs KKR Live Score IPL 2025 : पावसामुळे टॉसला उशीर! बंगळुरूमध्ये पाऊस झाला कमी, पण सामना सुरू होण्यास लागणार वेळ? जाणून घ्या प्रत्येक अपडेट
RCB vs KKR Live : पावसामुळे टॉसला उशीर! बंगळुरूमध्ये पाऊस झाला कमी, पण सामना सुरू होण्यास लागणार वेळ? जाणून घ्या प्रत्येक अपडेट
शिवराजला मारणारे लोक कुणाचे हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट,  मी SPना भेटणार; काय म्हणाले धनंजय देशमुख?
शिवराजला मारणारे लोक कुणाचे हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट, मी SPना भेटणार; काय म्हणाले धनंजय देशमुख?
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2025 | शनिवार
Rahul Gandhi : 'भारताने किती विमाने गमावली, हल्ल्याची माहिती पाकिस्तानला का दिली?', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींचा सरकारला सवाल
'भारताने किती विमाने गमावली, हल्ल्याची माहिती पाकिस्तानला का दिली?', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींचा सरकारला सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramesh Bornare : आमदार रमेश बोरनेरेंकडून भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण, पोलिसांत तक्रारPune Isisi Vastav 163 : पुण्यातील कोंढव्यात इसीसचा अड्डा कुठे सुरू होता? वास्तव 163 : ABP MajhaChitra Wagh On Sanjay Raut:'अंगात नाही बळ अन् चिमटा काढून पळ'असं राऊत करतात, 'त्यांची लायकी काय..?'ABP Majha Marathi News Headlines 4.00 PM TOP Headlines 17 May 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs KKR Live Score IPL 2025 : पावसामुळे टॉसला उशीर! बंगळुरूमध्ये पाऊस झाला कमी, पण सामना सुरू होण्यास लागणार वेळ? जाणून घ्या प्रत्येक अपडेट
RCB vs KKR Live : पावसामुळे टॉसला उशीर! बंगळुरूमध्ये पाऊस झाला कमी, पण सामना सुरू होण्यास लागणार वेळ? जाणून घ्या प्रत्येक अपडेट
शिवराजला मारणारे लोक कुणाचे हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट,  मी SPना भेटणार; काय म्हणाले धनंजय देशमुख?
शिवराजला मारणारे लोक कुणाचे हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट, मी SPना भेटणार; काय म्हणाले धनंजय देशमुख?
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2025 | शनिवार
Rahul Gandhi : 'भारताने किती विमाने गमावली, हल्ल्याची माहिती पाकिस्तानला का दिली?', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींचा सरकारला सवाल
'भारताने किती विमाने गमावली, हल्ल्याची माहिती पाकिस्तानला का दिली?', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींचा सरकारला सवाल
Who Is Jyoti Malhotra : युट्युबर ज्योती मल्होत्राच्या मुसक्या आवळल्या; पाकिस्तानी गुप्तचर एजंटांशी संपर्क ठेवत संवेदनशील माहिती शेअर केल्याचा आरोप
युट्युबर ज्योती मल्होत्राच्या मुसक्या आवळल्या; पाकिस्तानी गुप्तचर एजंटांशी संपर्क ठेवत संवेदनशील माहिती शेअर केल्याचा आरोप
शशी थरुर अमेरिकेला भेट देणार, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे 'या' देशांमध्ये भारताची बाजू मांडणार, पाकिस्तानचे खोटे दावे खोडून काढणार
शशी थरुर, सुप्रिया सुळे ते श्रीकांत शिंदे, कोणत्या देशांना भेटी देणार? पाकिस्तानला जगासमोर उघडं पाडणार
Sumeyye Erdogan : पाकिस्तानसाठी पायघड्या घालणाऱ्या तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची लाडकी लेक भारतात अचानक चर्चेत का आली?
पाकिस्तानसाठी पायघड्या घालणाऱ्या तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची लाडकी लेक भारतात अचानक चर्चेत का आली?
Uttarakhand: पतंजली आचार्यकुलम स्कूलची कमाल, हायस्कूल आणि इंटरमिजिएटचा 100 टक्के निकाल
Uttarakhand: पतंजली आचार्यकुलम स्कूलची कमाल, हायस्कूल आणि इंटरमिजिएटचा 100 टक्के निकाल
Embed widget
OSZAR »