South Crime Thriller Movie OTT: 1 तास 54 मिनिटांची मर्डर मिस्ट्री, थ्रिलर फिल्मचा सस्पेन्स पाहून हादरुन जाल; क्लायमॅक्ससमोर 'दृश्यम'सुद्धा फेल
South Crime Thriller Movie OTT: ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना सर्वाधिक पसंती मिळणाऱ्या चित्रपटांमध्ये क्राईम-थ्रिलर शैली अव्वल आहे. बॉलीवूड चित्रपट असो किंवा साऊथ मूव्ही, लोक ओटीटीवर आता सिनेमे पाहू लागले आहेत.
South Crime Thriller Movie OTT: आता मनोरंजन आपल्या हातात आलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे आता आपल्याला हवं तेव्हा, हवं तिथे आपण सीरिज पाहू शकतो. ना थिएटरमध्ये जाण्याची गरज, ना टीव्हीसमोर बसून राहण्याची गरज. त्यामुळेच सध्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सची क्रेझ खूप वाढली आहे. यामुळेच काही निर्माते चित्रपट थेट ओटीटीवरही प्रदर्शित करतात. यामुळेच जर एखादा चित्रपट थिएटरमध्ये आला, तर तो 1 ते दीड महिन्यांत ओटीटीवर येतो.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना सर्वाधिक पसंती मिळणाऱ्या चित्रपटांमध्ये क्राईम-थ्रिलर शैली अव्वल आहे. बॉलीवूड चित्रपट असो किंवा साऊथ मूव्ही, लोक ओटीटीवर आता सिनेमे पाहू लागले आहेत. अशातच आज आम्ही तुम्हाला एका जबरदस्त चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो पाहिल्यानंतर तुम्ही हैराण व्हाल. इतकंच नाही तर या सिनेमाचा क्लायमॅक्स 'दृश्यम'सारख्या चित्रपटांना मागे टाकतो. जर तुम्ही क्राईम-थ्रीलर सिनेमांचे चाहते असाल तर हा सिनेमा नक्की पाहा...
ट्रेंडिंग
क्राईम-थ्रीलर फिल्मचं नाव काय?
आपण ज्या 1 तास 54 मिनिटांच्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्याचं नाव 'V1 मर्डर केस' आहे. हा एक थ्रिलर-सस्पेन्स चित्रपट आहे, ज्याचं दिग्दर्शन पावेल नवगीथन यांनी केलंय. राम अरुण कॅस्ट्रो, विष्णुप्रिया पिल्लई यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत आणि त्याशिवाय गायत्री, लिजेश, माईम गोपी यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटाचा भाग आहेत. चित्रपट सुरू केल्यानंतर, तुम्ही पडद्यावरून नजर हटवू शकणार नाही.
'V1 मर्डर केस'ची कहाणी काय?
चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर, त्याची कथा एक मर्डर आणि ऑफिसर अग्निभोवती फिरते. चित्रपटात, तिच्या प्रियकरासह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका मुलीची हत्या केली जाते. त्यानंतर, एक फॉरेन्सिक अधिकारी केस हाताळतो. तो अधिकारी हे प्रकरण सोडवण्यासाठी दिवसरात्र काम करतो. दरम्यान, तो स्वतः अंधाराला घाबरतो. मग जेव्हा तपास पुढे जातो तेव्हा असं दिसून येतं की, मुलीच्या प्रियकराचाही मृत्यू झाला आहे. यानंतर, त्यात अनेक ट्वीस्ट आणि टर्न्स येतात, जे पायाखालची जमीन हादरवतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :