ट्रेंडिंग
दिग्दर्शकाची 'वन नाईट स्टँड'ची मागणी, क्षणात 'तिनं' धुडकावली; कित्येक बड्या फिल्म्सना मुकली अन् मग...
कास्टिंग काऊचचा त्रास सहन करणाऱ्या अनेक अभिनेत्रींमध्ये ही एक अशी अभिनेत्री आहे, जिनं तडजोड न करण्याचा निर्णय घेतला. पण तिला याची मोठी किंमत मोजावी लागली.
कास्टिंग काउचमुळे (Casting Couch) बॉलिवूडमध्ये (Bollywood) अगदी खोलवर पोहोचली आहेत. कदाचितच अशी कुणी अभिनेत्री (Actress) असेल जिला असा अनुभव आला नसेल. अनेक अभिनेत्रींनी याबाबत अगदी उघडपणे वक्तव्य केली आहेत. कित्येक जणींनी तर थेट त्यांच्यासोबत घडलेले प्रसंग अगदी न घाबरता सांगितले आहेत. अशातच एका बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रीला कास्टिंग काउचचा अनुभव आला. पण, यामुळे तिचं आयुष्य 360 अंशात बदललं. दिग्दर्शकानं तिच्याकडे 'वन नाईट स्टँड'ची मागणी केली. पण, तिनं ती क्षणात धुडकावून लावली. तिचा याच नकारामुळे तिच्या हातून अनेक मोठे सिनेमे गेले. एवढंच काय तर, तिला न्यूड फोटोशूटही करायला सांगितलं होतं.
आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत सांगत आहोत, तिचं नाव नर्गिस फाकरी (Nargis Fakhri) जिनं इम्तियाज अलीच्या (Imtiaz Ali) 'रॉकस्टार' (Rockstar Movie) चित्रपटातून डेब्यू केलेला. या अभिनेत्रीनं वरुण धवनपासून अक्षय कुमारपर्यंत सर्वांसोबत काम केलं. पण तिच्या कारकिर्दीत तिला कास्टिंग काउचचं दुःखही सहन करावं लागलं. दरम्यान, तिनं कॉम्प्रोमाइज न करण्याचा निर्णय घेतला आणि या संकटातून स्वतःला वाचवले.
दिग्दर्शकाची 'ती' घाणेरडी मागणी धुडकावून चुकवली किंमत
नर्गिस फाकरीनं स्वतः तिचा कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केलेला. कोईमोईच्या वृत्तानुसार, अभिनेत्री एकदा म्हणाली होती की, "मला नेहमीच माहीत होतं की, मला कशाची भूक आहे. मला प्रसिद्धीची भूक नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर एकमत होऊ शकत नाही. दिग्दर्शकासोबत नग्न राहता येत नाही किंवा झोपता येत नाही. काही गोष्टी न केल्यामुळे मी अनेक नोकऱ्या गमावल्या आणि ते खरंच निराश करणारं होतं."
टॉपलेस फोटोशूटची मिळालेली ऑफर
नरगिस पुढे बोलताना म्हणाली की, "माझं एक स्टँडर्ड होतं. माझ्या मर्यादा ठरलेल्या होत्या. पण, जेव्हा मला या गोष्टी एकापेक्षा जास्त वेळा केल्यामुळे बाहेर फेकण्यात आलं, तेव्हा मला वाईट वाटलं. पण नंतर मला जाणवलं की, चांगले लोक जिंकतात. यादरम्यान, अभिनेत्रीनं सांगितलं होतं की, तिच्या मॉडेलिंग कारकिर्दीत तिला प्लेबॉय मासिकाकडून टॉपलेस शूटसाठी फोन आला होता, जो तिने नाकारला होता.
नर्गिसचा 100 कोटींचा चित्रपट
नर्गिस फाकरीनं अनेक चित्रपट केले, पण तिचा हिट चित्रपट अक्षय कुमारसोबत होता. ही अभिनेत्री 'हाऊसफुल 3' मध्ये दिसली होती, ज्यानं बॉक्स ऑफिसवर 109.14 कोटी रुपये कमावले होते. आता ही अभिनेत्री पुन्हा एकदा अक्षय कुमारसोबत त्याच चित्रपटाच्या पाचव्या भागात म्हणजेच 'हाऊसफुल 5' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :