Gauahar Khan Reveals She Suffered Miscarriage: नऊ महिन्यांची गरोदर असतानाच मिसकॅरेज, बॉलीवूड अभिनेत्री म्हणाली, 'मी ती वेदना.....'

Gauahar Khan Reveals She Suffered Miscarriage: गौहर खाननं तिच्या पहिल्या व्लॉगमध्ये खुलासा केला आहे की, तिचा मुलगा जेहानच्या जन्मापूर्वीच तिचा गर्भपात झाला होता.

Continues below advertisement

Gauahar Khan Reveals She Suffered Miscarriage: बाईसाठी आईपण काय असतं? याचं कुणी शब्दात वर्णन करू शकत नाही. आई होणं म्हणजे, बाईचा दुसरा जन्म. बाळ आईचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतं. अशातच गरोदर राहिलेल्या आणि आपल्या बाळाची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बाबतीत मात्र अत्यंत दुर्दैवी घटना घडली. अभिनेत्री 9 महिन्याची असतानाच तिचा गर्भपात झाला. फक्त काही दिवसांतच आपलं बाळ आपल्या हातात असणार, त्याचं पालन-पोषण यासर्व गोष्टींची स्वप्न रंगवत असतानाच, तिचं मातृत्व नियतीनं तिच्याकडून हिरावून घेतलं. याबाबत स्वतः अभिनेत्रीनं खुलासा केला आहे. 

Continues below advertisement

आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, तिचं नाव गौहर खान (Gauahar Khan). गौहर खाननं काही आठवड्यांपूर्वी घोषणा केली होती की, ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. 2023 मध्ये ती आणि जैद दरबार एका मुलाचे पालक झाले, ज्याचं नाव त्यांनी जेहान ठेवलंय. आता गौहर दुसऱ्यांदा गरोदर आहे. अलीकडेच तिनं एक व्लॉग सुरू केला आहे, ज्यामध्ये ती आई होण्याच्या प्रवासाबद्दल, मातृत्वाबद्दल आणि अडचणींबद्दल तसेच गर्भधारणेशी संबंधित अनेक समस्यांबद्दल बोलणार आहे. गौहरनं तिच्या पहिल्या व्लॉगमध्ये गर्भपाताबद्दल खुलासा केला आणि ढसाढसा रडली.

गौहर खाननं सांगितलं की, मुलगा जेहानच्या जन्मापूर्वी तिचा एकदा गर्भपात झाला होता. हा तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा होता. याबद्दल बोलताना गौहरचे डोळे भरून आले. नवव्या महिन्यातच गौहरनं आपलं बाळ गमावलं होतं. 

गौहर खान गर्भपाताबद्दल म्हणाली...

व्लॉगमध्ये बोलताना गौहर खान म्हणाली की, "एक गोष्ट आहे, जी मी आजपर्यंत कोणालाही सांगितली नाही. मी खूप धाडसानं सांगतेय. जेहानच्या आधी माझा गर्भपात झाला होता. मी सध्या त्या वेदनांबद्दल काय सांगू? ते शब्दात मांडणं फारच कठीण आहे. नऊ महिन्यांची गरोदर असतानाच मी बाळ गमावलं, हे स्वीकारणं माझ्यासाठी खूप कठीण होतं."

जेहानला नॅचरली कंसीव केलं 

गौहर खाननं पुन्हा एकदा सांगितलं की, जेहानला नॅचरली कंसीव केलं होतं, आणि याला ती देवाची कृपा असल्याचं सांगते. तिनं या महिलांना सलाम केला, ज्या मदरहुड दरम्यान कित्येक समस्यांचा सामना करतात. 

दुसऱ्यांदा आई होणार गौहर खान 

गौहर आणि जैद दरबारनं एप्रिल 2025 मध्ये लवकरच त्यांच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं जाहीर केलं. गौहर खान दुसऱ्यांदा आई होणार आहे. ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी त्यांनी एक क्युट व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. गौहर आणि जैदनं डिसेंबर 2020 मध्ये लग्न केलेलं. गौहरचा पती जैद दरबार हा सोशल मीडिया पर्सनॅलिटी आणि कोरिओग्राफर आहे. तसेच, तो प्रसिद्ध म्युझिक डिरेक्टर इस्माइल दरबार यांचा मुलगा आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Actress Casting Couch Experience: 'सोबत झोपण्यासाठी तयार...?'; टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून दिग्दर्शकाची 'ती' अत्यंत घाणेरडी मागणी

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »