'मला शैतानानं निर्वस्त्र केलं अन् मला समजलं पण नाही..', मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत
Actress Sana Khan : अभिनेत्री सना खानचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

Actress Sana Khan : अभिनेत्री सना खान हिने एका पॉडकास्टमध्ये केलेलं वक्तव्य सध्या तुफान चर्चेत आहे. यावेळी बोलताना तिने आयुष्यातील जुन्या दिवसांबाबत भाष्य केलंय. तिने सिनेसृष्टीतील प्रवासाबद्दल अनेक गोष्टीही सांगितल्या आहेत. सिनेसृष्टीत काम करत असताना ज्या गोष्टी केल्या त्या इस्लाममध्ये हराम मानल्या जातात. त्यामुळे ती चिंतेत होती. 'मी रोडवर पडलेले असायचे. मी अशा अनेक गोष्टी केल्या होत्या, ज्या धर्मानुसार हराम आहेत, असं सना खान हिने म्हटलंय.
View this post on Instagram
गेल्या काही दिवसांपासून सना खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. संभावना सेठला तिने बुरखा घालायला सांगितला होता, तेव्हापासून ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. मात्र, ते सर्व विनोदाने सुरु असल्याचं संभावना सेठने स्पष्ट केलं होतं. आम्ही चांगले दोस्त आहोत, असंही संभावनाने सांगितलं होतं. दरम्यान, सना खान तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. शिवाय वादात देखील सापडली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये सना खानला अश्रू अनावर देखील झाले होते. कारण तिला जुन्या दिवसांची आठवण झाली. ती म्हणाली की, मला शैतानानं निर्वस्त्र केलं होतं.
सना खान म्हणाली की, 'स्त्री म्हणून सैतानाने मला कधी विवस्त्र केले ते मला कळलेही नाही. मी बॅकलेस आणि शॉर्ट स्कर्ट्समध्ये अचानक दिसू लागले. ते मलाही कळलं नाही. त्यावेळी मला रडू कोसळले होते.
सना खान रुबीना दिलैक पॉडकास्टमध्ये बोलताना सना खानने वेस्टर्न कपड्यांबाबतही भाष्य केलं. सना म्हणाली होती की तिला तिच्या करिअरमध्ये खूप नाव आणि प्रसिद्धी मिळत होती, पण आनंद मिळत नव्हता. मग त्यामागचं कारण शोधायला सुरुवात केली. 'मी स्वतःला विचारू लागले की मी आनंदी का नाही? फुल स्लीव्ह्जवरून बॅकलेसमध्ये कधी गेले ते मलाही कळलं नाही. मी एक पारंपारिक ड्रेसमध्ये कॉलेजमध्ये जाणारी मुलगी होते अन् मी बॅकलेस कपड्यांमध्ये स्टेजवर पोहोचले होते.
सना खानने 2020 मध्ये अचानक शोबिज आणि ग्लॅमर इंडस्ट्रीला रामराम केला होता. सोशल मीडियावर एक पोस्ट करत तिने याबाबतची माहिती दिली होती. धर्मासाठी तिने शोबिजचा त्याग केला होता. सनाने सांगितले होते की, तिला तिचे जुने दिवस आठवून लाज वाटते, शोबिज आणि फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग असताना तिने केलेल्या गोष्टींचा विचार करून तिला लाज वाटायची. सुरुवातीला ती फक्त पैसे कमवण्यावर लक्ष केंद्रीत करत होती, तर आतून आनंद नव्हता. तेव्हा तिच्या मनात विचार आला की, ती जे करत आहे ते इस्लाममध्ये हराम आहे. त्यांच्या धर्मानुसार हे अजिबात योग्य नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

