ट्रेंडिंग
Raigad Crime News: परळीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना, प्रियकराने कोयत्याने वार करुन नर्सला संपवलं, स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला
Raigad Crime news: रायगड जिल्ह्यात एक हादरवणारी घटना घडली आहे. एका तरुणाने प्रेमप्रकरणातून सुधागड तालुक्यातील परळी येथे आपल्या प्रेयसीचा निर्घृणपणे खून केल्याची घटना
Raigad Murder News: रायगड जिल्ह्यातील परळी येथे एका तरुणीने आपल्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सुधागड तालुक्यातील परळी (Parli) येथे मंगळवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार, ही तरुणी परळीतील राजेंद्र पॉलीक्लिनिक नर्सिंग होम दवाखाना येथे नर्स म्हणून कामाला होती. तिच्या एका तरुणाशी प्रेमसंबंध (Love Relationship) होते. या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्यामुळे या तरुणाने संबंधित तरुणीवर हल्ला केल्याचे समजते. (Raigad News)
या तरुणाने अत्यंत निर्घृणपणे आपल्या प्रेयसीचा खून केला. त्याने कोयत्याने (Koyta) प्रेयसीच्या मानेपासून संपूर्ण अंगावर सपासप वार केले. यामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी येईपर्यंत तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. यानंतर तरुणानेही स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी तरुण आणि तरुणी या दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. ही हत्या प्रेमप्रकरणातून घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पाली पोलिस ठाण्याअंतर्गत घटनेचा तपास सुरु आहे.
या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणाच्या वादातून शेखर संतोष दुधाणे (रा. दुधाणेवाडी, ता. सुधागड) याने परळी येथील राजेंद्र पॉलीक्लिनिक नर्सिंग होम दवाखाना येथे काम करत असलेली आपली प्रेयसी पोर्णिमा अनंत देसाई, (रा. देसाईपाडा, ता. सुधागड) हिची हत्या करुन तेथेच स्वतःला गळफास घेऊन संपवले आहे. ही घटना समजताच जांभूळपाडा, पाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यावेळी दवाखान्याबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मुलीची हत्या करून स्वतःला संपवण्यामागे कोणत कारण असावं हे अद्याप अस्पष्ट असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
Pune Crime: पुण्यात 18 वर्षीय तरुणीची भररस्त्यात हत्या
दोन दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील वालेकरवाडी परिसरात रविवारी रात्री 18 वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. कोमल भरत जाधव असे या तरुणीचे नाव होते. कोमल जाधव ही पिंपरी चिंचवड शहरालगत असलेल्या वाल्हेकरवाडीमधील कृष्णाईनगर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहात होती. रविवारी रात्री बाईकवरून आलेल्या दोन आरोपींनी तिला घराबाहेर बोलवून घेतलं. कोमल घराच्या खाली आल्यानंतर आरोपींनी तिच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला होता.
आणखी वाचा
वर्षभरापूर्वीच्या वादाचा घेतला बदला, 17 वर्षीय मुलाला वार करून संपवलं, पिंपरी चिंचवड हादरलं!
पुण्यातील धक्कादायक घटना, नवा व्यापार खेळताना लहान भावाचा वाद; मोठ्या भावाचा नाहक बळी