Nashik Crime news: आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने सासू-नणंदेकडून महिलेला जातीवाचक शिवीगाळ, घरातच गोळ्या देऊन गर्भपात केला, नाशिकमधील धक्कादायक घटना

Nashik crime news: खालच्या जातीची असल्याचा उल्लेख, सूनेकडून वंशाचा दिवा नकोसा, नर्स सासूने घरीच सूनेचा गर्भपात केला. नाशिकमधील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

Nashik Crime News: पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेचा छळ करुन तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे प्रकरण राज्यभरात गाजत असतानाच नाशिकमधून (Nashik News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरजातीय लग्न मान्य नसल्यामुळे सासरच्या मंडळींनी सूनेचा छळ केला. तसेच तिचा घरीच गर्भपात (Abortion) केल्याचा प्रकार उघड  झाला आहे. यासंदर्भात पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळे हा सगळा प्रकार चव्हाट्यावर आला.  सात वर्षांपूर्वी पीडित महिलेने भूपेश पाठक सोबत प्रेमविवाह केला होता. मात्र, आंतरजातीय विवाह असल्यामुळे पीडित महिलेला सासू सासरे आणि नणंद यांच्याकडून वारंवार जातीवाचक शिवीगाळ करण्यात येत होती. पती देखील तिला नांदवण्यास तयार नव्हता. एवढेच नव्हे पीडित महिला गर्भवती असताना नर्स असलेल्या सासूने घरातच सुनेचा गर्भपात केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीडित महिलेने नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार देत पोलिसांनी सासू सुचित्रा पाठक, सासरे प्रवीण पाठक, ननंद स्मिता पाठक आणि पती भूपेश पाठक या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Continues below advertisement

पीडित महिला आणि भूपेश पाठक हे दोघे 2017 पासून एकमेकांना ओळखत होते. हे दोघे एकाच महाविद्यालयात शिकत होते. त्यावेळी दोघांची मैत्री झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. 2021 मध्ये पीडित महिला आणि भूपेश यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यामधून ही महिला गर्भवती झाली. तेव्हा भूपेशने गोळ्या देऊन महिलेचा गर्भपात केला. त्यानंतर ही महिला लग्नासाठी भूपेशच्या मागे लागली होती. त्यामुळे भूपेशने 2023 साली अशोक स्तंभ येथे वैदिक पद्धतीने या महिलेशी विवाह केला. याबाबत एक मित्र वगळता कोणालाही माहिती नव्हती. पीडित महिला आणि भूपेश पाठक दोघेही लग्न होऊनही आपापल्या घरी राहत होते. 

लग्नानंतर या दोघांमध्ये पुन्हा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.  तेव्हा पीडित महिला पुन्हा गर्भवती झाली. ही गोष्ट भूपेशच्या घरच्यांना समजली. लग्न होऊही ही महिला केवळ सणवार आणि कार्यक्रमांच्या दिवशी सासरी जायची. तिकडे गेल्यावर सासू, सासरे आणि नणंद तिला शिवीगाळ करायचे. 'तू खालच्या जातीची आहेस', असे हिणवायचे. पीडित महिला गर्भवती होती तेव्हा तिचा नवरा भूपेश तिला म्हणाला की, आपण सगळ्यांसमोर लग्न करु. पण लग्नाच्यावेळी तू गर्भवती असशील, तर चांगले वाटणार नाही. तू आधी गर्भपात करुन घे, असे त्याने महिलेला सांगितले. 

या पीडित महिलेची सासू नर्स होती. तिने घरीच बोलावून महिलेला गर्भपाताच्या तीन गोळ्या दिल्या आणि सलाईन लावले. त्यानंतर सासरच्यांनी या महिलेला पुन्हा घरी पाठवून दिले. गर्भपात झाल्यानंतर आता भूपेश या महिलेला घरी नांदवायला तयार नाही. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. 

Nashik News: तू झोपडपट्टीत राहतेस, गरीब आहेस, माझ्या घरचे तुला स्वीकारणार नाहीत; भुपेश पाठक काय म्हणाला?

दुसऱ्यांदा गर्भपात केल्यानंतर भुपेश पाठक या महिलेला घरी नांदवायला तयार नव्हता. ही महिला चार-पास दारात बसून राहिली तरी तिला घरात घेतले जात नव्हते. 'तू खालच्या जातीची आहेस', 'झोपडपट्टीत राहणारी आहेस', 'तुझी आर्थिक परिस्थितीही चांगली नाही', 'माझ्या घरचे आपलं लग्न मान्य करणार नाहीत', असे भुपेश या महिलेला म्हणाला. ही महिला घरी झाल्यानंतर सासरे आणि नणंद तिला जातीवाचक शिवीगाळ करायचे. या चौघांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

आणखी वाचा

वैष्णवी हगवणेच्या लग्नात पाण्यासारखा खर्च, अलिशान रिसॉर्ट अन् करोडोंची सजावट, फक्त स्टेजसाठी 22 लाखांचा चुराडा

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »