शिवराजला मारणारे लोक कुणाचे हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट, मी SPना भेटणार; काय म्हणाले धनंजय देशमुख?

Dhananjay Deshmukh: 'याचा संतोष देशमुख पार्ट-2 करायचा ' असं आरोपी म्हणत असल्याचं शिवराजनं सांगितल्यानंतर मोठी खळबळ उडाली. यानंतर धनंजय देशमुख यांनी शिवराज दिवटेची भेट घेतली.

Continues below advertisement

Beed: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला ( 9 डिसेंबर 2024) पाच महिने पूर्ण होतात न होतात तोच परळीत घडलेल्या शिवराज दिवटे मारहाणप्रकरणाने पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी चर्चेचा विषय ठरलीय.   शुक्रवारी संध्याकाळी परळीत शिवराज दिवटे या तरुणाला एका टोळक्याने अपहरण करुन डोंगराळ भागात नेऊन बांबू आणि लाकडाने बेदम मारहाण केली. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात (Beed Crime) एकच खळबळ माजली आहे.. आपल्याला लोखंडी रॉड आणि कत्नीने मारहाण करत 'याचा संतोष देशमुख पार्ट-2 करायचा ' असं आरोपी म्हणत असल्याचं शिवराजनं सांगितल्यानंतर मोठी खळबळ उडाली. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख याचे बंधू धनंजय देशमुख आणि मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी परळीत मारहाण झालेल्या शिवराज दिवटे याची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात भेट घेतली व त्याच्या प्रकृतीची विचारणा केली. 

Continues below advertisement

काय म्हणाले धनंजय देशमुख?

मारणाऱ्या लोकांना भविष्याची चिंता नाही ते अज्ञानी आहेत. त्यांना ज्यांनी कुणी ह्या चुकीच्या गोष्टी करायला सांगितल्या आहेत, त्यांना प्रशिक्षण दिलं आहे,हे कालच फोटोमधून समोर आलं आहे. हे लोक कोणासोबत राहतायत, हे समोर आलं आहे. या चुकीच्या घटना कधी बंद होणार आहेत, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मी याबाबत बीडचे पोलीस अधीक्षक यांना भेटणार आहे. जे जिल्ह्यामध्ये घडतंय याची कल्पना साहेबांना आहे का नाही हे देखील त्यांना बोलणार आहे. आरोपीला जातपात धर्म नसतो, त्यामुळे हा विषय इथे येत नाही. कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. असं धनंजय देशमुख म्हणाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत गंगाधर काळकुटेंसह इतरही लोक उपस्थित होते. 

'आम्ही शिवराजला भेटलो होतो. त्याच्या डोक्याला मार आहे. डोळेही लाल आहेत . हाताने बचाव केल्यामुळे तो वाचला आहे. तुझा संतोष देशमुख 2 करू असे मारताना बोलत होते, असे त्यांने सांगितले, त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक आल्याने त्याचा जीव वाचला .मात्र हे सगळं बीड जिल्ह्यासाठी भयावह आहे, हे बीड जिल्ह्याचं नाव खराब करणार आहे. बीडची तुलना बिहारशी केली जाते. अशा घटना बीडमध्ये होत आहेत. हे थांबवणे गरजेचे आहे. बीडचे पालकमंत्री आणि पोलीस अधीक्षकांनी यासाठी कठोरातील कठोर पावले उचलली पाहिजेत.आरोपींना मकोका लागला पाहिजे.पोलीस अधीक्षक चांगलं काम करत आहेत. मात्र खालची पोलीस यंत्रणा कुचकामी आहे. पोलीस दलात चुकीचे पायंडे पडलेले आहेत, ते थांबणे गरजेचे आहे.  असे उपस्थितांनी सांगितले.

हेही वाचा:

 

शिवराज दिवटे मारहाण प्रकरण! धनंजय देशमुख यांनी रुग्णालयात घेतली शिवराजची भेट  

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »