काल झालेल्या मुंबई विरुद्ध चेन्नई या पारंपारिक द्वंद्वांमध्ये मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांमधील मुबई करांचा जलवा पाहायला मिळाला...प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई कडून आयुष आणि शिवम हे दोघे चमकले तर नंतर फलंदाजी करणाऱ्या मुंबई संघातून रोहित...सूर्यकुमार हे दोघे..अर्थात चेन्नई संघाकडून रवींद्र जडेजा याने उत्तम खेळ करून चेन्नई संघाला एक सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली हे सुद्धा तितकेच खरे....१७७ धावसंखेचे आव्हान घेऊन उतरलेल्या मुंबई संघाची सुरुवात आज सुद्धा दमदार झाली...१९ चेंडूत २४ धावा करून रिकल्टन बाद झाला पण त्याने रोहित सोबत ४० चेंडूत ६३ धावांची भागीदारी केली होती.. त्यानंतर सुरू झाली ती नयनरम्य फटकेबाजी....क्रीडारसिकांसाठी अस्सल मेजवानी..काय नव्हते त्या मेजवानीत..रोहित शर्मा याचा देखणा पुल...रुबाबदार पीक अप...मनमोहक कव्हर ड्राईव्ह... उद्धट स्लॉग...तर दुसऱ्या बाजूने स्वीप या फटाक्याची विविधता ..आणि ती किती असावी वाय डिश डीप मिड विकेट पासून लाँग लेगपर्यंत..
सूर्याचा स्लॉग स्वीप..आणि यॉर्कर वर अँटीसेपेशन करून मारलेला एक्सट्रा कव्हर वरून षटकार..कालच्या सामन्यातील सर्वात सुंदर फटका ..जेव्हा सूर्या आणि रोहित खेळत होते तेव्हा जणू काही ते त्यांच्या मनाप्रमाणे गोलंदाजाला गोलंदाजी करायला लावत होते अशी शंका यावी असे त्यांचे फुटवर्क होते.
सामना संपल्यावर सुनील गावसकर एका वहिनीवर बोलत असताना म्हणाले की "सूर्यकुमार याचे अँटिसिपेशन १० पैकीं ९ वेळा बरोबर असते इतका तो जीनियस आहे" त्याने जडेजाला एकच षटकात कव्हर ड्राईव्ह मारून पुढील चेंडू स्वीप करून धावा वसूल केल्यात..रोहित आणि सूर्यकुमार यांच्यात ५४ चेंडूत ११४ धावांची भागीदारी झाली आणि सामना १६ व्या षटकात मुंबई चा झाला..आज प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाचा पहिला बळी लवकर गेल्यावर पहिलाच सामना खेळणाऱ्या आयुष यांने आपण मुंबई च्या रणजी संघात का आहोत हे दाखवून दिले..१५ चेंडूत ३२ धावा करताना त्याने पूल.. फ्लिक.. ड्राइव्ह हे फटके खेळून आपण लंबी रेस का घोडा आहोत याचे संकेत दिले...काल वैभव सूर्यवंशी आणि आज आयुष म्हात्रे या दोघांनी आय पी एल च्या क्षितिजावर चमकायला सुरुवात केली..आणि आपले चमकणे हे काजव्यारखे नसून शुक्राच्या चांदणी सारखे आहे याचे ही संकेत दिले. चेन्नई संघ आज आयुष ने दिलेल्या सुरुवाती नंतर रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांच्या भागीदारीमुळे मोठी धावसंख्या पार करील असे वाटत होते पण..मुंबई संघाच्या गोलंदाजी मुळे आणि त्यांच्या क्षेत्रक्षणामुळे ते १७६ द्यावाच करू शकले...जसप्रीत बुमरा याने ४ षटकात फक्त २५ धावा देऊन २ बळी घेतले ते सुद्धा शिवम आणि धोनी यांचे..इथेच चेन्नई ४०/५० धावा कमी करू शकले...सूर्यकुमार यादव याच्या वानखेडेवर काही अविश्वसनीय खेळ्या पहिल्या ...त्याचे अद्भुत पदलालित्य पाहिले की एक प्रश्न कायम मनात येतो की २०२३ चा नोव्हेंबर महिन्यातील तो अंतिम सामना वानखेडेवर असता तर रोहित शर्मा गेल्या सात सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतर काही वेळा बाद होत होता.. टीव्हीवरील पत्रकार त्याच्या निवृत्तीची भाषा बोलू लागले होते. आश्चर्य म्हणजे त्यात वीरेंद्र सेहवाग देखील होता... रोहितचा असा एक खास इतिहास आहे जेव्हा जेव्हा टीकाकार त्याच्यावर विखारी टीका करतात तेव्हा तेव्हा तो आणखीन उफाळून वर आला आहे..म्हणूनचं तो खालील शायरी मधील समुद्र आहे...काल बुडणाऱ्या शहराचे नाव होते चेन्नई..
..हम तो एक समंदर है,
हमे खामोश रहने दे,
जरा जो लहर गये,
तो शहर डुबो देंगे!!