Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक राशीसाठी जूनचा नवा आठवडा नशीब पालटणारा; आर्थिक स्थिती असेल मजबूत, साप्ताहिक राशीभविष्य वाचा

Weekly Horoscope 9 To 15 June 2025: तूळ आणि वृश्चिक राशीसाठी व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Continues below advertisement

Weekly Horoscope 9 To 15 June 2025: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिन्याचा 9 ते 15 जूनचा नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण या आठवड्यात मोठ मोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत. एप्रिल महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

Continues below advertisement

तूळ रास साप्ताहिक राशीभविष्य (Libra Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - तूळ राशीच्या लोकांचे प्रेम संबंधांमध्ये जवळीक आणि समजूतदारपणा वाढेल. विवाहित जीवनात सुसंवाद आणि भावनिक जोड दिसून येईल. जुन्या मित्रांसोबतचे संबंध मजबूत होतील.

करिअर (Career) - तूळ राशीच्या करिअरबाबत बोलायचं झाल्यास, कामाच्या ठिकाणी सकारात्मक उर्जेचा प्रभाव दिसून येईल. तुमच्या विचारांना संघात महत्त्व मिळेल आणि तुमची भूमिका महत्त्वाची असेल. भागीदारी व्यवसायात नफा मिळण्याची चिन्हे आहेत. सरकारी किंवा कायदेशीर बाबींमध्ये प्रगती शक्य आहे. नवीन प्रकल्पांमध्ये काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक पावले उचला.

आर्थिक स्थिती (Wealth) - तूळ राशीच्या लोकांना नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. आर्थिक स्थिती चांगली असेल. भागीदारी व्यवसायात नफा मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र, तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. 

आरोग्य (Health) - तूळ राशीच्या लोकांचे आरोग्य सामान्य राहील, परंतु त्वचा, कंबर आणि मूत्रपिंडांशी संबंधित काही समस्या असू शकतात. नियमित योगासने आणि हलका व्यायाम फायदेशीर ठरेल. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या.

वृश्चिक रास साप्ताहिक राशीभविष्य (Scorpio Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - प्रियजनांशी मोकळेपणाने संवाद साधा. विवाहित जीवनात जुने मतभेद उद्भवू शकतात, परंतु प्रेम आणि समजुतीने परिस्थिती सुधारेल. 

करिअर (Career) - कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुभवाचा आणि एकाग्रतेचा तुम्हाला पूर्ण फायदा मिळेल. जास्त कामामुळे मानसिक दबाव असू शकतो, परंतु तुम्ही तो यशस्वीरित्या हाताळू शकाल.

आर्थिक स्थिती (Wealth) - तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. मात्र शेअर बाजार किंवा धोकादायक गुंतवणुकीपासून दूर राहा.

आरोग्य (Health) - आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः पचनसंस्था, जननेंद्रिये आणि झोपेच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या. ताणतणाव आणि चिडचिड टाळण्यासाठी ध्यान आणि प्राणायाम करा. 

हेही वाचा :

Weekly Lucky Zodiac Sign: जूनच्या दुसऱ्या आठवड्यात धनलक्ष्मी राजयोगाचे संकेत, 'या' 5 राशी होणार मालामाल! साप्ताहिक भाग्यशाली राशी जाणून घ्या..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »